खलिस्तानी समर्थकांच्या पैशातून सुरू असलेल्या विदेशी ‘प्रोपोगंडा वॉर’च्या विरोधात देश उभा ठाकला आहे. देशातील लाखो दक्ष नागरीकांसोबत अनेक सेलिब्रेटींनी याविरोधात आवाज बुलंद केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर त्यापैकी एक. सचिनच्या ट्वीटमुळे काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या पोटात मुरडा उठला. डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या केरळमध्ये युथ काँग्रेसने सचिनच्या प्रतिमेवर काळे तेल ओतून त्याचा निषेध केला. ट्वीटरवर सचिनला ट्रोल करण्यात आले. काँग्रेसच्या इको सिस्टीममध्ये तयार झालेले कवडी दमडीचे पत्रकार, विचारवंत, अन्य लायकी नसलेले लोक सचिन कसा चुकला आहे यावर विश्लेषण करू लागले.
‘विदेशी लोकांना भारतात लुडबुड करण्याचे कारण नाही. भारताबाबत काय निर्णय घ्यायचा ते आम्ही भारतीय ठरवू. चला एकसंघ राष्ट्र म्हणून उभे राहू.’ हा सचिनने केलेल्या ट्वीटचा भावार्थ.
#IndiaUnited #IndiaAgainstPropoganda हे दोन हॅशटॅग या ट्वीटमध्ये जोडले होते.
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
सर्वसामान्य माणसाला यात काहीच गैर वाटले नाही, परंतु काँग्रेस नेते भंयकर अस्वस्थ झाले. त्यांनी ट्वीटवर सचिनला ट्रोल करणे सुरू केले. हे स्वाभाविकच आहे. कारण या ट्वीटमध्ये सचिनने व्यक्त केलेली भावना काँग्रेसच्या फुटीर अजेण्ड्याला छेद देणारी आहे.
काँग्रेसला या देशात विदेशी लुडबुड हवी आहे. ती व्हावी म्हणून २००८ मध्ये काँग्रेस पक्षाने चीन सोबत सामंजस्य करार केला होता. हा करार गोपनिय असून त्यात नेमके काय आहे हे काँग्रेसने अजून जाहीर केलेले नाही. बहुधा याच करारामुळे काँग्रसच्या कार्यकाळात भारताची जमीन चीनला आंदण देण्यात आली. केवळ चीन नव्हे तर काँग्रेसला पाकिस्तानची लुडबुडही हवी आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर तर पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी मदत मागून आले. हा व्हीडीयो आजही युट्यूबवर उपलब्ध आहे.
एकसंध भारताचेही काँग्रेसला वावडे आहे, कारण ब्रिटीश गेल्यानंतर त्यांची फोडा आणि राज्य करा ही नीती काँग्रेसने स्वीकारली आणि सात दशक देशावर राज्य केले. म्हणून तथाकथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गच्या ट्वीटरवरून देशात अराजक माजवण्याचा खालिस्तानी अजेण्डा जाहीर होऊनही काँग्रेस मुग गिळून बसली आहे. ग्रेटाने ‘खालिस्तानी टुलकिट’वाले हे ट्वीट डीलीट का केले हा प्रश्न फक्त देशबुडव्यांना पडला नाही.
‘देशात अराजक माजवणाऱ्या शक्तींशी गाठीभेटी करण्यासाठीच काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार विदेश भेटीवर जातात’, असा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
शेतकरी आंदोलनाच्या आडून खालिस्तानचे भूत उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात बंद असलेले माओवादी, नक्षल समर्थक आणि जिहादी नेत्यांची सुटका करा’, अशी शेतकरी आंदोलनाच्या म्होरक्यांची मागणी आहे. या आंदोलनात देशबुडव्या शक्ती सामील असलेल्याचा यापेक्षा वेगळा पुरावा कशाला हवाय?
शेतकऱ्यांच्या नावाखाली देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न ज्यांच्या मनात अंगार निर्माण करतो, ते समाज माध्यमांवर व्यक्त होत आहेत. फुटीरांचा यथेच्छ समाचार घेत आहेत. सचिन त्यापैकीच एक आहे. त्याने या परकीय शक्तींना फटकारले, देश एकसंघ राहावा म्हणून जे वाटते ते व्यक्त केले, यात काँग्रेसला मिरच्या झोंबण्याचे कारण काय?
हिंदूविरोधी स्टँडअप कॉमेडीअन कुणाल कामरा आणि मुन्नवर फारुकीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बॅटींग करणारे सचिनचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे नाकारू शकतात?
‘आमच्या सुरात सूर मिळवून बोलतात तेच योग्य बोलतात’ ही तुकडे गँगने बनवलेली सहिष्णूतेची नवी व्याख्या आहे.
ही अराजकवाद्यांची ‘नव सहिष्णूता’ देशाच्या, राम मंदीराच्या, अखंडतेच्या बाजूने बोलणाऱ्या प्रत्येकावर लादण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ज्येष्ठ लेखक उदय प्रकाश यांनी अयोद्धेतील रामजन्मभूमी मंदीर निर्माणासाठी देणगी दिली म्हणून त्यांच्यावर अनर्गल टीका करण्यात आली.
काँग्रेस आणि डाव्यांच्या पिलावळीला स्वत्वाच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाची एलर्जी आहे. त्यांना अपमानित करून या देशाच्या बाजूने बोलणाऱ्या प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण करण्याचा हा डाव आहे.
शेतकरी आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी पॉप सिंगर रिहानाने १८ कोटी घेतले अशी बातमी एका वृत्तवाहीनीने उघड केली. पॉर्नस्टार मिया खलिफा आणि ग्रेटाला ते मिळाले नसतील असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. पैशाची पोती ओतून असे आयकॉन भाड्याने घ्यायचे आणि त्यांच्याकडून देशाची बदनामी करून घ्यायची असे हे कारस्थान. देश तोडण्यासाठी कॅनडा, ब्रिटन, अमेरीका, जर्मनीमधून पैशाचा ओघ येतोय. ज्यांना हे दिसते आहे, ते षड्डू ठोकून या कारस्थानाच्या विरोधात उभे राहीले आहेत. ‘मिया खलिफासारख्यांनी बोलावं आणि त्यांच्या तालावर डोलावं’, हे जमण्यासाठी राहुल गांधीचा बौद्धिकस्तर हवा, देशभक्त भारतीयांना हे मंजूर होणे नाही. खलिस्तान समर्थक आणि आयएसआयच्या पैशातून, काँग्रेस आणि डाव्यांच्या समर्थनातून सुरू झालेले हे ‘प्रोपोगंडा वॉर’ हाणून पाडण्याचे अंगभूत सामर्थ्य या देशात निश्चितपणे आहे.