23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरसंपादकीयचोर मचाये शोर

चोर मचाये शोर

घोटाळ्यातील खरा लाभार्थी कोण, कोविड मृतांच्या टाळूवरचे लोणा खाणारा नेता कोण हे उघड होणार आहे, त्यातून ही ओरड होते आहे.

Google News Follow

Related

हे विधीमंडळ नाही, चोर मंडळ आहे, अशी सडकछाप भाषा वापरणाऱे शिल्लक सेनेचे नेते संजय राऊत यांना अटक झाली नाही तर शिंदे-फडणवीस सरकारची लाज जाईल, अशी परिस्थिती आहे. कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी दोन जणांना अटक झाल्यानंतर राऊत यांची तडफड वाढली आहे. घोटाळ्यातील मुख्य पात्र असलेले राऊत यांचे मित्र सुजीत पाटकर यांना अटक झाल्यानंतर यातली राजकीय कनेक्शन उघड होणार आहे. घोटाळ्यातील खरा लाभार्थी कोण, कोविड मृतांच्या टाळूवरचे लोणा खाणारा नेता कोण हे उघड होणार आहे.

विधिमंडळात राऊतांच्या गटारगंगेवर चर्चा होणार ही बाब उघडच होती. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी विधानसभेत हक्कभंग प्रस्तावाची सूचना दिली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी तर राऊतांना अटक करण्याची मागणी केली आहे.

दहिसर आणि वरळी येथील कोविड सेंटरचे काम घेताना घोटाळा करणाऱ्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट या फ्रॉड कंपनीची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी सुरू आहे. पोलिसांनी राजीव साळुंखे आणि सुनील उर्फ बाळा कदम या दोघांना अटक करून पहीला दणका दिला आहे. हे दोघे जुने शिवसैनिक आहेत. याच्यानंतर संजय राऊत यांचे मित्र आणि त्यांच्या परीवाराशी व्यावसायिक पाटकर यांचे संबंध उघड झाले आहेत. हा घोटाळा शंभर कोटींचा आहे, असे तक्रारदार भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.

बोगस कागदपत्र आणि खोट्या माहितीच्या आधारावर नोंदवलेली लाईफ लाईन ही कंपनी फक्त कोविड सेंटरचे कंत्राड मिळवण्यासाठी घाईघाईने बनवण्यात आली होती. पैसा लाटणे इतकाच या उपद्व्यापामागील उद्देश होता. हा उद्देश उघड झाला की बेस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड महामारीचे पक्ष नेत्यांना चरण्यासाठी कुरण कसे बनवले होते, याचा पर्दाफाश होईल. सुजीत पाटकर हा या प्रकरणातील केवळ एक मोहरा आहे. डमी आहे. प्रकरणाचा खरा सूत्रधार वेगळा आहे. पाटकर आत गेले की या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण हे समोर यायला फार वेळ जाणार नाही, त्यामुळेच राऊत यांची तडफड होत असावी.

हे ही वाचा:

‘कोविड प्रकरणात जवळच्या माणसाला अटक केल्यामुळे संजय राऊत प्रचंड निराश’

हिंगोलीत अल्पवयीन मुलाने कुह्राडीने केली वडिलांची हत्या

राहुल गांधी आता तपस्वी नाहीत

संजय राऊत यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे!

विधिमंडळाबाबत गरळ ओकणारे राऊत किती बिथरलेत याची कल्पना करा. त्यांचे नेते उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, राऊत यांचे बंधू सुनील राऊत आणि ठाकरे गटाचे अन्य आमदार याच सभागृहात बसतात. हे देखील चोर आहेत, अशी कबुली राऊत यांनी देऊन टाकली आहे.

विधिमंडळात गदारोळ झाल्यानंतर राऊत हादरले आणि त्यांची भाषा बदलली. आपण शिंदे गटाला चोर म्हटले होते, अशी सारवासारव त्यांनी केली. परंतु ते जे काही म्हणाले त्याचे सज्जड पुरावे असल्यामुळे त्यांची चलाखी खपणार नाही.
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना दाखल केली आहे. विधानसभेत त्यांनी राऊतांची पिसं काढली. एका महिलेने विरोधात तक्रार केली म्हणून तिच्याविरोधात अर्वाच्च शिवीगाळ करणारे आणि एका आर्थिक गुन्ह्यात तुरुंगाची शंभर दिवस हवा खाऊन आलेले राऊत विधिमंडळाला चोर म्हणतायत, असा घणाघात भातखळकर यांनी केला.

बायकांच्याविरोधात शिवीगाळ करायची, त्यांची घरे तोडायची ही यांची मर्दानगी. शेण खायचे तुरुंगात जायचे आणि आव मात्र स्वातंत्र्य सेनानीचा आणायचा अशी यांची संस्कृती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अंगाशी आले की माफी मागून मोकळे व्हायचे अशी राऊतांना सवय आहे. मविआ सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांची बनावट स्टँप पेपर प्रकरणात ईडी चौकशीचे आदेश विशेष पीएमएलए कोर्टाने दिल्याची बातमी सामनाने दिली होती. बातमी सपशेल खोटी होती, याप्रकरणात खुलासा छापून कार्यकारींनी या प्रकरणातून सुटका करून घेतली.
विधिमंडळ प्रकरणात देखील माफी मागून निसटण्याचा प्रयत्न करतील, कारण वारंवार चुका करून माफी मागण्या इतपत पुरेसा निर्लज्जपणा राऊतांकडे आहेच. राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील आरोपी आहेत, एका महिलेला शिवीगाळ करण्याबाबत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे. लाईफलाईन प्रकरणातही ते गोत्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चहूबाजूने कोंडी झालेला बोका कसा फिसकारतो तसे राऊतांचे झाले आहे.

बकवास करणे, शिवीगाळ करणे ही संजय राऊतांची सवय बनली आहे, आता विधिमंडळाची अब्रू काढल्यानंतर तरी त्यांच्यावर कठोर कारावाई होणार काय, हा सवाल आहे. हे प्रकरण आता विधिमंडळाच्या हक्कभंग समिती समोर जाईल. त्यांच्यासमोर सुनावणी होईल. याबाबत समितीने दिलेल्या अहवालावर विधीमंडळ निर्णय घेईल, अशी ही वेळ खाऊ प्रक्रिया आहे. या दरम्यान राऊत आणखी शंभरवेळा तोंड उघडून वातावरण खराब करतील. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील प्रदूषण म्हणून इतिहास राऊतांची नक्कीच दखल घेईल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा