नागपूरमध्ये काल दंगल झाली. जे घडले त्यात फारसे काही आश्चर्यकारक नाही. दंगली घडवण्याच्या दृष्टीने गेला बराच काळ देशात वातावरण निर्मिती सुरू आहे. महाराष्ट्रातही तयारी सुरू होती. वक्फ सुधारणा विधेयकावरून मुस्लीमांचे धार्मिक नेते चिथावणीखोर विधाने करून माथी भडकवण्याचे काम करतायत. माथी पेटलेली आहेत हे होळीच्या दिवशी रत्नागिरी, अलिबागमध्ये निर्माण झालेला तणावावरून स्पष्ट झाले. नागपुरात फक्त औंरंगजेब फॅक्टरची भर पडली.
शिवजयंतीच्या दिवशी विहिंपचे आंदोलन औरंगजेबाची प्रतिकात्म कबर जाळण्याचे आंदोलन झाले नसते तरी दुसऱ्या एखाद्या मुद्द्यावरून ही दंगल झालीच असती. दारुगोळा तयार होता, त्यांना फक्त ठिणगी हवी होती. होळी, शिवजयंतीच्या मुहूर्तावर हिंदूंवर हल्ले करण्यापर्यंत दंगेखोरांची मजल गेलेली आहे. नागपुरातील महाल, चिटणीस पार्क एरीयाला लागून असलेला मोमीनपुरा, भालदारपुरा या मुस्लीम वस्त्या. हिंदू वस्तीला लागून चार-पाच मशिदी आहेत. चिटणीस पार्कमध्ये विहिंपने इथे औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली. या कबरीसोबत म्हणे मुस्लीम आयत असलेली चादर जाळली म्हणून ही दंगल झाली. दंगा करायचा असेल तर मुस्लीमांना कोणतेही कारण पुरते.
म्यानमारमध्ये मुस्लीमांवर अत्याचार होत असल्याचे कारण पुढे करून २०१२ मध्ये मुस्लिमांनी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. ज्याचे पर्यवसान पुढे दंगलीत झाले. मशिदी समोर वाद्य वाजली, मशीदीवर रंग उडाला, जुम्म्याच्या दिवशी हिंदू होळी खेळले, अशा कोणत्याही कारणामुळे दंगल होऊ शकते. आम्हाला संगीत चालत नाही, म्हणून तुम्हीही ऐकू नका, आम्हाला रंग चालत नाही म्हणून तुम्हीही खेळू नका. जिथे आम्ही आहोत तिथे रंग, नको संगीत नको आणि तुमचे सणही नको. आम्ही जसे म्हणतो तसेच तुम्ही वागले पाहिजे हा कट्टरवाद्यांचा आग्रह आहे.
चिटणीस पार्क एरीयामध्ये हे आंदोलन झाले. हा परिसर संघ मुख्यालयापासून अगदी जवळ आहे. अडीचच्या सुमारास आंदोलन झाले. तेव्हा लगेचच काही झाले नाही. सायंकाळी इफ्तारीपर्यंत मुस्लिमांनी वाट पाहिली. आपली दुकाने बंद केली. गाड्या हटवल्या. त्यानंतर आधी घोषणाबाजी, नंतर दगडफेक आणि दंगल असा घटनाक्रम सुरू झाला. म्हणजे नुकसान फक्त हिंदूंचे व्हावे, आपले नुकसान होऊ नये याची पुरेपूर काळजी घेऊन ही दंगल घडवण्यात आली. अर्थात दंगल उर्त्स्फूत नव्हती. वेळ ठरवून करण्यात आली. होळीच्या सणाला दंगल होते, शिवजयंतीच्या दिवशी दंगल होते. हे मुहूर्त लक्षात घेतले की दंगा कोण घडवतो, याबाबत कोणाच्या मनात प्रश्नचिन्ह शिल्लक राहात नाही.
नागपूरातील दंगलीत दोन पोलिस उपायुक्त आणि काही पोलिस जखमी झाले आहेत. ही हानी आखणी वाढली असती. मोठा जमाव पोलिसांवर चालून जात होता, परंतु पोलिसांच्या मागे हिंदू मोठ्या संख्येने एकवटल्यामुळे दंगेखोरांना पळ काढावा लागला आणि पोलिस बचावले. दंगलींचा पॅटर्न लक्षात घ्या. सीएए कायद्यावरून दंगे भडकवण्याचा प्रयत्न झाला. कायदा होता, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातील हिंदूंना नागरीकत्व देण्याचा. मुस्लीम नेत्यांनी प्रचार केला की मुस्लिमांचे नागरीकत्व जाणार आहे. त्यातून दंगे झाले. आता वक्फ बोर्डाचे निमित्त झाले आहे. वक्फ सुधारणा विधेयक वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराला, जमिनी हडप करण्याच्या धंद्याला चाप लावण्यासाठी तयार करण्यात आले. जेव्हा जेव्हा मनमानीला, दंडेलीला चाप लावण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तेव्हा मुस्लिमांवर अन्याय होतो आहे, अशी ओरड करून पेटवापेटवी केली जाते. हिंदू सणवारांचा मुहूर्त साधून त्यांना लक्ष्य केले जाते.
काल सोमवारी जंतरमंतर येथे मुस्लिमांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन केले. इंडी आघाडीत सामील असलेल्या पक्षांच्या प्रतिनिधींनी इथे हजेरी लावली होती. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मोहमद फजलूर रहीम मुज्जादीदी आणि अन्य नेत्यांनी देशाभरात शाहीनबागेसारखी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. म्हणजे देशभरात चक्का जाम करायचा. अर्थकारण ठप्प करायचे असा डाव होता. परंतु अमेरिकेत सध्या बायडन सरकार नसल्यामुळे आंदोलन चालवण्यासाठी जी भरभक्कम रसद असते ती नसल्यामुळे शाहीनबागची धमकी प्रत्यक्षात उतरवता आली नाही.
मुस्लीम नेतृत्वात अस्वस्थता आहे. त्याची कारणे स्पष्ट आहेत. एके काळी दिल्लीच्या जामा मशिदीतून शाही इमाम सय्यद अहमद बुखारी फतवे काढायचा. राजकारणात त्याच्या फतव्यांना किंमत होती. २०१५ मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी बुखारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुखारीने लगेच आव्हान केले. ‘जातीयवादी शक्तींमुळे देश संकटात आहे, अशावेळी मुस्लीम मतांमध्ये फूट पडता कामा नये. जातीयवादी शक्तींना पराभूत करण्यासाठी एकगठ्ठा मतदान करा.’ अशा आवाहनांचा अलिकडे उपयोग होईनासा झाला.
बऱ्याच काळानंतर महाराष्ट्रात हा प्रयोग झाला. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग करून पाहिला. परंतु हिंदू मतदार एकवटल्यामुळे नोमानींच्या आवाहनाचे मविआवर बुमरॅंग झाले. एकगठ्ठा मतांमुळे सरकारची मानगुट मुस्लीम नेत्यांच्या हाती असे, ती आता राहिलेली नाही. कारण एकगठ्ठा मतांची जादू एकगठ्ठा हिंदू मतांमुळे फिकी पडली आहे. मुस्लीम मतांमध्ये वाटेकरी वाढले आहेत. नागपूरात दंगली झाल्यानंतर उबाठा शिवसेनेने दंगेखोर मुस्लीमांविरुद्ध अवाक्षर न काढता, सरकारवर ठपका ठेवला आहे. कारण विषय त्यांच्या नव्या मतपेढीशी संबंधित आहे. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण करण्याचा ठपका हिंदुत्ववाद्यांवर ठेवण्याचे काम काही राजकीय नेते करतायत. उद्या हेच नेते छावा सारखे खरा इतिहास दाखवणारे सिनेमे रिलीज करूच नका अशी मागणीही करतील. काश्मीर फाईल्सच्या विरोधात काही राजकीय पक्षांनी अशी आघाडी उघडलीही होती, हे अजूनही लोकांच्या लक्षात असेल.
हे ही वाचा:
गौतम गंभीर रायपूरमध्ये युवा क्रिकेटपटूंना देणार प्रशिक्षण
न्यूझीलंडने पाकिस्तानला धु धु धुतले!
बोटाच्या शस्त्रक्रियेनंतर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात
छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह रील, दोन मुस्लीम तरुणांना अटक!
वक्फ सुधारणा विधेयकाबाबत मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे नेते मेहमुद मदनी यांनी केलेले विधान ऐका. आम्ही कुर्बानीसाठी तयार आहोत, असे ते म्हणतायत.त्यांना कुर्बानी द्यायची नसून घ्यायची आहेत. नागपूरच्या दंगलीवरून ही बाब स्पष्ट झाली. मनमानी करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही, ही मुस्लीम नेतृत्वाची मानसिकता आहे. काँग्रेसच्या काळात सुरू असलेली दुकानदारी बंद होत असल्यामुळे ते सर्वसामान्य मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही कधी काळी हिंदुस्तानवर राज्य केले होते, या मानसिकतेतून बाहेर न पडलेला मुस्लीम समाज या दुकानदारी करणाऱ्या मुस्लीम नेत्यांच्या मागे फरफटत चालला आहे.
राजकीय नेत्यांना ही परिस्थिती हाताळण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक तर काँग्रेसच्या काळात सुरू असलेली मुस्लीम नेतृत्वाची दुकानदारी त्यांनी सुरू ठेवावी. पूर्वी प्रमाणे कट्टरतावादी मुस्लिमांची मनमानी त्यांनी सुरू ठेवावी. ते दुखावतील म्हणून काश्मीर फाईल्स, छावा सारखे सिनेमे प्रदर्शित होणार नाही, याची काळजी घ्यावी किंवा जिहादी मानसिकतेची वाळवी खणून काढावी आणि जाळून नष्ट करावी. जेणे करून देश शरीयानुसार नाही, संविधानानुसारच चालणार हे एकदा स्पष्ट होऊन जाईल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)