30 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरसंपादकीयसुनियोजित पत्रकार परिषदेत अदाणींनी केली राहुल गांधीची सुटका...

सुनियोजित पत्रकार परिषदेत अदाणींनी केली राहुल गांधीची सुटका…

वोट जिहादकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे हा राहुल गांधींचा प्रयत्न

Google News Follow

Related

काँग्रेसला प्राणवायू देणाऱ्या जो बायडन यांच्या डेमोक्रॅट्स पक्षाची अमेरिकी निवडणुकीत धुळधाण झाली, तेव्हापासून राहुल गांधी जरा नरमलेलच आहेत. भारतात बांगलादेशची पुनरावृत्ती होईल, आपण मोहमद युनूस यांच्यासारखे निवडणुकीशिवाय सत्तेवर येऊ हे त्यांचे स्वप्न भंगले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है…’ ही घोषणा देऊन काँग्रेसच्या वोट जिहादी रणनीतीचा बाजार उठवलेला आहे. या घोषणेचाही त्यांनी धसका घेतलेला दिसतो.

मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत हे ठसठशीतपणे समोर आले. कोणताही अडचणीचा प्रश्न येणार नाही, अशी फिल्डींग काँग्रेसच्या मीडिया टीमने लावली होती. तरीही वोट जिहादचा सवाल आलाच. उद्योगपती गौतम अदाणी यांचे नाव
घेऊन राहुल गांधी यांनी स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेचे काँग्रेस नेत्यांनी काटेकोर नियोजन केले होते. कोणते पत्रकार प्रश्न विचारणार हे आधीच ठरले होते. काँग्रेसची मीडिया टीम ज्याचे नाव घेईल त्यालाच प्रश्न विचारण्याची संधी मिळत होती. अर्थात कोणी प्रश्न विचारायचे हे ठरलेले होते. सोयीचे प्रश्नच पुढे येतील याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती.

पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. या घोषणेला उद्योगपती अदाणी यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा पत्रकार त्यांना ना या घोषणेबाबत
विचारत होते, ना वोट जिहादबाबत विचारत होते, ना मतांसाठी मविआने मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि ऑल इंडिया उलेमा कौन्सिलशी झालेल्या डील बाबत, ना मविआने मुस्लीम मतांची बेगमी करण्यासाठी हिंदूंवर वरवंटा चालवण्याचे जे आश्वासन दिले आहे, त्याबाबत. लुटूपुटूचे प्रश्न सुरू होते.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उद्योगपती इलॉन मस्क यांनी उघडपणे डोनाल्ड ट्रम्प यांची बाजू घेतली. त्यावर ट्रम्प विरोधकांनी प्रश्नचिन्ह लावले नाही. कारण उद्योगपती ही देशाची शान असते याचे भान तिथे आहे. भारतात मात्र भीकेचे डोहाळे लागलेला डावा अजेंडा राबवणारे राहुल गांधी देशात रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगपतींना टार्गेट करत असतात. एकाही पत्रकाराला त्यावर आक्षेप घ्यावासा वाटत नाही. कोणताही काम धंदा न करता शेकडो कोटींची माया जमवणारे गांधी-वाड्रा एका उद्योगपतीला लुटारू ठरवतात. निर्लज्जपणाचा कडेलोट म्हणजे काँग्रेस शासित राज्यात अदाणींना प्रकल्पही दिले जातात.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी अदाणींकडून शंभर कोटींची देणगी स्वीकारतात. ज्यांच्याकडून पैसे घ्यायचे, त्यांना लुटारू ठरवायचे हे राहुल गांधी यांचे निलाजरे राजकारण आहे. खूप टाळण्याचा प्रयत्न करूनही सज्जाद नोमानी आणि वोट जिहादचा सवाल एका पत्रकाराने विचारलाच. त्यावर मोदी तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले. राहुल गांधी लोकांना मूर्ख समजतात. काँग्रेसने हा वोट जिहाद देशाच्या राजकारणात भिनवलेला आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या दहशतवादी संघटनेवर केंद्र सरकारने बंदी आणली आहे. या संघटनेशी काँग्रेसचे साटेलोटे आहे. सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया(एसडीपीआय) ही पीएफआयची राजकीय शाखा. या
संघटनेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचा आरोप झाला, तेव्हा काँग्रेसने ही बाब स्पष्टपणे फेटाळली होती. परंतु मुख्यमंत्री एस.सिद्धरामय्या यांचे विश्वासू सहकारी एम. लक्ष्मण यांनी एसडीपीआयने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात उमेदवार मागे घेऊन काँग्रेसला पाठिंबा दिला अशी उघड कबुली दिली. विधानसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी काँग्रेसने कर्नाटकात सत्ता आल्या आल्या हिजाब
बंदी मागे घेतली. मुस्लिमांनी काहीही केले तरी गुन्हा दाखल करायचा नाही, मुस्लीम गुन्हा दाखल करायला आला तर समोरच्याने काहीही केले नसले तरी गुन्हा दाखल करायचा, असे अलिखित आदेश पोलिसांना गेले.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये दोन हिंदू मुलींच्या मृत्यूबद्दल निंदा

मणिपूरमधील हिंसाचाराशी संबंधित तीन प्रमुख प्रकरणे एनआयएकडे वर्ग

इस्रायलकडून हिजबुल्लाच्या मीडिया संबंध प्रमुखाचा खात्मा

आदिवासी बांधवांच्या जमिनी हडपणाऱ्यांना हद्दपार करा!

बंगळूरुमध्ये हनुमान चालीसा ऐकणाऱ्या दुकानदाराला मुस्लिमांनी केलेली मारहाण आणि त्याच्याच विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हे या धोरणाचे केवळ एक उदाहरण आहे. हेच अखिलेश यादव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात घडत होते. सपाच्या सत्तेची सूत्र अतीक अहमद आणि मुख्तार अन्सारी यांच्यासारखे मुस्लीम माफीया सांभाळत होते. हीच मुस्लीम मतांची किंमत असते. महाराष्ट्रात तर निवडणुकीच्या आधीच काँग्रेसने मुस्लिमांच्या काय काय मागण्या मान्य केल्या हे जनतेच्या समोर आलेले आहे. भगवा महाराष्ट्र हिरवा करण्याची मविआने तयारी दाखवलेली आहे. गड किल्ल्यांवर मशीदी उभ्या करण्याचे मान्य केलेले आहे.

काँग्रेस आणि मविआच्या या मुस्लीम लांगूलचालना मुळेच ‘एक है तो सेफ है…’ आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ या दोन्ही घोषणा जनमानसावर ठसलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न नसून काँग्रेसी पप्पू राहुल गांधी यांनी अदाणींचे नाव घेऊन महाराष्ट्रात सुरू असलेल्या वोट जिहादकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे असा प्रयत्न केलेला आहे. सज्जाद नोमानी याच्यासारख्या वोट जिहादींचा राहुल गांधी यांच्यावर प्रचंड
पगडा आहे. ज्या धारावीचा पुळका आल्यासारखे राहुल गांधी बोलत होते, त्या धारावीच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी नाकारला. कारण राहुल गांधी हे वोट जिहादचे सिपहसालार आहेत.
जिहादचे सिपहसालार असलेले राहुल गांधी छत्रपतींचा पुतळा स्वीकारतील तरी कसा?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा