28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरसंपादकीयमोडीली मांडीली क्षेत्रे... नालंदा उभे राहिले, बख्तियारपूरचे काय कराल?

मोडीली मांडीली क्षेत्रे… नालंदा उभे राहिले, बख्तियारपूरचे काय कराल?

Google News Follow

Related

‘नालंदा विश्व विद्यापीठाच्या विध्वंसानंतर भारताला अंधाकाराने ग्रासले होते, या विद्यापीठाची पुर्नस्थापना देशाच्या सुवर्ण युगाची युरूवात करेल’, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारमध्ये बोलताना व्यक्त केला, निमित्त होते नालंदा विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्याचे. आज शिवप्रेमी जनता शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करते आहे. या ऐतिहासिक दिनाच्या ठीक एक दिवस आधी सुमारे बाराशे वर्षांपूर्वी उद्ध्वस्त झालेल्या नालंदा विद्यापीठाची पुनर्स्थापना होते आहे, हा निश्चितपणे योगायोग नाही. प्रश्न एवढाच शिल्लक आहे की हे विद्यापीठ जाळणाऱ्या बख्तियार खिलजी नावाच्या विकृत आक्रमकाचे नाव मिरवणाऱ्या बख्तियारपूर जंक्शन आणि बख्तियारपूर शहराचे नाव कधी बदलले जाणार?

सम्राट कुमार गुप्ताने नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती. त्यावेळी भारत हे ज्ञानाचे प्रकाश केंद्र होते आणि नालंदा हा त्या प्रकाश केंद्रातील सगळ्यात तेजाने तेवणारा दिवा. जगभरातील सुमारे १० हजार विद्यार्थी येथे येऊन गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, आयुर्वेद, व्याकरण, दर्शनशास्त्र, ज्योतिष, तर्कशास्त्र आणि धर्माचे शिक्षण घेत असत. ११९३ मध्ये बख्तियार खिलजीची नजर या विद्यापीठाकडे वळली. त्याने कित्येक शतके जनत केलेले ज्ञानाचे हे भांडार नष्ट केले. असे सांगतात येथील ग्रंथालयाला आग लावल्यानंतर तीन महिने हे ग्रंथालय जळत होते. अनेक दुर्मिळ ग्रंथ या आगीत भस्मसात झाले.
मोदींनी कित्येक दशकं विझलेला हा ज्ञानाचा नंदादीप पुन्हा एकदा प्रज्वलित केला. ‘आक्रमकांना पुस्तकं जाळून ज्ञान नष्ट करता आले नाही’, असे ते म्हणाले. ‘प्राचीन अवशेषांच्या जवळ उभारलेला नालंदा विज्ञापीठाचा नवा कँपस जगाला भारताच्या सामर्थ्याचा परिचय देईल. नालंदा सांगेल जी राष्ट्र मजबूत मानवी मूल्यांवर उभी असतात, ती इतिहासाला पुनर्जीवित करून उज्वल भवितव्याची आधारशीला ठेवून शकतात. नालंदाचा शब्दाचा अर्थच ज्ञानदान करणारा अविरल प्रवाह.’

हे या देशाचे दुर्दैव आहे, की ज्यांनी या देशाची धर्म-संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांना स्वतंत्रोत्तर भारतात या देशातील राज्यकर्त्यांनी हिरो ठरवले. ज्यांनी नालंदा जाळले, हजारो बौद्ध भिख्खूंची कत्तल केली त्या बख्तियारच्या नावाने आजही या देशात एक शहर आहे, एक रेल्वे स्थानक आहे. नालंदाचे आक्रोश, किंकाळ्या आणि अश्रूंची धग काँग्रेसी सत्ताधीशांपर्यत कधीच पोहोचली नाही. मतांच्या राजकारणासाठी आक्रमकांच्या आरत्या ओवाळण्याचे काम त्यांनी निष्ठेने केले. इलाहाबादचे प्रयागराज झाले, बनारसचे वाराणसी झाले, परंतु जेव्हा बख्तियारपूरचे नाव बदलण्याची मागणी २०२१ मध्ये जेव्हा पुढे आली, तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री जे आज केंद्रातील रालोआ सरकारचे आधार स्तंभ आहेत, ते आडवे आले. नामांतराच्या मागणीची त्यांनी बकवास या शब्दात उपेक्षा केली. मुस्लीम तुष्टीकरणाचा विषय येतो तेव्हा काँग्रेसी काय, किंवा समाजवादी काय, सर्वच एका माळेचे मणी. नितीश म्हणाले की, ‘माझा जन्म याच बख्तियारपूरमध्ये झाला, मी या शहराचे नाव बदलू देणार नाही.’

आपआपल्या जातीसाठी भांडणारे या देशातील अनेक नेते जिथे धर्म आणि संस्कृतीचा विषय येतो तेव्हा उदासीन होतात, अनेक ठिकाणी विरोधही करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या अनेक मंदीरांचा जीर्णोद्धार केला. पोर्तुगीजांनी गोव्यातील दिवार बेटावरील सप्तकोटीश्वर मंदीर पाडून तिथे चर्चे बांधले होते. महाराजांनी इथे पुन्हा मंदिराचे निर्माण केले. दक्षिणेतील तिरुवन्नामलाई येथील शिव (सोनचलपट्टी) आणि विष्णू मंदीर (सम्मोतील पेरुमल) उद्ध्वस्त करून तिथे मशीदी उभारण्यात आल्या होत्या. शिवाजी महाराजांनी या दोन्ही मशीदी तोडून पुन्हा इथे मंदिरे उभारली.

हे ही वाचा..

उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी!

बँक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अमटेक कंपनीसंबंधित ३५ ठिकाणांवर छापेमारी

‘अकबरनगर घेतय मोकळा श्वास, बेकायदेशीर मशिदी जमीनदोस्त’!

बिहार सरकारला न्यायालयाचा झटका !

मंदिरे ही देशाच्या धर्म-संस्कृतीची केंद्र होती. ज्यांना भारताचा धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याची असूरी इच्छा होती त्यांनी या मंदिरांवर घणाचे घाव घातले आणि तिथे मशिदी उभारल्या. शिवाजी महाराजांनी आक्रमकांच्या या खूणा नष्ट केल्या. देशावर आलेल्या हिरव्या सावटापासून हिंदू धर्माचे रक्षण केले.

समर्थ रामदास शिवाजी महाराजांबद्दल म्हणतात,

बुडाला औरंग्या पाप |
म्लेंच्छ संहार जाहला|
मोडीली मांडीली क्षेत्रे|
आनंदवनभुवनी ||

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. मोडीली मांडली क्षेत्रे, याच प्रेरणेने त्यांच्या कार्यकाळात अयोद्धेत मंदिराची, काशी कॉरिडोरची निर्मिती झाली. ज्ञानवापीचा प्रश्न मार्गी लागतो आहे. मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमीवर मंदीराची निर्मिती होईल अशी आशा निर्माण झालेली आहे.

आपण सगळे शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करीत असताना नालंदाच्या भग्न अवशेषातून पुन्हा एकदा भारतीय नवचैतन्याने एका विद्यापीठाची निर्मिती झालेली आहे. नरेंद्र मोदी त्या चैतन्याचे प्रतिनिधी आहेत. भारत खरोखरच एका उज्वल भविष्याची आधारशीला ठेवतो आहे. परंतु भविष्याची आधारशीला ठेवताना इतिहासात झालेल्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे. फक्त विद्यापीठाची निर्मिती पुरेशी नाही. ज्या बख्तियार खिलजी नावाच्या विकृत आक्रमकाने नालंदा जाळले, त्याचे बिहारमधील एका शहराला आणि रेल्वेस्थानकाला दिलेले नाव जोपर्यंत पुसले जात नाही, तोपर्यंत हे कार्य अधुरे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा