26 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरसंपादकीयएकेकाळचे कट्टर वैरी बनले अदाणींचे तारणहार...

एकेकाळचे कट्टर वैरी बनले अदाणींचे तारणहार…

अदाणींची पत वाचवण्यासाठी एके काळचे एकमेकांचे कट्टर शत्रू देश धावून आले

Google News Follow

Related

अदाणी समुहाच्या एफपीओच्या मुहुर्तावर हिंडेंनबर्ग शॉर्ट सेलिंग एण्ड रिसर्च फर्मचा अहवाल बाहेर आला. या अहवालामुळे अदाणी समुहाच्या शेअर्सची प्रचंड घसरण झाली. २० हजार कोटीच्या एफपीओचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला. परंतु अखेरच्या दिवशी या एफपीओला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अदाणींची पत वाचवण्यासाठी एके काळचे एकमेकांचे कट्टर शत्रू देश धावून आले हे विशेष.

अबु धाबीच्या इंटरनॅशनल होल्डींग कंपनीने या एफपीओमध्ये ४०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा ३२८० कोटी रुपये इतका प्रचंड आहे. ही कंपनी संयुक्त अरब अमिरातीच्या राजघराण्यातील सदस्यांच्या मालकीची आहे. अदाणी समुहाच्या क्षमतेवर आमचा विश्वास असून या गुंतवणुकीतून आमच्या शेअर होल्डर्सचे हितच होईल असे विधान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद बशर शुएब यांनी केले आहे.

जेव्हा आयएचसीने या एफपीओमध्ये गुंतवणूक केली तेव्हा एफपीओला फक्त ३ टक्के प्रतिसाद मिळाला होता. गौतम अदाणींसमोर मोठा बाका प्रसंग उभा होता. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदाणींच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह लावले होते. समुहाची विश्वासाहर्ता पणाला लागली होती. अशा काळात आयएचसीने केलेल्या गुंतवणुकीमुळे त्यांची सुटका केली. अबु धाबीचे राजघराणे जर इतक्या मोठ्या आपत्तीनंतर अदाणी समुहावर विश्वास ठेवत असेल, तर अदाणी समुहात निश्चितपणे दम असणार असा विश्वास गुंतवणुकदारांमध्ये निर्माण झाला.

हे ही वाचा:

आधार नाही आता पॅनकार्ड हेच ओळखपत्र

अर्थसंकल्पात महिलांचा ‘सन्मान’

आरोग्य सुधारणार ..या आजारांचे होणार समूळ उच्चाटन

डिजिटल ग्रंथालये, शिक्षकांची भरती , नर्सिंग महाविद्यालये आणि खूप काही…

एकीकडे एफपीओसाठी अरब धावून आले असताना कधी काळी यूएईचा कट्टर शत्रू असलेल्या इस्त्रायलने सुद्धा वेगळ्याप्रकारे अदाणींची पत वाढवली. २०१० पर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे हे देश सध्या एकमेकांच्या हातात हात घालून चालण्याचा प्रय़त्न करतायत. इराण हा त्यांचा समान शत्रू आहे. परंतु भारताशी दोघांचे नाते उत्तम आहे. इस्त्रायलमधील दुसऱ्या क्रमांकाचे हायफा बंदर अदाणी समुहाने घेतले आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज हे बंदर अदाणी समुहाला बहाल केले. हा सौदा १.२ अब्ज डॉलरला झाल आहे.

हा भारत-इस्त्रायल संबंधातील मैलाचा दगड आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शूर भारतीय जवानांनी हे बंदर मुक्त केले होते. आज पुन्हा एकदा अदाणींसारख्या बड्या भारतीय उद्योजकाने ते मुक्त केले अशी स्तुती सुमने नेतन्याहू यांनी आज व्यक्त केली आहेत. एकीकडे अदाणी समुहाला बुडवण्याचा प्रयत्न झालेला असताना, विदेशी वित्त संस्थां, देशी गुंतवणूकदार, भारतीय उद्योजकांनी अदाणींच्या एफपीओमध्ये गुंतवणूक करून अदाणी समुहावर विश्वास व्यक्त केला आहे.

हिंडेनबर्गच्या अहवाला नंतर एकीकडे मध्य पूर्वेतील शक्तीशाली राजघराण्याने अदाणींवर विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे भारताचा परंपरागत मित्र असलेल्या इस्त्रायलने अदाणींना हायफा बंदर देऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. अदाणी समुहाच्या घसरणीमुळे शेअर बाजारात गडगडाट सुरू होता. आज अर्थ मंत्री निर्मला सितारमण अर्थसंकल्प सादर केला, परंतु हा गडगडाट थांबण्याचे नाव नाही. गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. परंतु या अंधारात आशेचा किरण मात्र दिसू लागला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा