ब्रिगेडनेही साथ सोडली; नंगा नहाएगा क्या, निचोडेगा क्या?

उबाठा शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी झाली

ब्रिगेडनेही साथ सोडली; नंगा नहाएगा क्या, निचोडेगा क्या?

शिवसेना दुभंगल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आपली आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बरेच प्रयोग करत होते. नवीन समीकरणे बनवण्याचा प्रयत्न करत होते. आजही आपल्या पाठीशी लोक आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून आधी त्यांनी संभाजी ब्रिगेडला आणि नंतर बहुजन वंचित आघाडीला जवळ केले. वंचित आणि ठाकरेंचा काडीमोड होऊन आता बराच काळ लोटला. संभाजी ब्रिगेडने आज ठाकरेंना घटस्फोट दिला. भाजपा छोट्या पक्षांना संपवतो असा आरोप करणारे दोन छोट्या पक्षांना सांभाळू शकले नाहीत. जागांच्या बाबतीत त्यांचे समाधान करू शकले नाहीत. चूक ठाकरेंची नाही. मविआतील त्यांची बार्गेनिंग पावर साफ संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे पदरात पडणाऱ्या ९०-९५ जागांमध्ये लढणार किती आणि वाटणार किती? हा सवाल आहेच.

शिवसेना फुटल्यानंतर ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे मिळेल त्याच्यासोबत हात मिळवणी करत होते. मातोश्रीचे बंद दरवाजे त्यांनी उघडले होते. येणाऱ्या प्रत्येकाला ते भेटत होते. चर्चा करत होते. जमेल त्याला शिवबंधन बांधत होते.

जो जो मातोश्रीवर आला,

त्यासी म्हणे जो आपुला,

तोची उद्धव ओळखावा

जिथे तिथे स्नेह जोडावा

हे धोरण बहुधा ठाकरेंनी स्वीकारले होते. त्यातल्या त्यात वंचितला सोबत घेण्याला काही राजकीय अर्थ होता. कारण प्रकाश आंबेडकरांकडे काही प्रमाणात का होईना त्यांची हक्काची मतं आहे. ब्रिगेड मात्र कायम राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम म्हणून वावरलेली असल्यामुळे यांना सोबत घेऊन ठाकरेंचे काय भले होणार असा सवाल ठाकरेंच्या समर्थकांच्या मनात सुद्धा होता.

ब्रिगेडमध्ये जर ताकद असती ब्रिगेडींना तर अन्य पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याची वेळ आली नसती. राष्ट्रवादी हा तर घरचा पक्ष होता. काहींनी अन्य वाटाही चोखाळल्या. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सौभाग्यवती तर भाजपाच्या तिकीटावर विधानसभेत पोहोचल्या. ब्रिगेडचे लोक सतत राजकीय टेकूच्या शोधात असताना त्यांचा टेकू घेऊन ठाकरेंनी काय मिळवले? हे कोडेच होते. ठाकरेंसोबत राहून आपले काही भले होत नाही, किंवा कोणाचे राजकीय भले करण्याची ठाकरेंची क्षमता संपलेली आहे, याची जाणीव वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीच्या आधीच झाली होती. त्यामुळे ते आधीच बाजूला झाले.

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना ब्रिगेडनेही आपले बस्तान हलवले. अपेक्षित जागा देण्याची उबाठा शिवसेनेची तयारी नसल्याचे कारण देत ब्रिगेडच्या नेत्यांनी आता आम्ही एकत्र नाही, अशी घोषणा करून टाकली. चूक ठाकरेंची नव्हती, ब्रिगेडवालेच उद्ध्वस्त इमारतीत आश्रय शोधायला आले होते. मविआमध्ये ठाकरेंच्या शब्दाला ते मुख्यमंत्री असेपर्यंतच किंमत होती. ते पद त्यांना टिकवता आले नाही. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतांच्या टेकूवर जेमतेम यश मिळाल्यानंतर तर उरलीसुरलेली किंमतही संपली.

हे ही वाचा:

उबाठा-संभाजी ब्रिगेडमध्ये तुटेपर्यंत ताणले गेले! युती समाप्त

ब्राह्मणांनी हिंदू म्हणून काम करत राहावे!

टीएमसी खासदाराचा मुस्लीम मतांसाठी किती आटापिटा?

पुस्तक विकण्यासाठी आपली इज्जत विकली; बबिता फोगट यांची टीका

भाजपाशी गोविंदाच्या कुठल्याशा सिनेमामध्ये प्रेम चोप्राचा गाजलेला डायलॉग आहे. नंगा नहाएगा क्या, निचोडेगा क्या? ठाकरेंची अवस्था तशीच झालेली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने १५१ चा आकडा जाहीर केला. जागा वाटपाची चर्चाही सुरू झालेली नसताना युवराज आदित्य ठाकरे यांनी आम्ही १५१ जागा लढवणार अशी भूमिका जाहीर केली होती. युती तुटेपर्यंत ते १५१ चे तुणतुणे वाजवत होते. या दुराग्रहाचे पुढे काय झाले हे सर्वश्रुत आहे. जागावाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच, काय होणार हे भाजपा नेत्यांच्या लक्षात आले होते. २०१४ मध्ये युती तुटली. तरीही भाजपा सत्तेवर विराजमान झाली. मागील चुकांमधून धडा घेत २०१९ मध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले तेव्हाही शिवसेनेला १२४ जागा मिळाल्या होत्या. भाजपाने तेव्हा १६४ जागा लढवल्या होत्या.

तब्बल दहा वर्षांनी जेव्हा उबाठा शिवसेनेचे नेते मविआतील अन्य मित्रपक्षांच्या सोबत जागा वाटपाच्या चर्चेला बसतात तेव्हा चित्र काय दिसते आहे, पाहा. १५१ मागणाऱ्यांना सव्वाशे सोडा शंभरचेही वांधे झालेले आहेत. म्हणजे उबाठा शिवसेनेची बार्गेनिंग पावर मविआमध्ये गेल्यानंतर कमी झाली. माजी मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंचे राजकीय वजन घटले. युवराज आदित्य ठाकरे यांनी तर आम्हाला अमक्या जागा हव्यात, तमक्या जागा हव्यात अशी बडबड बंद केलेली आहे. ते जागांचा विषय बोलतच नाहीयेत. आघाडी असो वा युती, जेव्हा जागा चुकते तेव्हा अनेकांची बोलती बंद होते. महायुतीत अजितदादा आणि मविआमध्ये आदित्य ठाकरे ही दोन उत्तम उदाहरणे आहेत. परिस्थिती कोणतीही असो, वेळ काळ कोणताही असो सदासर्वदा बोलत राहणारा माणूस एकच, संजय राऊत.

आज मविआचे जागा वाटप जाहीर होईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी जाहीर केले होते. हा व्हीडीयो करे पर्यंत तरी जागावाटपाचे आकडे जाहीर झालेले नाहीत. जे काही जाहीर होईल ते उबाठा शिवसेनेला जुन्या दिवसांची आठवण करून देणार हे निश्चित.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version