जरांगेंची मुस्लिमांना साद नेमकी कशासाठी ?

मुस्लिमांना सोबत आणून जरांगेना सत्ता उलथवायची आहे.

जरांगेंची मुस्लिमांना साद नेमकी कशासाठी ?

मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू केल्यापासून मनोज जरांगे पाटील, महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा आपल्या पाठीशी असल्याचा दम सत्ताधाऱ्यांना देत आहेत, हे सहा कोटीही आता त्यांना कमी पडायला लागले किंवा या भूलथापा असल्याचा उलगडा झाला म्हणून, महाराष्ट्रात उलथापालथ घडवण्यासाठी ते मुस्लीम आणि बौद्धांना हाक देतायत. मराठा, मुस्लीम आणि बौद्ध अशी मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून जरांगेंची मानसिकता समोर आलेली आहे. महाराष्ट्राच्या मातीतील हिंदूंच्या जातींशी वाकडे घ्यायचे आणि मुस्लीमांच्या गळ्यात गळे घालायचे, हे ब्रिगेडींचे प्रमुख लक्षण आहे. मनोज जरांगेंचा ब्रिगेडी चेहरा यानिमित्ताने समोर आलेला आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात काहीच गैर नव्हते. ओबीसी नेत्यांपासून सर्वांनी सुरूवातीच्या काळात जरांगेंना पाठींबा दिला. परंतु जेव्हा त्यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीवर जोर दिला तेव्हा त्यांचा मनसुबा आरक्षण नसल्याचे उघड झाले. शरद पवारांनी अलिकडे केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवावी, अशी
मागणी केल्यानंतर जरांगे यांनी पवारांवरही टीका केली. कारण आरक्षणाची मर्यादा वाढेल की नाही हे माहीत नाही, परंतु तूर्तास तरी पवारांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी कलम केली हे त्यांच्या लक्षात आले होते.
नारायण गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात जरांगे निवडणूक लढवण्यासंदर्भात काही घोषणा करतील अशी अपेक्षा होती. परंतु तसे काहीही घडले नाही. आता तर आचारसंहिता, निवडणुकीची तारीख सगळे काही जाहीर झाले आहे. तरीही जरांगे निवडणूक लढवण्याबाबत स्पष्ट काही बोलायला तयार नाहीत.

‘…यांना मुस्लीम संपवायचा, मुस्लीम यांच्या बापाला संपत नाही, मुस्लीम पण मोठा कलाकार आहे, उलट पालटं करून पाडीत असतो.’ हे त्यांचे ताजे विधान आहे. त्यांना नेमकं कोणाला उलथपालथं करायचे आहे, ही बाब तर स्पष्ट आहे. कारण मुस्लीम संपवण्याचा प्रयत्न कोणीही करीत नसले तरी जरांगे हा ठपका मुस्लिमांचे नवे मसीहा उद्धव ठाकरे, जुने मसीहा शरद पवार आणि काँग्रेसवर तर ठेवू शकत नाही. त्यामुळे उरले कोण? भाजपा आणि शिवसेना. मुस्लिमांचा अजेंडा स्पष्ट आहे. त्यांनी तो लोकसभा निवडणुकीच्या काळात स्पष्ट केला. त्यांना कोणाला उलथवायचे आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्यात त्यांनी तरी कोणतीही लपवालपवी केलेली नाही. त्यामुळे मुस्लिमांनी काय करावे हे जरांगे यांनी सांगण्याची गरज नाही. सहा कोटी मराठे आता त्यांना सत्ता उलथवण्यासाठी पुरेसे वाटत नाहीत, हा त्यांच्या विधानाचा अर्थ आहे. कारण राज्यातील मराठा कधीही एकसंधपणे त्यांच्या पाठीशी नव्हता. म्हणूनच सोबत मुस्लीम हवे आणि बौद्ध ही हवे अशी गरज त्यांना भासते आहे. ही जरांगे यांच्यात लपलेल्या ब्रिगेडी चेहऱ्याची खासियत आहे. त्यांना मराठा समाज हिंदू समाजापासून तोडून मुस्लीमांसोबत उभा करायचा आहे.

हे ही वाचा:

तेलंगणात १ कोटी रुपयांची बक्षीस असलेली महिला नक्षली अटक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले पहिले भाजपचे सक्रिय सदस्य!

लाडकी बहिण योजनेला बंद कराल तर ‘करेक्ट कार्यक्रम’ झालाच समजा!

भारतात प्रवेश करताना चार बांगलादेशींना अटक!

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मागे ठेवून जरांगे हे ब्रिगेडी राजकारण राबवित आहेत. जरांगेंनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतली आहे. ओबीसी नेत्यांनी २७ टक्के आरक्षणावर गदा येऊ नये म्हणून उपोषण जरूर केले. परंतु
मुस्लिमांसोबत जाण्याची किंवा मुस्लिमांना सोबत आणण्याची भाषा एकही ओबीसी नेता करताना दिसत नाही. मुस्लिमांना सोबत आणून जरांगेना सत्ता उलथवायची आहे. सत्ता उलथवून ज्यांना सत्तेवर बसवायचे आहे, त्या शरद पवारांनी त्यांच्या सत्ता काळात कधीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही. सत्तेवर आल्यानंतरही ते केंद्र सरकारकडे आरक्षणाची मर्यादा
वाढवण्याची मागणी करण्या पलिकडे काहीच करणार नाहीत. तरीही जरांगे त्यांना सत्तेवर आणण्यासाठी उपद्व्याप करीत आहेत. कारण त्यांचा अजेंडा तोच आहे. त्यांना आरक्षणाशी घेणे देणे नाही. या मुद्द्याचा वापर करून भाजपाला झोडायचे आणि पवारांना मजबूत करायचे एवढेच त्यांचे जीवितकार्य उरलेले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, त्यात ते आता
मुस्लिमांना आरक्षण देण्याचा मामला उपस्थित करीत आहेत. अर्थ स्पष्ट आहे त्यांना हिंदूंमध्ये तेढ निर्माण करायची आहे. पवारांची तुतारी फुंकायची आहे. कारण पवारांचा अजेंडाही एवढाच आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version