23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयसंथगती मागचे सत्य, बिघाडा मागचा बोभाटा…

संथगती मागचे सत्य, बिघाडा मागचा बोभाटा…

मतदान संथ गतीने होत असेल तर त्याचा फटका फक्त मविआच्या उमेदवारांना कसा बसेल?

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान काल सोमवारी पार पडले. या टप्प्यात महाराष्ट्रात ईव्हीएम मशीनचा वेग जाणीवपूर्वक कमी करण्यात आला. पराभवाची खात्री झाल्यामुळे मतदान यंत्रणा बिघडवल्याचा आरोप उबाठा शिवसेनेने केलेला आहे. रोज उठून एक नवा आरोप करण्याच्या शिरस्त्यामुळे मुळात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे आरोप कोणीही फार गांभीर्याने घेत नाही. तरीही हा विषय मतदानाच्या संदर्भात असल्यामुळे त्यांच्या ताज्या आरोपा मागचे सत्य समोर येणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील १३ जागांसाठी काल मतदान झाले. अनेक ठिकाणी सकाळ पासून रांगा लागल्या होत्या. मतदान संथ गतीने होत होते, त्यामुळे रांगा पुढे सरकत नव्हत्या. लोक याबाबत तक्रार करत होते ही वस्तूस्थिती आहे. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम ही बाब निवडणूक आय़ोगाच्या निदर्शनास आणली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उबाठा शिवसेनेला नुकसान पोहोचवण्यासाठी हे घडवण्यात आले असा आरोप काल मतदानाच्या दिवशी केला. दुसऱ्या दिवशी संजय राऊतांनी त्याची री ओढली.

पराभवाची खात्री झाल्यामुळे मतदान यंत्रणा बिघ़डवण्यात आली, असा आरोप राऊतांनी केला आहे. मतदान संथ गतीने होत असेल तर त्याचा फटका फक्त मविआच्या उमेदवारांना कसा बसेल? तो महायुतीच्या मतदारांनाही बसणार. म्हणून राऊतांचा आरोप मुळात हास्यास्पद आहे. मुंबई पुरते उदाहरण द्यायचे झाले तर उत्तर मुंबई हा भाजपाचा गड मानला जातो. २०१९ च्या निवडणुकीत या मतदार संघातून गोपाळ शेट्टी विक्रमी मतांनी विजयी झाले होते. या मतदार संघात ६०.०९ टक्के मतदान झाले होते. गोपाल शेट्टी यांना ७१.४ टक्के मतदान झाले होते. काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना २४.३९ टक्के मतदान झाले होते. ४ लाख ६५ हजार २४७ इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले होते.

राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारी नुसार २०२४ च्या निवडणुकीत संध्याकाळी ६ पर्यंत झालेल्या मतदानाचा आकडा अंदाजे ५५.२१ टक्के आहे. यात थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात सुमारे ४ टक्क्यांची घट झालेली आहे. त्यामुळे मतदान कमी झाल्याचा फटका फक्त मविआला बसल्याचा जो दावा करण्यात येतोय, तो निव्वळ आधारहीन आणि बोगस आहे.

महाराष्ट्रभरातील मतदान पाहिले तर २०१९ तुलनेत प्रचंड फरक पडलाय असे चित्र दिसत नाही. धुळ्यात ५६.६१ टक्के मतदान झाले, २०१९ मध्ये ते ५७.०५ टक्के होते. दिंडोरीत ६२.६६ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये ६५.७१ टक्के होते. नाशिकमध्ये ५७.१० टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये ५९.५३ टक्के होते. पालघरमध्ये ६१.६५ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये ते ६३.७६ टक्के होते.

**भिवंडीमध्ये ५६.४१ टक्के मतदान झाले, गेल्या वेळी ५३.२० टक्के होते. *कल्याणमध्ये ४७.०७ टक्के मतदान झाले, गेल्या वेळी ४५.३१ टक्के होते. **ठाणे मतदार संघात ४९.८१ टक्के मतदान झाले, गेल्या वेळी ४४.३९ टक्के होते.
मुंबई उत्तर मध्य ५१.४२ टक्के मतदान झाले, गेल्या वेळी ५३.६८ टक्के होते. मुंबई उत्तर पूर्व ५३.७५ टक्के मतदान झाले, गेल्या वेळी ते ५७.२३ टक्के होते. मुंबई उत्तर पश्चिम ५३.६७ टक्के मतदान झाले, गेल्या वेळी ५४.३१ टक्के होते. मुंबई दक्षिण ४७.७० टक्के मतदान झाले, गेल्या वेळी ५१.५९ टक्के होते. मुंबई दक्षिण मध्य ५१.८८ मतदान झाले, गेल्या वेळी ५५.४० टक्के होते.

 

भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन मतदार केंद्रात मतदान वाढले आहे. धुळे, मुंबई उत्तर पश्चिममध्ये २०१९ च्या तुलनेत एक किंवा त्यापेक्षा कमी फरक आहे. बाकी मतदार संघात मतदान २ ते चार टक्के कमी झाले आहे. २०१९ मध्ये झालेल्या मतदानाच्या तुलनेत हा फरक आधीच्या चार टप्प्यांमध्येही झालेला आहे. मुंबई मतदान संथ झाले, तरीही लोकांनी दोन-दोन तास मतदानाच्या रांगेत उभे राहून चिवटपणे मतदान केलेले आहे. काही प्रमाणात फटका पडला असल्याचे मान्यही केले तर तो फक्त उबाठा शिवसेनेला कसा पडेल? तांत्रिक बिघाडामुळे जे काही झाले ते सगळ्याच ठिकाणी झालेले आहे.

हे ही वाचा:

सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ

विमानाच्या धडकेत ४० फ्लेमिंगोंचा मृत्यू

बारावीच्या निकालात मुलींची बाजी; राज्याचा एकूण निकाल ९३.३७ टक्के

बारामुल्लामधील जनतेने मोदींना खुश केले!

 

पराभवाच्या खात्रीमुळे जाणीवपूर्वक हा बिघाड निर्माण करण्यात आला, हा आरोप हास्यास्पद आहे. मतदान केंद्रात सर्व पक्षीय पोलिंग एजंट असतात, निवडणूक आयोगाचे अधिकारी असतात, पोलिस असतात. बाहेर रांगा लावून मतदार उभे असतात. पत्रकार फिरत असतात. अशा परिस्थिती मध्ये बिघाड निर्माण कसा करता येईल. मतदान यंत्र रीमोटने स्लो आणि फास्ट करायला तो पंखा किंवा एसी थोडाच आहे. २०२४ निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवीगाळ आणि विखारयुक्त प्रचार केला, त्यावरून ते प्रचंड अस्वस्थ होते ही बाब उघडच आहे.

निवडणुकीत कमी झाले तर ते सरकारच्या बाजूचे आणि जास्त झाले की विरोधात असा काही ठोकताळा नाही. याच्या उलट झाले तरीही त्यातून मतदारांचा कल लक्षात येत नाही. परंतु उद्धव ठाकरे, शरद पवार यांची वक्तव्य आणि शारीर भाषा लक्षात घेतली तर त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे ही बाब मात्र स्पष्ट दिसते. निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी जो कडवटपणा निर्माण केलेला आहे, तो आता त्यांच्या गळ्याशी येतोय एवढाच त्यांच्या ताज्या वक्तव्याचा अर्थ
आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा