25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरसंपादकीयअशा दहा गोष्टी ज्यामुळे मोदींचे अप्रूप वाटते...

अशा दहा गोष्टी ज्यामुळे मोदींचे अप्रूप वाटते…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त...

Google News Follow

Related

राम जन्मभूमी मुक्तीसाठी भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांनी भव्य रथयात्रा काढली. त्यापूर्वी संघ परिवाराने देशभरात राम शीला पूजनाचा उपक्रम राबवून जबरदस्त वातावरण निर्मिती केली होती. १९९२ बाबरी मशीद तर कोसळली, परंतु तरीही न्यायालयाच्या गुंत्यात अडकलेला हा मुद्दा तडीस नेण्यात हिंदू समाजाला यश कधी मिळेल, याचि देही याचि डोळा राम जन्मभूमीवर भव्य मंदीर बांधलेले पाहण्याचे भाग्य आपल्याला केव्हा मिळेल काय हा प्रश्न अनुत्तरीत होता. परंतु नरेंद्र मोदी ही व्यक्ती देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाली आणि अशक्य काहीच नाही असा भाव तमाम राष्ट्रवादी नागरिकांच्या मनात निर्माण झाला.

१) ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराचा भूमी पूजन सोहळा पार पडला आणि २०२३ च्या डिसेंबर महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. राम मंदिराचा शिलान्यास मोदींच्या हस्ते झाला त्याचे उद्घाटन सुद्धा तेच करतील अशी शक्यता आहे.

२) मोदीं सरकार सत्तेवर आले तेव्हा देशात इंदिरा गांधींच्या काळापासून रखडलेले सुमारे १० लाख कोटी रुपयांचे प्रकल्प लोंबकळले होते. मोदींनी केवळ यापैकी बरेच प्रकल्प पूर्ण केले नाहीत तर एक नवी परंपरा देशात सुरू केली. ज्या प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला अशा अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. देशासाठी एक नवी उत्तम प्रथा त्यांनी सुरू केली. राम मंदीर, काशी विश्वनाथ कॉरीडोअर, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सेंट्रल विस्टा प्रकल्प, अशी अनेक उदाहरणे देता येतील.

३) देशात पंतप्रधान मोदी सत्तेवर येईपर्यंत देशाच्या माध्यमांमध्ये ज्या हेडलाईन्स होत्या त्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या होत्या. यूपीएचा कार्यकाळ आठवून पाहा. कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, रॉबर्ट वाड्रा यांचे जमीन घोटाळे अशा अनेक घोटाळ्यांबाबत चर्चा असायची. विकासाचा मुद्दा कुठे तरी हरवला होता. मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचार मुक्त शासन देशाला बहाल केले. भ्रष्टाचार बंद झाला, भ्रष्टाचाऱ्यांवर इतिहासातील सर्वात मोठी कारवाई सुरू झाली.

४) एखादा नेता सत्तेवर आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांचे, नातेवाईकांचे भले करण्याची परंपरा काँग्रेसच्या काळात निर्माण झाली होती. परंतु मोदींनी हा भाई भतीजावाद मोडून काढला. मोदींच्या कुटुंबियातील एकाही नातेवाईकाला मोदींनी फायदा करून दिला असे उदाहरण दुर्बिण घेऊन सापडत नाही. आई हिराबावर त्यांची श्रद्धा आहे, प्रेम आहे, परंतु ती माऊलीही त्यांच्या गुजरातेतील जुन्या घरात राहते.

५) नवरात्रीत मोदी नऊ दिवस कठोर उपवास करतात. फक्त कोमट पाणी पिऊन राहातात. वयाची सत्तरी उलटल्यानंतर त्यांनी हे व्रत अखंडपणे सुरू ठेवले आहे. या काळात कामांचा धडाका मात्र अखंडपणे सुरू असतो. नवरात्रीच्या काळात त्यांनी अमेरीकेचा दौराही केला होता. या काळातही ते फक्त पाणी पिऊन वावरत होते. काम करत होते.

६) देशाच्या मानगुटीवर बसलेले कलम ३७० आणि ३५ ए कधी मोडीत निघेल असे कुणाला वाटत नव्हते. मोदी असं काही तरी करणार आहेत याची कुण कुण लागल्यावर रक्ताचे पाट वाहतील, तिरंगा हाती धरणारा कोणी उरणार नाही, अशा धमक्या पीडीपी आणि नॅशनल काँफरन्सचे नेते देत होते. परंतु प्रत्यक्षात यातले काहीच झाले नाही. ज्या सहजपणे हा मामला मोदींनी पार पाडला, त्यानंतर काश्मीरचे त्रिभाजन केले त्याला सलाम केल्यावाचून राहवत नाही. असे नको असलेले १६०० कायदे या माणसाने मोडीत काढले.

हे ही वाचा:

पंतप्रधानांना मिळालेल्या १२०० पेक्षा जास्त भेटवस्तूंचा ई-लिलाव

खात्मा निजामी जुलुमाचा,दिवस मुक्ती संग्रामाचा

‘रझाकारांची पुढची औलाद मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील होत नाही’

लोकशाही आणि उद्योगविश्‍वात हवा समन्वय!

 

७) संकटात संधी शोधणारा नेता असे मोदींचे वर्णन करता येईल. ज्या देशात स्वातंत्र्यानंतर एकही लस विकसित झाली नाही. त्या देशाने अत्यल्प काळात कोरोनाची लस विकसित केली. देशवासियांना त्याचा फायदा झालाच शिवाय जगातील अनेक देशांनी या लसीचा लाभ घेतला. कोरोनामुळे भारतात मृत्यूचे तांडव होईल प्रचंड मोठ्या संख्यने लोकांचे बळी जातील ही सगळी भाकीतं मोदींनी साफ खोटी ठरवली. याच काळात एन ९५ मास्क, पीपई किट, व्हेंटीलेटर देशात बनत नव्हते. केवळ त्यांची निर्मीती सुरू झाली नाही, तर आपण मोठ्या संख्येने याची निर्यातही केली.

८) एअरो स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा (एपीआय), लष्करी सामुग्री अशा अनेक क्षेत्रात भारताचे अस्तित्व नाममात्र होते, या क्षेत्रात भारताचे अवलंबित्व कमी झाले, काही प्रमाणात भारताने निर्यातीलाही सुरूवात केली.

९) मोदी माफ नही करता अशी त्यांची प्रतिमा आहे. राजकारणातील त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला ते साफ करून टाकतात. घरगुती राजकारणात अशा डावपेचांमध्ये यशस्वी झालेले नेते आतंरराष्ट्रीय राजकारणात मात्र उताणे प़डलेले दिसतात. मोदी मात्र याला अपवाद आहेत. पाकिस्तानात त्यांनी केलेली सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. बराक ओबामापासून शिंजो आबे यांच्यापर्यंत अनेक नेत्यांशी ते बरोबरीच्या नेत्याने वागू शकतात. त्यांच्या खांद्यावर हात टाकून बोलू शकतात, हेही त्यांचे वैशिष्ट्य. मोदी दोस्तांचे दोस्त आणि दुष्मनांचे जानी दुष्मन आहेत.

१०) साद घालणारा नेता. मोदींनी आवाहन करावे आणि देशवासियांनी ती गोष्ट करावी असे चित्र वारंवार दिसते आहे. त्यांनी स्वच्छ भारतची हाक दिली, लोक रस्ते झाडण्यासाठी घराबाहेर पडले. कोरोनाच्या काळात त्यांनी जनता कर्फ्यूची हाक दिली, लोकांनी कडकडीत कर्फ्यू पाळला. मोदी ताली बजाओ म्हणाले लोकांनी टाळ्या वाजवल्या, त्यांनी दिवे लावायला सांगितले लोकांनी दिवे लावले. मोदींना लोक ज्या प्रकारे साथ देतायत ती अभूतपूर्व आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा