30 C
Mumbai
Friday, July 5, 2024
घरसंपादकीयमोदींसोबत, केतकरांनाही हॅट्ट्रिकची संधी...

मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्ट्रिकची संधी…

केतकरांची दोन भाकीतं चुकली तरीही त्यांचा निकालाबाबत अंदाज विचारला जातो

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचाराचा आज अखेरचा दिवस. १ जूनला सातव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. प्रत्येक जण आपल्या परीने निकालाचे अंदाज व्यक्त करत आहेत. वृत्तवाहिन्या तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन प्रेक्षकांच्या उत्सुकतेला खाद्य पुरवण्याचे काम करतायत. ४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक करतील, अशी दाट शक्यता आहे. मोदींच्या हॅट्ट्रिक सोबत ज्येष्ठ पत्रकार आणि माजी काँग्रेस खासदार कुमार केतकर यांचीही हॅट्ट्रिक होणार आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पार… ची घोषणा दिली. या घोषणेतील हवा काढण्यासाठी तिसऱ्या टप्प्यानंतर जाग आलेल्या काँग्रेसने भाजपाला साधे बहुमत मिळणार नाही, असे सांगायला सुरूवात केली. काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या नेत्यांच्या दाव्यानुसार सातव्या टप्प्याचा प्रचार संपेपर्यंत भाजपाला बहुमत मिळण्याची गोष्ट दूर राहिली रालोआलाही बहुमताचा आकडा पार करता येणार नाही, असे भाकीत करण्याची स्पर्धा सुरू झाली. इंडी आघाडीची सत्ता येते आहे, असेही आता काँग्रेसचे नेते सांगू लागले आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी एका मुलाखतीत नेमके हेच सांगितले आहे. भाजपाचा आकडा २१० च्या आसपास राहील, रालोआसह भाजपाच्या जागा २४० पर्यंत जातील.

भाजपाला स्वबळावर बहुमत मिळेल असे सांगणाऱ्या सेफॉलॉजिस्टबाबत बोलताना कुमार केतकर म्हणाले, प्रत्येक जण त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर भाकीतं करत असतो, परंतु त्यात विशफुल थिंकिंगचा भागही असतोच. काय होईल, त्यापेक्षा काय व्हायला हवे असे त्यांना वाटते, त्याचा प्रभाव अंदाजांवर होतो, असे केतकर म्हणाले. केतकरांच्या या विधानानंतर त्यांच्या भाकीतात या विशफुल थिंकींगचा भाग किती हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आम्हीच शोधण्याचा प्रयत्न केला.

केतकराची पत्रकारीता ही काँग्रेसशरण पत्रकारीचा राहिलेली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नसलेल्या कर्तृत्वाची भलामण करण्यासाठी त्यांनी बराच काळ लेखणी झिजवली. खासदारकीच्या रुपात त्यांना त्याचे बक्षीस ही मिळाले. प्रत्येक पत्रकाराचा कल कुठल्या तरी विचारधारेकडे असतोच, कुठला तरी नेता प्रत्येकाला प्रिय असतो. त्यामुळे केतकर यांचे काँग्रेसकडे झुकणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्यावर आक्षेप घेण्याचे कुणाला कारण नाही. प्रश्न फक्त त्यांच्या वारंवार चुकणाऱ्या भाकिताचा आहे.

एखादा भाजपा समर्थक जेव्हा केतकरांची भाकीतं ऐकतो तेव्हा त्याच्या उत्साहाचा पार कडेलोट होऊन जातो. त्याला ठामपणे वाटू लागते, की आता काही भाजपाचे खरे नाही. काँग्रेस समर्थकांमध्ये असा विश्वास निर्माण होतो की, काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता पूर्णपणे संपलेली नाही.

हे ही वाचा:

बोरिवलीत सव्वा कोटीचे ‘हेरॉईन’ जप्त; दोघांना अटक

आत्मविश्वास असावा तर असा… नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे ठिकाण, तारीखही ठरली!

सलमान खान गोळीबार प्रकरणी आणखी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

काशी-मथुराच्या मशिदींवरील दावा मुस्लिमांनी सोडावा!

ताज्या मुलाखतीत केतकर असे म्हणतात. नरेंद्र मोदी पराभूत होतील, पण ते पंतप्रधान पदाची हॅट्ट्रिक करतील. पराभूत होतील म्हणजे ४०० पार… चा जो दावा आहे, तो प्रत्यक्षात येणार नाही. भाजपाच्या जागा कमी होतील. हाती बहुमत नसताना पंतप्रधानपदासाठी आटापिटा करण्याची नामुष्की मोदींवर येईल. ते नाक मुठीत धरून रालोआतील अन्य पक्षांच्या मदतीने सत्तेवर येतील. हाच त्यांचा पराभव असेल. भाजपाच्या जागा ३०३ वरून २१० वर येतील किंवा त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात मिळालेल्या १८१ जागांपर्यंतही खाली येऊ शकतील, असे केतकर म्हणाले आहेत.

मोदींचा आटापिटा पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक करण्यासाठी असेल असे केतकर म्हणाले आहेत. त्यात किती तथ्य आहे, हे ४ जून रोजी उघड होईलच, परंतु केतकरांचा आटापिटाही हॅट्ट्रिक करण्यासाठीच सुरू आहे, असे आम्हाला ठामपणे वाटते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केतकरांनी केलेली भाकीतं, वर्तवलेले अंदाज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या अंदाजांच्या तुलनेत अजिबात वेगळे नाही. किंबहुना या सगळ्या अंदाजात कमालीचे साम्य आहे.

केतकरांचे कौतुक अशासाठी कि दोन वेळा त्यांचे अंदाज दणदणीत आपटल्यानंतरही तिसऱ्यांदा ते तेवढ्याच आत्मविश्वासाने भाकीतं करतात.

२०१४ मध्ये भाजपाला २०० चा आकडा गाठता आला तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, असे केतकर ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. राजदीप सरदेसाई यांच्या सारख्या काँग्रेसच्या दरबारी पत्रकाराला देशात मोदींची लाट दिसत असताना केतकर जर मोदींनी २०० चा आकडा पार केला तर… अशा प्रकारची भाषा या मुलाखतीत बोलताना आपल्याला दिसतील.

तज्ज्ञ सुद्धा माणसं असतात, त्यांच्याकडून चूक होऊ शकते. परंतु वारंवार चुका करणाऱ्यांना तज्ज्ञ का म्हणावं, त्यांना फार फार तर विशफूल थिंकर म्हणता येईल. केतकरांनी २०१४ नंतर तोच प्रयोग पुन्हा २०१९ मध्ये केला. द प्रिंट मध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे अंदाज व्यक्त केले. २०१४ मध्ये भाजपाला २८२ जागा मिळाल्या होत्या. त्या जागा २०१९ मध्ये ६० ते ६५ ने कमी होतील आणि मोदींच्या जागी पंतप्रधानपदावर नितीन गडकरी किंवा राजनाथ सिंह यांची वर्णी लागेल. केतकरांची सोनिया निष्ठा जशी अढळ आहे, तीच परिस्थिती त्यांच्या मोदी द्वेषाबाबत आहे. याच द्वेषापोटी ते मोदीं ऐवजी राहुल गांधी यांनाही पंतप्रधान म्हणून खपवून घेतील. परंतु सुदैवाने देशातील मतदार तेवढा वाया गेलेला नाही किंवा तो मोदीद्वेष्टाही नाही. २०१९ मध्ये  केतकर पुन्हा तोंडावर आपटले. मोदींना देशात मिळणारा पाठिंबा घटला नाहीच उलट वाढला. भाजपाने २८२ वरून ३०३ वर झेप घेतली.

केतकरांची दोन भाकीतं चुकली तरीही त्यांचा निकालाबाबत अंदाज विचारला जातो, भाजपाचे भवितव्य काय असा प्रश्न केला जातो. ज्यांच्या पक्षाला आणि त्यांना कोणतेही राजकीय भवितव्य उरलेले नसताना केतकर त्याच उत्साहात, नव्या दमाने अंदाज व्यक्त करतात. २०१९ मध्ये व्यक्त केलेला अंदाज २०२४ साठी कॉपी पेस्ट करतात.

कारणे तीच, मोदींच्या दहशतीला लोक कंटाळले आहेत. ८ हजार पत्रकार, नेते, मानवाधिकार कार्यकर्ते तुरुंगात आहेत, अशी घासलेली कारणे देतात. मोदी सत्तेवर आले तर हा आकडा वाढणार आहे, याची केतकरांनाही कल्पना आहे. भ्रष्टाचार करणारे मानवाधिकाराची ढाल घेऊन नक्षलवाद पसरवणारे यांच्यावर मोदी ३.० मध्ये वरवंटा चालणार आहे, असे मोदींनी स्वत:च जाहीर केले आहे. राजकीय नेता, पत्रकार आणि मानवाधिकारासाठी काम करून शेण खाण्याचा परवाना मिळतो असा बहुधा केतकरांचा समज असावा.

केतकरांचे भाकीत कॉपीपेस्ट आहे, असे सांगण्याचे कारण म्हणजे २०१९ मध्ये त्यांनी भाजपाच्या जागा ६०-६५ ने कमी होतील असे म्हटले होते. म्हणजे भाजपाच्या जागा २०१४ मध्ये मिळालेल्या २८२ वरून २१७ वर येतील. आता २०२४ मध्येही ते म्हणातायत की, भाजपा २१० च्या आसपास जागा मिळतील. केतकरांचे विशफुल थिंकींग भाजपाला २१० पलिकडे जाऊच देत नाही. त्यामुळे मोदी जर भाजपाच्या पूर्ण बहुमतासह तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर केतकरांच्या चुकलेल्या विशफुल थिंकींगची हॅट्ट्रिक होणार आहे. एवढे सातत्य त्यांच्याप्रमाणे फक्त योगेंद्र यादवांनाच राखता आले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा