मातोश्रीवर या, भाजपाचे तिकीट मिळवा

मातोश्रीवर या, भाजपाचे तिकीट मिळवा

उबाठा गटाच्या खासदार कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरेंना नारळ दिला आहे. त्या आता भाजपाच्या तिकीटावर दादरानगर हवेलीची निवडणूक लढवणार आहेत. २०२१ च्या फेब्रुवारीमहिन्यात खासदार मोहन डेलकर यांनी मरीन ड्राईव्ह येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नी कलाबेन यांनी शिवसेनेत प्रवेश करून लोकसभेची पोटनिवडणूक जिंकली होती. शिवसेनेने श्रीमती डेलकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाचा गेम करायचा होता. हा गेम अंगलटआला. कलाबेन डेलकर यांनी उबाठाची साथ सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर विश्वासव्यक्त केला आहे.

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाने जारी केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्राच्याउमेदवारांसोबत डेलकर यांचेही नाव दादरा नगर हवेलीसाठी जाहीर झाले. डेलकर यांची उमेदवारीम्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चपराक होती. मोहन डेलकर हे सात वेळा खासदार होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहीलेल्या चिठ्ठीत प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर मानसिक छळ केल्याचाठपका ठेवला होता. एकाही भाजपा नेत्याचा त्या चिठ्ठीत उल्लेख नव्हता. तरीही डेलकर यांच्याआत्महत्येचे प्रकरण तापवून भाजपाविरोधाचा कंड शमवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला.

डेलकर हे सात वेळा खासदार होते, ते पळपुटे नव्हते. म्हणूनच त्यांची आत्महत्या संशयास्पद आहे’, असे संजय राऊत वारंवार सांगत होते. भाजपा नेतृत्वाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करीत होते. भाजपाविरोधात कोणी उभे ठाकले आहे, असा संशय जरी आला तरी त्याचीसामनामधून भलामणकरणे, त्याला मातोश्रीवर बोलवणे, दुसऱ्या दिवशी त्याचा फोटो सामनामध्ये छापणे अशी प्रथाठाकरेराऊत जोडगोळीने सुरू केलेली आहे. असे मातोश्रीवर फोटो काढून गेलेले पुढे भाजपामध्येजातात. आमदारखासदार होतात. अल्पकाळ मिळालेला आनंद टिकत नाही. ठाकरे हात चोळतबसतात. डेलकर बाईंच्या आधी मातोश्रीवर हार्दीक पटेलही आले होते. ते भाजपाचे आमदार झाले. मातोश्रीवर आल्यानंतर बहुधा भाजपामध्ये आमदारखासदार बनण्याचा मार्ग प्रशस्त होतो.

शत्रूचा शत्रू मित्र असतो, हे सूत्र मान्य केले तरी त्या मित्रामुळे तुमचा फायदा होईल किंवा मित्राचेतुमच्यामुळे भले होईल, अशातला भाग नसतो. आपण दोघे समोरच्याच्या विरोधात एका बाजूलाआहोत या मानसिक समाधानाच्या पलिकडे याचा फायदा होत नाही. हार्दीक पटेल आणि डेलकर हेदोघेही गुजरातमध्ये भाजपाच्या विरोधात उभे होते. आंधळा विरोध करण्यात हशील नाही, हे त्यांच्यावेळीच लक्षात आले. त्यांना रोज सकाळी उठून दुसऱ्याच्या विरोधात पिंका टाकण्याचे काम करायचेनव्हते. राजकारण करायचे होते. त्यामुळे चार पावलं ते पुढे आले, चार पावलं भाजपाने पुढे टाकली, विषय संपवला.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जी जखमी, डोक्याला गंभीर दुखापत

पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीच सक्षम!

मुंबई इंडियन्स दाखवणार होते बुमराहला बाहेरचा रस्ता?

मुंबईला ४२वे रणजी विजेतेपद, १० कोटींची कमाई

कलाबेन डेलकरांचा २०२१ मध्ये झालेला विजय ही काही ठाकरेंची मेहरबानी नव्हती. ‘अडचणीतकलाबेन यांना आधार दिला, आता त्या भाजपाकडे जातायत. त्या कुटुंबाला निष्ठा, इमान नसेल तरठीक आहे’, अशी डायलॉगबाजी संजय राऊत यांनी केलेली आहे. हे काही खरे नाही. ठाकरे आणित्यांच्या चेल्यांनी निष्ठेच्या गोष्टी करू नये. अलिकडे आमदार कपिल पाटील यांच्या पक्ष स्थापनेच्यासोहळ्यात ठाकरे गेले होते. त्याच दिवशी त्यांनी कपिल पाटील यांच्या पक्षाचा पदाधिकारी फोडलाआणि आपल्या पक्षात घेतला. हे ठाकरेंचे व्यवहार आहेत. लोकांना हे ठाऊक असल्यामुळे तेहीठाकरेंशी तसेच वागतात. मोहन डेलकरांनी दादरा नगर हवेलीची बांधणी अशी केली होती की तेसातत्याने तिथे विजयी होते होते. शिवसेनेचा त्या विजयात काडीमात्र वाटा नव्हता. गुजरातमध्येशिवसेनेचेही अस्तित्व नव्हते. उबाठा गटाचे अस्तित्व असण्याचा प्रश्नच येत नाही.

संजय राऊतांना सुशांत सिंह राजपूत याच्यासारख्या कलाकाराच्या कथित आत्महत्येत, दिशासालियानच्या आत्महत्येत काही काळेबेरे असल्यासारखे वाटत नाही, कारण या आत्महत्यामविआच्या शासन काळात झालेल्या असतात. अगदी मनसुख हिरणच्या हत्येनंतरही उबाठा गटालाकधी हळहळ वाटली नाही. परंतु दादरा नगर हवेलीत आत्महत्या होते, या घटनेचा भाजपाच्याविरोधात वापर केला जाऊ शकतो, अस वाटल्यामुळे डेलकर यांचा मात्र त्यांना पुळका येतो. ठाकरेआणि राऊत तातडीने त्यांना धीर द्यायला धावतात.

कलाबेन डेलकर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मोदीशहा यांच्यावर विश्वास व्यक्त केलाआहे. अर्थात त्या शिवाय त्यांनी भाजपाचे तिकीट स्वीकारलेले नाही. त्यांनी फक्त भाजपावर विश्वासव्यक्त केलेला नसून ठाकरेराऊतांवर उबाठा गटाचे तिकीट नाकारून अविश्वास ठाकरेंवर अविश्वासव्यक्त केलेला आहे.

भाजपाचे नाक कापण्यासाठी आपला वापर होतोय, अशी उपरतीही कलाबेन यांना झाली असावी. त्यांचा भाजपा प्रवेश हा ठाकरेंच्या उथळ राजकारणाला चपराक आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version