25 C
Mumbai
Wednesday, September 18, 2024
घरसंपादकीयपप्पू, पन्नू आणि पनौती...

पप्पू, पन्नू आणि पनौती…

जगाच्या पाठीवर एकही असा देश नाही, ज्याच्या नेता दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतो.

Google News Follow

Related

भारताबाबत गरळ ओकणे, भारतविरोधी शक्तींशी गळाभेट घेणे, भारताच्या शत्रूंचे भारतविरोधी नरेटीव्ह मजबूत करणे हा राहुल गांधी यांच्या सर्वच विदेश दौऱ्यातील स्थायी कार्यक्रम असतो. अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी केलेली विधाने त्यांची भारतविरोधी मानसिकता स्पष्ट करणारी आहेत. देशाची बदनाम करणारी, देशाला हानीकारक अशा प्रकारची आहेत. भारतात शिखांना धार्मिक स्वातंत्र्य नाही, असे विधान राहुल गांधी करतात, सिख फॉर जस्टीस नावाच्या फुटीरवादी संघटनेचा प्रमुख गुरुपतवंत सिंह पन्नू या विधानावरून त्याचा खलिस्तानी एजेंडा पुढे रेटतो. इल्हान ओमर नावाची अमेरीकेतील भारत विरोधी, पाक समर्थक सिनेटर राहुल गांधी यांना भेटते यावरून त्यांच्या अमेरीकी दौऱ्यात नेमके काय शिजते आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते.

काँग्रेस नेते म्हणून राहुल गांधी यांना जो वारसा आहे तो अत्यंत भव्य दिव्य आहे. यांच्या पणजोबा जवाहरलाल नेहरुंनी काश्मीर प्रश्न निर्माण केला, आजी इंदिरा गांधी यांनी खलिस्तानचे भूत आणि भिंद्रावाले नावाचा भस्मासूर निर्माण केले. तो भस्मासूर जेव्हा त्यांच्यावर उलटला, त्यांची हत्या झाली, तेव्हा काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील गल्लीगल्लीत फिरून शिखांचे शिरकाण केले, गळ्यात टायर घालून शिखांना जाळण्यात आले. शिख महिलांवर बलात्कार केले. जगदीश टायटलर, सज्जन कुमार, कमलनाथ हे काँग्रेस नेते यात आघाडीवर होते. सुमारे चार हजार शिखांची कत्तल झाली. मोठे झाड जेव्हा कोसळते तेव्हा जमीनीला हादरे बसतात, या शब्दात राहुल यांच्या वडिलांनी म्हणजे राजीव गांधींनी या हत्याकांडाचे समर्थन केले होते. त्यांचे वारसदार राहुल गांधी अमेरिकेत जाऊन सांगतायत की शिखांना भारतात पगडी घालण्यास, कडा घालण्यास बंदी केली जाते आहे. बेशरमपणालाही लाज वाटेल असे राहुल यांचे विधान आहे.

भारतात तर आव जाव घर तुम्हारा अशी परिस्थिती आहे. उपऱ्यांनाही बंदी नाही. म्हणून तर देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले नसताना सोनिया गांधी भारतात मतदार बनल्या. एक इटालियन बाई देशातील सर्वात मोठा पक्ष चालवत होती. पडद्याआडून तब्बल दहा वर्षे देशाच्या सत्तेची सूत्र सांभाळत होती. एवढी मोकळीढाकळी लोकशाही या देशात आहे. तरीही राहुल गांधी या देशाबद्दल खोटेनाटे पेरत असतात. शिखांबाबत सुद्धा त्यांनी चुकीचे विधान केले. ‘सिख फॉर जस्टीस’ या संघटनेच्या माध्यमातून खलिस्तानचा अजेंडा राबवणारा गुरु पतवंतसिंह पन्नूने लगेचच राहुल गांधी यांचे समर्थन केले.

‘राहुल गांधी यांचे हे विधान अत्यंत साहसी आहे. स्वातंत्र्यापासून शिखांवर भारतात अत्याचार होत आहेत. शिखांना वेगळा देश मिळायला हवा, या आमच्या मागणीला राहुल गांधी यांच्या विधानामुळे बळ मिळाले आहे’. हा कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनमधून त्याच्या कारवाया चालवत असतो. राहुल गांधी विदेशात जाऊन नेमके काय करतात याची ही निव्वळ झलक आहे. ही भारतविरोधी टोळी आहे. एकाने विधान करायचे, दुसऱ्याने त्याच्यावरन प्रतिक्रिया द्यायची, टोळीतील काही पत्रकारांनी यावर लेख लिहायचे. भारतविरोधी अजेंडाची राळ उडवून द्यायची.

अमेरिकेत जॉर्ज सोरोस नावाचा एक एनजीओ माफीया आहे. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध आहे. समस्या ही नाही की तो मोदी विरोधी आहे. समस्या ही आहे की तो भारतविरोधी आहे, त्याला भारतात त्याच्यासमोर शेपूट हलवणारे दुबळे सरकार हवे आहे, त्यामुळे तो राहुल गांधी यांच्याकडे कायम आशेने पाहात असतो. कारण काँग्रेस सत्तेवर आली की देश विकण्याच्या प्रक्रियेला वेगाने सुरूवात होते. राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेशात दौऱ्यावर असतात तेव्हा या माफियाची माणसे त्यांच्या अवतीभवती असतात. फक्त खलिस्तानवादी नाही तर जिहादी इस्लामी ताकदी सुद्धा राहुल यांच्या भोवती एकवटतात.

मूळच्या सोमालियन असलेल्या अमेरिकेच्या कडव्या जिहादी सिनेटर इल्हान ओमर या देखील राहुल यांना भेटल्या. त्या डेमोक्रॅट्स आहेत. त्यांनी पाकव्याप्त गिलगिट बाल्टीस्तान येथे भेट देऊन भारतविरोधी वक्तव्य केली होती. त्यांच्या ज्यू विरोधी कारवाया आणि विधानांमुळे अमेरिकेच्या पराराष्ट्र व्यवहार समितीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
भारतात एक मोठी तुकडे गँग काम करते आहे. अनेक फुटीरवादी चळवळींचा यात सहभाग आहे. धर्मांतराची मोहीम राबवणारे चर्च, इस्लामी जिदाही, नक्षलवादी, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफीया या सगळ्यांचा या टुकडे गँगमध्ये सहभाग असतो. ही सगळी काँग्रेस राजवटीत बाळसं धरलेली पिल्ले आहेत. त्यांचे सहकार्य आणि समन्वय फक्त देशात नाही विदेशातही असतो. एका बाजूला खलिस्तानवादी पन्नू राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन करतो दुसऱ्या बाजूला इल्हान ओमर राहुल यांच्याशी गुजगोष्टी करते. अर्थात या गप्पा हवापाण्यावर झालेल्या नसणार. राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितले आहे की काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे. भारतातील सगळे कडवे जिहादी काँग्रेसच्या कृपाछत्राखालीच वावरत असतात. इल्हान ओमरने कलम ३७० रद्द कऱण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता. राहुल गांधीही ३७० कलमाचे कडवे समर्थक आहेत.

हे ही वाचा:

वॉशिंग्टनमध्ये राहुल गांधीनी ओकली गरळ !

गणेशमूर्तींच्या विटंबनेसाठी केला मुलांचा वापर !

कालिंदी एक्स्प्रेस प्रकरणात नामचीन गुंड शाहरुखला अटक !

‘राहुल गांधी, सोनिया गांधींनी चिनी कम्युनिस्ट पार्टीशी असा कोणता करार केला?’

राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या काही बडया नेत्यांनाही अमेरीका दौऱ्याची निमंत्रणे आहे. अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेसच्या कळसुत्री बाहुल्यांचा वापर करण्यासाठी अमेरिकेतील अनेकजण इच्छुक आहे. कदाचित अमेरीकेचे सत्ताधारी सुद्धा. जगाच्या पाठीवर एकही असा देश नाही, ज्याच्या नेता दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतो. देशाच्या हितशत्रूंच्या गाठीभेटी करतो. त्यांच्यासोबत भारत विरोधी खलबतं करतो. राहुल गांधी या नियमाला असलेले एकमेव अपवाद आहेत. तरीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे जोडे डोक्यावर घेऊन फिरत असतात. मित्र पक्षही याला अपवाद नाही.

इल्हान ओमरने कॅनडातील निज्जर हत्या प्रकरणावरून भारतावर टीका केलेली तेव्हा उबाठा शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक्सवरून त्यांच्यावर घणाघाती टीका केलेली. सध्या उबाठा शिवसेना हा पक्ष राहुल गांधी यांच्या दावणीला बांधला गेला आहे. आता इल्हान ओमर यांच्यावर टीका करण्यास चतुर्वेदी धजावणार नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. परंतु ही टीका पुरेशी नाही, जनता या देशद्रोही कारवायांच्या विरोधात कारवाईच्या प्रतीक्षेत आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा