24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयनाशिक ते कानपूर; जिहादचा ताजा अंक

नाशिक ते कानपूर; जिहादचा ताजा अंक

Google News Follow

Related

शुक्रवार देशातील मुस्लीमांना आंदण दिला आहे, असा एमआयएमचे माजी खासदार इम्प्तियाज जलील यांचा गैरसमज झालेला दिसतोय. कारण, ‘महाराष्ट्रातील सरकार जाणीवपूर्वक जुम्म्याच्या दिवशी हिंदूंच्या मोर्चाना परवानगी देते. या मागील हेतू स्वच्छ दिसत नाही’, असे विधान यांनी केलेले आहे. हिंदू आक्रोश मोर्चावर झालेल्या दगडफेकीनंतर ते बोलत होते. मुस्लीमांमधील कट्टरवादी गाझामध्ये माशी शिंकली तरी रस्त्यावर उतरत असतात, बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात हिंदू रस्त्यावर उतरले म्हणून जलील यांना मिरच्या लागण्याचे कारण नाही.

जय श्रीरामच्या घोषणा, वंदे मातरमच्या घोषणा ऐकून मुस्लीम चिडले म्हणे; या घोषणा ऐकून ज्यांच्या बुडाला आग लागते, त्यांच्यासाठी १९४७ साली पाकिस्तान दिलेला आहे. भारतातील हिंदू यापुढे जिहादींना सहन करणार नाही, हे कट्टरवाद्यांनी कुणी तरी ठामपणे सांगण्याची गरज आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाने एका मोर्चाचे आणि बंदचे आयोजन केले होते. जुन्या नाशिकमध्ये या मोर्चावर मुस्लीमांनी दगडफेक केली. त्यातून वातावरण तापले. इम्तियाज जलील यांच्यासारख्या लोकांनी त्यात तोल ओतण्याचे काम केले. महंत रामगिरी महाराजांनी इस्लाम आणि प्रेषिताविरुद्ध केलेल्या विधानांवर जलील यांनी आगपाखड केलेली आहे. या देशात अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. ‘राम काल्पनिक आहे’, ‘मला शक्तीला संपवायचे आहे’, अशा प्रकारची विधाने यापूर्वी अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंनीही ऐकली आहेत. त्यावेळी हिंदूंनी जाळपोळ किंवा दगडफेक केली नाही. रामगिरी महाराजांना हा जलील भगव्या वस्त्रातील मवाली म्हणतो. आमचे मौलवी अशी प्रवचने देत नाहीत, जिने की राह के बारे मे बताते है… अशा थापा मारतो. हे हलालाछाप मौलवी काय लायकीचे असतात याचे अनेक व्हीडीओ यूट्युबवर उपलब्ध आहेत. त्यामुळे जलील यांनी हिंदूंना अगदीच दुधखुळे समजून विधाने करू नयेत.

मदरशातून जे काही तत्वज्ञान दिले जाते, त्यामुळे जगात काय हाहा:कार माजला आहे, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. देशात अराजक निर्माण व्हावे, हिंदूंचे वित्त, जीवित धोक्यात यावे यासाठी जिहादी शक्ती संघटीतपणे प्रयत्न करीत आहेत. लव्ह जिहाद, लँड जिहाद, थूंक जिहाद छेडून हिंदूंची धर्म संस्कृती, वित्त, जीवित धोक्यात आणण्याचे प्रय़त्न होत आहेत. कानपूरमध्ये साबरमती एक्सप्रेसला झालेला अपघात याचे ताजे उदाहरण आहे. रेल्वे ट्रॅकवर ठेवण्यात आलेल्या एका मजबूत लोखंडी वस्तूवर आदळून पहाटे २.३० वाजता या एक्सप्रेस ट्रेनचे डबे रुळावरून घसरले. अशा प्रकारे अपघात व्हावेत यासाठी सुनियोजित प्रयत्न सुरू आहेत, असे मानायला वाव आहे.

या अपघातात केवळ रेल्वेचे डबे घसरण्यापर्यंतच नुकसान झाले. जीवित हानी झाली नाही. परंतु, भविष्यात मोठी मनुष्यहानी होणारच नाही, काय हमी? प्रथमदर्शनी याप्रकरणात सुनियोजित षडयंत्र दिसते आहे. रेलमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कानपूरमध्ये झालेल्या अपघातामागे घातपात आहे, असे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने याची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार केलेला आहे. इंटेलिजन्स ब्युरो आणि उत्तर प्रदेश पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याचा अर्थ पंतप्रधान कार्यालयाने हा विषय गंभीरपणे घेतलेला आहे.

डोक्यात कट्टरता भिनलेली ही पिसाळलेली जनावरे काहीही करू शकतात. पाकिस्तानात जे अराजक माजले आहे, बांगलादेशात जे काही सुरू आहे, त्याचे कारण हिच जिहादी मानसिकता आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेचे अपघात कशा प्रकारे घडवता येतील याची प्रात्यक्षिके यूट्यूबवर दाखवणाऱ्या गुलजार शेख या तरुणाला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. हा तरुण रेल्वे रुळांवर गॅस सिलिंडर, सायकल, मोठे दगड, साबणाच्या वड्या अशी सामुग्री ठेवायचा. असे अडीचशे व्हीडीओ यूट्यूवर त्याने अपलोड केले होते. त्याचे दोन लाख सबस्क्रायबर होते. युट्युबवर घातपाताचा प्रचार उघडपणे होत होता, त्याच्या व्हीडीओना लाईक, शेअर केले जात होते. त्याचे कौतूक सुद्धा होत होते. एक तरुण लोकांच्या जीवाशी खेळतो आहे, हे दिसत असूनही अडीचशे व्हीडीओ अपलोड झाल्यानंतर तपास यंत्रणांना जाग आली. यूपी पोलिसांनी त्याला अटक केली.

हेही वाचा :

सुप्रिया सुळेंचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्यास राज्य सरकार ‘लाडकी बहीण योजने’चे १५०० रुपये देईल !

खेडगल्लीचा विघ्नहर्ता नाबाद ७५

‘खटाखट’ सारखी योजना नसून आमची ‘फटाफट’ सारखी योजना !

लव्ह जिहाद प्रकरणावरून उल्हासनगरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन !

कानपूरमध्ये घडलेला प्रकार अशाच एखाद्या गुलजार शेखने केला नसेल कशावरून? अशाच तमाशांमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी गेली काही वर्षे हिंदूंचे आक्रोश मोर्चे निघतायत. हिंदू तरुणींना लव जिहादच्या जाळ्यात ओढायचे, बलात्कार करून त्यांच्या हत्या करायच्या, मंदीरांच्या जमिनी लाटायच्या. काल महाराष्ट्रात एकाच वेळी नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नगरमध्ये मुस्लीम रस्त्यावर उतरले. मुस्लीम मतांचे तुष्टीकरण करणाऱ्या पक्षांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे. उबाठा शिवसेना ही त्यात पडलेली ताजी भर. हिंदूंची एकजूट हा त्यावर एकमेव उपाय आहे. बांगलादेशात जिहादी जेव्हा हिंदूंच्या हत्या, महीलांवर बलात्कार करताना आणि त्यांच्या घरांची जाळपोळ करतायत तेव्हा ते कोणाचीही जात विचारत नाहीत. कारण हा मुद्दा त्यांच्यासाठी गौन असतो. ज्यांना ठार केले जाते आहे, ज्यांची घरे जाळली जात आहेत ते हिंदू आहेत एवढेच जिहादींसाठी पुरेसे आहे. महाराष्ट्रात भविष्यात जर जिहादींनी दंगली भडकवल्या तर इथेही वेगळा नियम नसेल. हिंदूंनी याचा विचार करण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा