25 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरसंपादकीयजातीचा खुुळखुळा, करी देश खिळखिळा!

जातीचा खुुळखुळा, करी देश खिळखिळा!

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला तर तो मविआ इतका जरांगेंचाही पराभव असेल

Google News Follow

Related

प्रसिद्धीचा झगमगाट वाईट नसतो, परंतु याची सवय मात्र खूप वाईट. प्रसिद्धीचे व्यसन लागलेले लोक झोतात नसेल तर नुसते तडफडत असतात. मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा स्थिती अशीच झालेली आहे. आंदोलन संपल्यापासून प्रसिद्धी पार आटली आहे. जेव्हा केव्हा प्रसिद्धीची उब हवी असते तेव्हा ते भाजपा नेते देंवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालून मोकळे होतात. पाडण्यातही मोठा विजय असतो, यांना पाडा… असे ताजे आव्हान जरांगेंनी केले आहे.

जरांगेंच्या सध्या गाठी-भेटी सुरू आहेत. आता यांना म्हणजे नेमके कुणाला हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. परंतु आधी देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली असल्यामुळे कोणाला पाडा हे नाव घेऊन सांगण्याची गरज नाही. फडणवीसांनी माझ्या सारखे उपोषण करावे म्हणजे त्यांची ढेरी कमी होईल. फडणवीसांचे मराठ्यांवर प्रेम आहे, माता-भगिनींवर गोळ्या चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बढती दिली… अशी उपरोधिक टीका करून झाल्यानंतर यांना पाडा. मराठ्यांची ताकद दाखवा, असे विधान आल्यामुळे कोणाला पाडा हे समजून घ्यायला वेळ लागत नाही.

फडणवीसांना ढेरी कमी करण्याचे काहीच कारण नाही, त्यांना ती ढेरी शोभते. ढेरी असलेले राजकारणी महाराष्ट्रात बरेच आहेत. जरांगेंचे मालक शरद पवार यांचेही सिक्स पॅक एब्ज नाहीत. परंतु जरांगेंचा आक्षेप फक्त फडणवीसांच्या ढेरीवर आहे. त्यांच्या ढेरीची काळजी न करता जरांगेंनी आपली गालफाड जरा वर येतील असे बघायला हवे. खोल गेलेल्या गालांमुळे ते अगदीच सुकलेल्या अजय देवगण सारखे दिसतायत.

जरांगेंच्या उपोषणाचा नवा सिझन ८ जून पासून सुरु होणार असे त्यांनी जाहीर केलेले आहे. मुळात त्यांना हे उपोषण करण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत किती मराठे त्यांच्या पाठीशी आहेत याचा निकाल लागणार आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून जरांगे तापलेल्या कढईत टाकलेल्या मोहरीच्या दाण्यासारखे टणा टणा उड्या मारत आहेत. एका भूमिकेवरून दुसऱ्या भूमिकेवर यायला इतका कमी वेळ घेतात की लोकांच्या लक्षातही येत नाही, की भूमिका बदलली कधी. आधी मराठ्यांनी मोठ्या तालुकानियाह उमेदवारी अर्ज भरावेत असे जाहीर कऱण्यात आले. शून्य प्रतिसाद मिळाला. भूमिका मागे घेतली.

अनेक उमेदवार उभे केले तर मत विभागणी होईल त्यामुळे एकच दमदार उमेदवार द्या, अशी नवी भूमिका जाहीर केली. तेही काही जमले नाही. दमदार उमेदवार जरांगेंच्या मेहरबानीवर थोडेच आहेत की यांनी सांगितले उभे राहा की ते राहणार. सगळ्याच पत्त्यांची पिटाई झाली त्यामुळे आता यांना पाडा, अशा पिंका टाकत ते फिरतायत. इतक्या ताकदीने पाडा की यांना मराठ्यांची किंमत कळली पाहिजे, हे जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन आहे. इतकं उघडपणे बोलल्यानंतरही महायुतीचे दोन तृतियांश म्हणजे ३६ पेक्षा जास्त उमेदवार विजयी झाले तर मराठा समाज जरांगेंना, त्यांच्या आवाहनाला किंमत देत नाही, हे सिद्ध होईल, त्यानंतर जरांगेंनी आंदोलनाची स्टंटबाजी बंद करावी आणि उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटात सामील व्हावे. भाजपाची कबर खणण्याचे सोडून द्यावे, पवारांचे हात मजबूत करावेत. दुसऱ्यासाठी कबर खणणारे अनेकदा त्या कबरीत आडवे होतात.

हे ही वाचा:

तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट

के कविता यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

काँग्रेससाठी जाहीरनामा फक्त कागद पण आमच्यासाठी ‘मोदींची गॅरेंटी’!

जळगावात शिंदे गट ४०० पार…ठाकरे गटाला धक्का!

या निवडणुकीत महायुतीचा विजय हा जरांगेंचा बाजार उठल्याचा पुरावा असेल. त्यांच्या आततायीपणाचा, अहंकाराचा, बडबोलेपणाचा, शिवराळ भाषेचा, समाजबुडव्या राजकारणाचा पराभव असेल. पराभव झाल्यानंतर मग पुन्हा उपोषणाचा तमाशा कशाला? देशाच्या राजकारणात सध्या दोन नमुने जातीचा खुळखुळा वाजवत फिरतायत. एक देश पातळीवर वाजवतोय, एक महाराष्ट्रात. काँग्रेस नेते राहुल गांधी २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड काळे कऱण्याचा प्रय़त्न करतायत. परंतु प्रत्येक वेळी ते तोंडावर आपटतायत. त्यांचा प्रयत्न २०१४ मध्ये फसला, २०१९ मध्ये फसला, आता २०२४ मध्ये ते नव्या दमाने ताकद आजमावतायत. यंदा त्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून प्रचाराची रणनीती आखलेली आहे.

राहुल यांची रणनीती दर पाच वर्षांनी दणकून आपटते. त्यांनाही फरक पडत नाही, त्यांच्या पक्षालाही फरक पडत नाही. बहुधा पुन्हा पुन्हा माती खाऊन त्यांना सवय झाली आहे. २०२४ मध्य राहुल गांधी दणकून आपटल्यानंतरही ते २०२९ मध्ये नव्या दमाने मोदींचा विरोध करताना दिसतील. राहुल गांधी आणि जरांगेंमध्ये साम्य हे आहे की दोघेही जात-जात खेळतायत. जरांगे यांनी शरद पवारांच्या वतीने हा डाव मांडल्याची चर्चा आहे. राहुल कदाचित जॉर्ज सोरोस यांच्यावतीने बॅटींग करतायत. २१ व्या शकतात जगातील अनेक देश भविष्यात मंगळावर वास्तव्य करण्याच्या दृष्टीने मोहिमा आखतायत, एआय तंत्रज्ञानामुळे जगाचा चेहरामोहरा बदलण्याची चाहुल लागली आहे तिथे हे दोघेही जातीचा लॉलीपॉप दाखवून जनतेला खुळे बनवण्याचा प्रय़त्न करतायत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला तर तो मविआ इतका जरांगेंचाही पराभव असेल. कारण त्यांनी केलेले पाडण्याचे आवाहन सुज्ञ-सुसंस्कृत मराठा समाजाने मनावर घेतले नाही, असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे ८ जूनच्या उपोषणाची घोषणा करताना त्यांनी आधी ४ जूनची वाट पाहायला हवी होती. फडणवीसांना आवाहन देण्यापूर्वी असे आवाहन देण्याची त्यांची कुवत आहे का हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे. गेल्या वेळी एकत्रितपणे लढलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या होत्या. जरांगेंचे यांना पाडा हे भाजपाला उद्देशून केलेले आवाहन त्यांचे गॉडफादर शरद पवारांना कितपत फळते आहे हे ४ जूनपर्यंत स्पष्ट होईलच. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात नव्याने उपोषण उपोषण खेळायला सुरूवात करावी.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा