लोकसत्ताचे माफीवीर संपादक गिरीश कुबेर यांना पुन्हा एकदा हिंदू समाजाला सल्ला देण्याची उबळ आली आहे. ‘मढ्यांची मदत ’ या मथळ्याचा अग्रलेख पाडताना कुबेर यांनी अयोध्येनंतर काशी, मथुरेमध्ये भव्य मंदीर उभारणीबाबत सुरू झालेल्या चर्चेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
‘अयोद्धेतील वादग्रस्त भूमी राम मंदीरासाठी देऊन या जागेवरील मुस्लीमांचा दावा पूर्णपणे फेटाळल्यांनंतर मंदीर मशीद वादावर पडदा पडणे अपेक्षित होते, पंरतु याबाबत अपेक्षाभंगाची शक्यता जास्त आहे’, अशी भीती कुबेरांनी या अग्रलेखात व्यक्त केलेली आहे. घुबडांना प्रकाशाची कायमच भीती वाटत असते.
अयोद्धेतील रामजन्मभूमीवर भव्य राम मंदीराचा मार्ग देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्वेध केल्यानंतर हिंदू समाजाला काशी विश्वेश्वर आणि मथुरेच्या कृष्णाच्या मुक्तीचे वेध न लागते तरच नवल होते. मुस्लीम आक्रमकांनी देशातील ४० हजार मंदीरे उध्वस्त केली. त्याच इमारतींच्या अवशेषातून हिंदू समाजाला डिवचण्यासाठी मशीदी उभारल्या.
देश स्वतंत्र झाल्यानंतर गझनीच्या महमूदाने उद्ध्वस्त केलेल्या सोरटी सोमनाथाच्या मंदीराचा जीर्णोद्धार झाला. त्याच वेळी रामजन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वेश्वराला मुक्ती मिळेल आणि इथे भव्य मंदीरांचे निर्माण होईल असे हिंदूंना वाटले होते. परंतु कट्टरवादी मुस्लीमांच्या नादी लागलेल्या काँग्रेसने हे घडू दिले नाही. जे काँग्रेसच्या कृपेने मिळाले नाही ते हिंदू समाजाने कधी रस्त्यावर आंदोलने उभारून तर कधी न्यायालयीन संघर्ष करून पदरी पाडून घेतले. कुबेरांसारखे तथाकथित बुद्धीजीवी या संघर्षात कायम विरोधकाच्या भूमिकेत राहीले. काँग्रेस, डावे पक्ष, अगडे-पिछडेचे राजकारण करणारे जातवादी पक्ष या सर्वांनीच या रामजन्मभूमी संघर्षात विरोधकाची भूमिका बजावली.
हे ही वाचा:
कोणाच्या सांगण्यावरून सचिन वाझेने स्फोटकांनी भरलेली गाडी ॲंटिलियासमोर ठेवली
भारताला ‘लायसन्स राज’चा धोका- पॉल क्रुगमन
शरद पवारांनीच अनिल देशमुखांची हकालपट्टी करावी- किरीट सोमैय्या
हिंदू समाजाने दाखवलेल्या अभूतपूर्व एकजुटीमुळे आज राममंदीराचा मार्ग प्रशस्त झाला. शेकडो कारसेवकांच्या बलिदानाने शरयू लाल झाल्यानंतर हिंदूसमाजाला हा दिवस दिसू शकला. राममंदीर संघर्ष करून साध्य झाले. कुबेरांसारख्या हिंदू विरोधी पत्रकारांचे या संपूर्ण लढ्यातले योगदान केवळ अपशकून करण्यापुरते आहे.
‘इतिहासातील अन्याय कोणत्याही उपायांनी भरून येऊ शकत नाहीत, याची जाणीव नसेल तर भविष्य करपते, याचे भान सत्ताधाऱ्यांनी तरी ठेवावे’, असा फुकटचा सल्ला कुबेरांनी पंतप्रधान मोदींना, हिंदू समाजाला अगदी न मागता दिला आहे. दोघे कुबेरांची योग्यता जाणून आहेत.
हिंदू समाज कात टाकू लागल्यानंतर या देशाचा इतिहास एका वेगळ्या वळणाने पुढे जातो आहे. बोगस धर्मनिरपेक्षतेची झापडे गळून पडली आहेत, अरे ला कारे म्हणण्याचे धैर्य, वेळ पडल्यास अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्याचे धैर्य हिंदू समाज दाखवतो आहे. कलम ३७० सारख्या देशद्रोही कायद्यांचे अंतिम संस्कार करण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने दाखवले आहे. कश्मीरच्या खोऱ्यातून दहशतवाद्यांचे उच्चाटन होते आहे, काश्मीर खोऱ्यात हिंदू परतण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. देशात एक नवा इतिहास लिहीला जातो आहे. परीवर्तनाचे हे चक्र कुबेरांसारख्या पत्रकाराच्या कृपाकटाक्षामुळे फिरत नसून हिंदू समाजाने सामर्थ्याची उपासना सुरू केल्याचे हे दृष्य परीणाम आहेत.
हे ही वाचा:
राणे बंधूंनी पुन्हा घेतला वरूण सरदेसाईचा समाचार
जयंत पाटील म्हणतात, वाझे प्रकरणावर चर्चाच नाही
गंगा आरती करणारा, अभ्यागत राष्ट्राध्यक्षांना भगवद् गीता भेट देणारा, मंदीराच्या चौकटीवर नतमस्तक होणारा पंतप्रधान दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाल्यापासून देशातील एक गट प्रचंड अस्वस्थ आहे. धर्मनिरपेक्षतेची झापडे झुगारून राजकीय दृष्ट्या सजग झालेला हिंदू समाज पाहून अधेमध्ये त्यांचा पोटशूळ उठत असतो. निर्भयपणे डोळ्याला डोळा भिडवणारा, ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा ‘अशी गर्जना करणारा हिंदू समाज पाहण्याची त्यांना सवय नाही. जेव्हा जेव्हा स्वत्वाचा हुंकार करणारा हिंदू समाज आपल्या हक्कासाठी उभा ठाकतो तेव्हा कुबेरांसारखे पडीक विचारवंत त्यांना सल्ले द्यायला उभे राहतात. सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता अशा शब्दांची भूल देऊन त्यांना पुन्हा निद्रीस्त करण्याचा प्रयत्न करत असतात.
कोणत्याही उपायांनी जर इतिहासातील अन्यायाचे परीमार्जन होणार नसेल सोमनाथाच्या मंदीराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर त्याच्या लोकार्पण सोहळ्याला देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद का उपस्थित होते? इतिहासाचा कोळसा उगाळणे चूक असेल कदाचित पण इतिहासात झालेल्या चूकांची दुरुस्ती करणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्यच आहे. त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी हिंदू समाजाने ठेवलेली आहे. इतिहासात कमकुवत आणि स्वार्थाने पछाडलेल्या राज्यकर्त्यांमुळे गमावलेले, वर्तमानातील राज्यकर्ते पुर्नस्थापित करत असतील तर कुबेरांना पोटशूळ उठण्याचे कारण काय? देशाचा एखादा कायदा या प्रयत्नात जर अडथळा ठरत असेल तर तो बदलण्यासाठीच पंतप्रधान मोदींना देशाच्या जनतेने प्रचंड बहुमत देऊन सत्तेवर बसवले आहे. कलम ३७०, ३५अ सह अनेक निरुपयोगी कायद्या -कलमांना मोदी सरकारने दफन केलेच की.
आम्हाला, आयोद्ध्या, काशी, मथुरा द्या आम्ही आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या ४० हजार मंदीरांवर पाणी सोडतो अशी समंजस भूमिका संघ परीवाराने घेतली होती. परंतु देशातल्या कट्टरवाद्यांनी आणि त्यांच्या दाढ्या कुरवाळणाऱ्या राजकीय नेतृत्वाने या समंजस मागणीची दखल घेतली नाही. त्यानंतर हिंदू समाजाला आंदोलनाचा मार्ग धरावा लागला. राममंदीर आंदोलनाच्या अगदी पहील्या टप्प्यात औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेले काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार, मथुरेतल्या कृष्ण जन्मभूमीचे पुनर्निर्माण आता कोणीही मायेचा पुत रोखू शकत नाही. हिंदूंच्या एकजुटीने कालचक्राला दिलेले वळण रोखण्याची ताकद घुबडांच्या चित्कारात नाही.