कोकणातील रिफायनरी बाबत महाराष्ट्र सरकारने मनपरिवर्तन झाले आहे, असा दावा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. अर्थात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या संदर्भात काही महत्वाची चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक असल्याने प्रधान यांनी तसे संकेत दिले आहेत. रत्नागिरी दौऱ्यात प्रदूषण न होण्याची हमी दिल्यास प्रकल्प मार्गी लागू शकतो असे वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. शिवसेना अजूनही ताकाला जाऊन भांडे लपवते आहे.