29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरसंपादकीयरोहित पवारांनी राहुल-राऊतांना खुळ्यात काढले?

रोहित पवारांनी राहुल-राऊतांना खुळ्यात काढले?

रोहित यांची भूमिका म्हणजे राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना खुळ्यात काढण्याचा प्रयत्न आहे.

Google News Follow

Related

काँग्रेससह देशातील विरोधी पक्ष उद्योगपती गौतम अदाणी यांना घेरण्याचा प्रयत्न करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी त्यांचे उघड समर्थन केले आहे. हिंडेनबर्ग अहवालावर ताशेरे ओढले आहेत. रोहित पवारांची ही कृती म्हणजे अदाणी समुहावरून देशात गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना चपराक आहे.

अदाणींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना खुळ्यात काढण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेचा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत समारोप केला. त्या आधी ते लोकसभेतही बोलले. पंतप्रधानांच्या आधी लोकसभेत बोलणाऱे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदाणी समुहावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चा भरकटवण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळे मोदींनी राहुल यांच्या आरोपांना अनुल्लेखाने मारले.

राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणा दरम्यान काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गदारोळ घातला. संयुक्त संसदीय समिती द्वारे या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली. त्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. कारण रोहित पवार हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नाहीत, तर शरद पवारांचे नातू आहेत. अदाणी प्रकरण पेटवण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असताना शरद पवार यांनी या मुद्यावर मौन बाळगले आहे. कोणताही मुद्दा घेऊन भाजपा, केंद्र सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारला झोडण्याच्या पवित्र्यात असलेल्या खासदार सुप्रिया सुळेही गप्प आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे तर क्वचितच भाजपाच्या विरोधात बोलतात. त्यामुळे ते या मुद्यावरही बोलले नाहीत.

अदाणी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी अलिकडेच पवार कुटुंबियांच्या निमंत्रणावरून बारामती येथे गेले होते. त्यावेळी रोहित पवार स्वत: कार चालवत त्यांना सभास्थानी घेऊन गेले होते. अदाणी आणि पवार कुटुंबियांचे संबंध जुने आहेत. शरद पवार यांनी हे संबंध कधीही नाकारलेले नाहीत. तसे अदाणी यांचे देशातील प्रत्येक राजकीय पक्षाशी घनिष्ठ संबंध आहेत. परंतु ते आता अडचणीत असताना विरोधकांपैकी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा त्यांच्या बाजूने उघडपणे बोलला आहे. म्हणजे अदाणी यांच्या मुद्यावर विरोधकांमध्ये फूट पडली आहे असे चित्र आता दिसते आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेत आरोप प्रत्यारोपांची ठोसेबाजी

उत्तर प्रदेश राज्यात खुल जा सिम सिम, पैशाचा पाऊस आला रिमझिम

सोन्याचा दात चमकला आणि आरोपी सापडला!

समुद्राखालील बोगदा प्रवासाचा थरार..२१ किमीचे अंतर १० ते १२ मिनिटात

शॉर्ट सेल मारून प्रचंड फायदा कमावणे हा हिंडेनबर्ग अहवालाचा हेतू होता, असे रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे. देशातील युवकांना मोठ्या संख्येने मिळणारे रोजगार बड्या उद्योग समुहाकडूनच मिळतात. त्यामध्ये रिलायन्स, टाटा यांच्यासोबत अदाणी समुहाचेही नाव आहे. आता या पेच प्रसंगात अदाणी यांनी एकालाही कामावर काढू नये अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी एकीकडे देशात बेरोजगारी वाढल्याचा दावा करतात. दुसऱ्या बाजूला देशातल्या बड्या उद्योगपतीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यांचे नव्याने शिष्यत्व पत्करलेले संजय राऊत त्यांची री ओढतायत. जणू अदाणींना बुडवायचा त्यांनी पण केलेला आहे. असा माहोल असताना रोहित पवार यांनी उघडपणे अदाणींची बाजू घेणे याचा अर्थ राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या बडबडीकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे, त्याला काडीचीही किंमत दिलेली नाही. देशातील उद्योगपती ही देशाची शान असते, ही मंडळी देशात संपत्ती निर्माण करण्याचे काम करतात. रोजगार निर्माण करतात. परंतु गेल्या काही दिवसातील चित्र आपण पाहिले तर उद्योगपतींना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे.

स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे, असे सांगून रत्नागिरी रीफायनरी सारख्या बड्या प्रकल्पांना विरोध केला जातो आहे. उद्योगपतींच्या घराखाली स्फोटके ठेवली जातात. देशातल्या उद्योग जगताच्याविरोधात ही कारस्थाने करणारी मंडळीच बेरोजगारीच्या नावाने टाहो फोडत असतात. अदाणी अडचणीत असताना पवार कुटुंबिय त्यांच्यासोबत असलेले संबंध विसरले नाही. रोहित पवार यांनी त्यांची उघडपणे बाजू घेतली हे कौतुकास्पद आहे. भारतात असो किंवा विदेशात कोणताही उद्योगपती कायद्याच्या चौकटीत काम करत नाही. गळेकापू स्पर्धेच्या काळात चार पावले पुढे जाण्यासाठी सर्व प्रकारचे हथकंडे वापरले जातात. याला एखादाच सन्मानीय अपवाद असू शकतो. अदाणींचे दामन पूर्णपणे साफ नसेलही. परंतु या देशाला अदाणींची आवश्यकता आहे, याबाबत कुणाचे दुमत नसेल. देशाला गरुडभरारी घेण्यासाठी अदाणींसारख्यांची गरज आहे. हे पंख छाटणाऱ्यांविरोधात रोहित पवार यांनी बोलण्याचे धाडस केले, म्हणून त्यांचे अभिनंदन करायला हवे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा