27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरसंपादकीयजनतेनेच केले चंगू-मंगूंच्या मूळव्याधीचे ऑपरेशन

जनतेनेच केले चंगू-मंगूंच्या मूळव्याधीचे ऑपरेशन

Google News Follow

Related

जनतेनेच केले चंगू-मंगूंच्या मूळव्याधीचे ऑपरेशन लोकसभेच्या निवडणुकांच्या माहोलमध्ये चंगू-मंगूची एक जोडी महाराष्ट्र भर फिरत होती. जनतेला निर्भय बनण्याचे आवाहन करत होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकतर्फी मुस्लीम मतदानामुळे, राज्यात निर्माण झालेल्या जातीय विखारामुळे महायुतीला फटका बसला. चंगू-मंगूला वाटले की, आपल्यामुळेच मविआचा विजय झाला. विधानसभा निवडणुकीत पुन्हा यांना सुपारी मिळाली. परंतु जनतेला यांची औकात आणि पोटभरू मनसुबा आधीच कळल्यामुळे, तुमचे मूळव्याधीचे ऑपरेशन झाले आहे का? असा सवाल एका
नागरिकाने निर्भय बनोच्या एका सभेत विचारला होता. या प्रश्नामुळे चंगू चांगलाच चिडला, पण उत्तर दिले नाही. आज महायुतीच्या दणदणीत विजयाने यांचे थोबाड फोडले. मतदारांनी तर त्यांच्या मूळव्याधीचे थेट ऑपरेशनच करून
टाकले. अजून सगळे निकाल आलेले नाहीत. परंतु जे कल आहे ते पुरेसे स्पष्ट आहेत.

मविआच्या हिंदूविरोधी एजेंड्यांचा मतदारांनी दणदणीत पराभव केलेला आहे. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंचा सुपडा साफ केला आहे. त्यामुळे त्यांची पिलावळ प्रचंड अस्वस्थ आहे. मालकांची सुपारी वाजवू शकलो नाही, खाल्ल्या
मीठाला जागता आले नाही, त्यामुळे सकाळपासून त्यांच्या भाजपाविरोधी वांत्या सुरू आहेत. भ्रष्टाचाराचे मेरूमणी असलेल्या काँग्रेसची, शरद पवारांची सुपारी घ्यायची आणि महायुतीला झोडायचे हे धंदे त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या चंगू आणि मंगूच्या टोळीने केले. चाय-बिस्कुट पत्रकार, वठलेले लिब्रांडू, मोदीव्देष्ट्यांची यांना साथ होती. मूठभर सभा झाली तरी ती ढीगभर झाली असा माहोल चाय-बिस्कुट मंडळी बनवित होते. जिथे सभा होते त्या हॉलचे भाडे, गर्दी जमवण्याची जबाबदारी सगळी मविआच्या नेत्यांची. हे फक्त येऊन भाजपाच्या विरोधात गरळ ओकणार आणि सुपारी वाजवणार. बैलगाडी खाली चाललेल्या कुत्र्याला गाडी आपल्यामुळेच पुढे जाते आहे, असा भ्रम व्हावा, तसे यांचेही झाले
होते. यांचा एजेंडा महाराष्ट्राचे काही भले करण्याचा होता का, तर अजिबात नाही.

हे ही वाचा:

“आम्ही आधुनिक अभिमन्यू, अखेर चक्रव्यूह तोडून दाखवला”

जनतेचा कौल मान्य; अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक! ८३ हजारांच्या मताधिक्क्याने दणदणीत विजय

मतदारांनी बंद केले उद्धव ठाकरेंचे दुकान!

एकाची वकिली चालत नव्हती, दुसऱ्याच्या राजकीय महत्वाकांक्षा फळाला आलेल्या नव्हत्या. निर्भय बनोच्या निमित्ताने थोडी फार प्रसिद्धी, मविआच्या नेत्यांची जवळीक आणि काही भिकेचे तुकडे पदरात पडल्यामुळे चंगू-मंगू दोघेही फॉर्मात होते. सकाळपासून महायुतीची घोडदौड सुरू झाल्यापासून यांची मूळव्याध ठसठसायला लागली. मंगू फेसबुकावर ओकाऱ्या करू लागला. महाराष्ट्र हरला म्हणून ऊर बडवू लागला. तेव्हा जनतेच्या लक्षात आले की मूळव्याधीचे ऑपरेशन झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आपली किंमत दीड हजार असल्याचे सिद्ध केलेले आहे, विषारी धर्मांधतेचा विजय वगैरे वगैरे डायलॉगबाजी सुरू झाले. यांचे एक विशेष असते, यांचे लॉजिक खास असते. त्याचा वस्तूस्थितीशी कधीही संबंध नसतो.

भाजपा आणि संघाच्या विरोधात गरळ ओकायला मुद्दा लागतोच असे नाही. कोणताही मुद्दा नसला तरी ओकाऱ्या काढण्याची अभूतपूर्व क्षमता या मंडळींमध्ये असते. चंगू-मंगूचे सगेसोयरे अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत. मविआच्या पराभवामुळे आलेली ग्लानी उतरली की तेही धनशक्तीचा, ईव्हीएमचा विजय अशा बोंबा ठोकायला सज्ज होतील. महायुतीचा विजय इतका ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. जनतेने दिलेला कौल फक्त मविआच्या विरोधात नाही. तो या सुपारीबाजांच्या विरोधातही आहे. भ्रष्ट राहुल गांधी आणि शरद पवारांसारख्या नेत्यांना खांद्यावर घेऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात बोंब ठोकणाऱ्या पुरोगामी भांडांच्या विरोधात आहे. जनतेने यांचा नरेटीव्ह अक्षरश: तुडवला आहे. त्यांच्या मनसुब्याच्या ठिकऱ्या उडवल्या आहेत. खोटारडेपणाचे थोबाड फोडले आहे. यांच्या मूळव्याधीचे ऑपरेशन झाल्यामुळे रडारड होणारच. ती ऐकायची आणि एन्जॉय करायची.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा