भामटा मणिशंकर म्हणतोय नरसिंहराव भाजपाचे पहिले पंतप्रधान

काँग्रेसमध्ये नेहरू आणि बनावट गांधी यांच्या शिवाय कोणालाही किंमत नाही

भामटा मणिशंकर म्हणतोय नरसिंहराव भाजपाचे पहिले पंतप्रधान

काँग्रेस ही नीच संस्कृती आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या उपस्थितीत काँग्रेसच्याच एका नेत्याच्या अशा पुस्तकाचे प्रकाशन होते ज्यात एका दिवंगत नेत्यावर गरळ ओकलेली आहे. काँग्रेस नेतृत्व त्याचे कुठेही खंडन करत नाही, हा काँग्रेसचा खरा चेहरा आहे. इथे नेहरू आणि बनावट गांधी यांच्या शिवाय कोणालाही किंमत नाही.

सोनिया गांधी यांची हुजरेगिरी आणि पाकिस्तानची तळी उचलण्यात हयात गेलेल्या मणिशंकर अय्यर यांच्या मेमॉयर्स ऑफ मावरीक या पुस्तकाचे अलिकडे प्रकाशन झाले. या पुस्तकात दिवंगत पंतप्रधान आणि काँग्रेस नेते पी. व्ही. नरसिंह राव यांच्या विरोधात प्रचंड गरळ ओकण्यात आली आहे.

‘भाजपाचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नव्हे तर नरसिंह राव होते. बाबरी मशीद पडली तेव्हा ते पूजा करत होते. त्यांनी देशातील धर्मनिरपेक्षतेची वाट लावली. ते फक्त लालकृष्ण आडवाणी यांचे ऐकायचे.’ ही मुक्ताफळे मणिशंकर अय्यर यांनी उधळली आहेत. परंतु, त्यावर सोनिया किंवा पक्षाचे अन्य नेते अवाक्षर बोललेले नाहीत.

गांधी- नेहरु परिवाराचे नसलेल्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना किंमत द्यायची नाही हे धोरण नवे नाही. स्वच्छ प्रतिमा आणि प्रचंड कर्तृत्व असलेल्या लालबहाद्दुर शास्त्री यांच्या वाट्यालाही हेच आले. काँग्रेस अध्यक्ष पद भूषवलेल्या सिताराम केसरी यांना तर कॉलरला धरून काँग्रेस कार्यालयाबाहेर काढण्यात आले. सिताराम केसरी हे दलित नेते होते हे विशेष.
नरसिंह राव यांच्याबाबत गांधी-नेहरु परीवारांच्या चाटुकारांचे धोरण वेगळे कसे असेल? नरसिंह राव यांनी पहिल्यांदा  लाल फितीत जखडलेली भारतीय अर्थव्यवस्था मुक्त केली. जागतिकीकरणाचे वारे त्यांच्या काळात भारतात दाखल झाले. आज देशाते आर्थिक क्षेत्रात जी भरारी घेतली आहे, त्याते श्रेय नरसिंह राव यांच्या धोरणांना आहे. १४ भाषा अवगत असलेल्या अत्यंत बुद्धिमान आणि धोरणी असलेल्या या नेत्याचे जेव्हा निधन झाले तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार दिल्लीत होऊ नये, त्यांची समाधी दिल्लीत होऊ नये यासाठी गांधी परिवाराने किती आटापिटा केला होता, याचे वर्णन डॉ. मनमोहन सिंह यांचे माध्यम सल्लागार संजय बारु यांनी त्यांच्या ‘द एक्सिडेंटल प्रायमिनिस्टर’ या पुस्तकातही केले आहे.

हे ही वाचा:

हिमाचल प्रदेशात भूस्खलन; ५४ घरे खचल्याची भीती

पृथ्वी ते चंद्रापर्यंतच्या अंतरापर्यंतचे रस्ते गावागावांत बनले

भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर ब्रिटनने ओकली गरळ

काळू- बाळूंची कन्स्पिरसी थिअरी

काँग्रेसने या दिग्गज नेत्याचा पुन्हा एकदा अपमान केला आहे. तोही सोनिया गांधी यांच्या साक्षीने. हेच काँग्रेसवाले मुहोब्बत कि दुकान वैगेरेची भाषा बोलत असतात. ज्यांच्या मनात स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांबद्दल प्रेम नाही ते इतरांना धडे देत असतात.

हा मणिशंकर अय्यर तर सोनिया गांधी यांचा इमानी कुत्रा आहे. ‘एक चायवाला क्या बनेगा देश का पंतप्रधान’, ही त्याचीच दर्पोक्ती. मोदींना पदावरून हटवण्यासाठी पाकिस्तानची मदत मागणारा भामटा हाच. अय्यर यांच्या पुस्तकातून काँग्रेसची मानसिकताच लोकांसमोर आलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version