24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरसंपादकीयराहुल गांधी चुxया बनवतोय ! फेक नरेटीव्हचा ‘प्रकाश आंबेडकरी’ अनुवाद...

राहुल गांधी चुxया बनवतोय ! फेक नरेटीव्हचा ‘प्रकाश आंबेडकरी’ अनुवाद…

एका वाक्यात राहुल गांधी यांचा एजेंडा आंबेडकरी जनतेच्या समोर प्रकाश आंबेडकरांनी उघड केला

Google News Follow

Related

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लातूरात पहीली प्रचारसभा घेतली. आंबेडकरांच्या सभांमध्ये एकेक करून सगळ्यांचा हिशोब केला जातो. आळीपाळीने राज्यातील तमाम नेत्यांवर तोफ डागली जाते. परंतु ते एखादे वाक्य
असे बोलून जातात की जे फक्त तेच बोलू शकतात. ज्याची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा होते. शुभारंभाच्या सभेत समोर उपस्थित आंबेडकरी जनतेला ते म्हणाले, ‘राहुल गांधी तुम्हाला चुतीया बनवतोय, एवढेच मी तुम्हाला सांगतो, त्याच्याशिवाय दुसरा शब्द माझ्याकडे नाही.’ आंबेडकरी जनतेच्या समोर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाने नेहरुंच्या पणतूची पोलखोल केली.

लातूरमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी जे काही सांगितले ते खरमरीत सत्य असले तरी यापूर्वी इतक्या उघड्यावाघड्या शब्दात हे कोणी सांगितलेले नव्हते. लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी जनता आपल्या बाजूला वळवण्यासाठी राहुल
गांधी सातत्याने दर सभेत संविधान नाचवत होते. आम्ही सत्तेवर आलो तर आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने लावलेली ५० टक्क्यांची मर्यादा वाढवू असे सांगत होते. पंतप्रधान मोदी संविधान बदलणार, असा दावा करत होते. विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी तेच तुणतुणे वाजवत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी ही टिप्पणी केलेली आहे.

महाराष्ट्रातील एका प्रमुख दलित नेत्याने आंबेडकरी जनतेसमोर राहुल यांची पोलखोल केलेली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून राहल गांधी काँग्रेसचे स्टार प्रचारक राहिलेले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली २०१९ ची आणि २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक लढवली गेली. पहील्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचे मुद्दे वेगळेच होते. २०१४ पूर्वी यूपीएचेच सरकार होते. तेव्हा २०१९ मध्ये राहुल गांधी राफेल भ्रष्टाचारावर बोलत होते. जातीगत जनगणनेबाबत ते एकही अक्षर बोलले
नाहीत.

हे ही वाचा:

भारतीय क्रिकेटपटू संजय बांगरचा मुलगा आर्यन झाला अनया!

बॅगेची तपासणी होताच उद्धव ठाकरेंची आग-आग

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या रेवन्नाचा जामीन अर्ज फेटाळला

काँग्रेसकडून समाजात फूट, राष्ट्रीय शत्रूंविरोधात एकत्र येण्याची गरज!

देशात यूपीएची सत्ता १० वर्षे होती. पंतप्रधानपदी डॉ. मनमोहन सिंह नावाचे कळसूत्री बाहुले होते, परंत प्रत्यक्षात सत्ता सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या हातीच एकवटली होती. पंतप्रधानांनी काढलेला अध्यादेश फाडून टाकून त्यांचे जाहीर हसे करण्याइतपत राजकीय बळ राहुल गांधी यांच्या हाती होते. तेव्हा त्या बळाचा वापर करावा, जातीगत जनगणनेचा विषय मार्गी लावावा असे राहुल गांधीना वाटले नाही. यूपीएच्या १० वर्षात, ही सत्ता गेल्यानंतर पुढची १० वर्षे जे काही राहुल गांधी यांना सुचले नाही ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी कसे सूचले हा सवाल अनुत्तरीत आहेच? बिहार सरकारने २०२२ मध्ये जातीगत जनगणना केल्यानंतर राहुल गांधी यांना हा मुद्दा सत्तेवर जाण्यासाठी उपयोगी पडू शकेल असे वाटू लागले.

हे सत्य देशातील प्रत्येक राजकीय नेत्याला माहिती आहे, तसे ते बाळासाहेब आंबेडकरांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी एका वाक्यात राहुल गांधी यांचा एजेंडा आंबेडकरी जनतेच्या समोर उघड केला आहे. राहुल गांधींना जातीचे राजकारण रेटण्याची इतकी गरज का वाटावी, याचे कारणही स्पष्ट आहे. भाजपाच्या हिंदुत्वावर उतारा म्हणून त्यांनी जातीचा मुद्दा
पुढे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहील्या दोन टर्ममध्ये विकासाचा एजेंडा राबवला असला तरी सरकारचा चेहरा हिंदुत्वावादी राहिला. मोदींनी त्यांच्या प्रचाराचा नारळ २०१४ मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन
घेतल्यानंतर फोडला. त्यांच्याच कारकीर्दीत अयोद्धेत भव्य मंदीर उभे राहिले, भव्य काशी कॉरीडोअरची निर्मिती झाली.

 

डोक्यावर भस्म रगडून गंगाआरती करणारा पंतप्रधान ही त्यांची प्रतिमा अवघ्या हिंदू समाजाला सुखावणारी होती. हिंदुत्व मजबूत असेपर्यंत मोदींना हरवणे कठीण याची जाणीव झाल्यामुळे राहुल गांधी यांनी हिंदू तोडो अभियान सुरू केले. फोडा आणि झोडाची नीती वापरली. जातीगत जनगणनेचा खुळखुळा वाजवायाला सुरूवात केली. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी कबुली दिली की आम्हाला फेक नरेटीव्हचा सामना करता आला नाही. प्रकाश आंबेडकरांनी फेक नरेटीव्हचा अस्सल शहरी बोलीत लातूरच्या सभेत केलेला अनुवाद म्हणजे राहुल गांधी तुम्हाला चुतीया बनवयात.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा