एकनाथ शिंदेंचे नमस्ते सदा वत्सले… घरगड्याला वांत्या..

सध्या वाचाळशिरोमणी काँग्रेसचे उकीरडे फुंकण्याचे काम करतायत

एकनाथ शिंदेंचे नमस्ते सदा वत्सले… घरगड्याला वांत्या..

१९२५ मध्ये पूजनीय डॉ.केशव बळिराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. पुढच्या वर्षी या ऐतिहासिक घटनेला पुढील वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या शंभर वर्षात संघाच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. हिंदू समाजाचा आधारवड म्हणून संघाकडे पाहिले जाते. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा महामंत्र संघाने समाजाला दिला. आज ज्यांना हिदुंत्वाबाबत ममत्व वाटते, राष्ट्राच्या महान पंरपरेबाबत इतिहासाबाबत ज्यांना अभिमान आहे, त्या प्रत्येकाला संघ हा एखाद्या धगधगत्या अग्निकुंडासारखा वाटतो. अशी प्रत्येक व्यक्ति संघाच्या महत्तेसमोर मान तुकवते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तेच केले. परंतु या मुळे अनेकांच्या पोटात गोळा आलेला दिसतोय.

संघ ही कार्यकर्ता घडवणारी कार्यशाळा आहे. प्रशिक्षण हा संघ परिवारातील स्थायी उपक्रम. महायुतीच्या आमदारांसाठी आज रेशीम बागेतील संघ मुख्यालयात बौद्धिकाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाच्या आमदारांसह शिवसेनेचे आमदार यात सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे देखील यात सामील झाले होते. लहानपणी मी संघाच्या शाखेत गेले होतो, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना उघड केली. सज्जाद नोमानींच्या सिपहसालारचा सिपहसालार यामुळे भंयकर अस्वस्थ झालेला आहे. उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नोमानी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सिपहसालार म्हणून नियुक्ती केली होती. तेव्हा ना त्यांना लाज वाटली, ना त्यांच्या लाचारशिरोमणी प्रवक्त्यांना. औरंगजेबाच्या कबरीवर वाकणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालतानाही त्यांना कोणतीही अडचण नव्हती. परंतु एकनाथ शिंदे संघाच्या मुख्यालयात गेले तेव्हा त्यांच्या पोटात मुरडा उठला. मराठीत एक म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय? तो उकीरडे फुकतानाच सुखी असतो. सध्या वाचाळशिरोमणी काँग्रेसचे उकीरडे फुंकण्याचे काम करतायत.

हे ही वाचा:

“मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो”

संयुक्त राष्ट्रीय मुक्ती मोर्चाकडून मणिपूरमध्ये करोडोंची उधळपट्टी

राहुल गांधींमुळे झाली दुखापत; जखमी भाजपा खासदाराचा आरोप

स्पीड बोटीतला माणूस प्रवासी बोटीच्या डेकवर येऊन पडला आणि…

शिवसेनाप्रमुखांनी संघावर कधीही विखारी टीका केली नाही. पांढऱ्या केसांचा संघ, असा एक अग्रलेख सामनामध्ये प्रसिद्ध झाला होता. संघ तरुणांचे लोणचे घालतो, असेही ते म्हणाले होते. संघानेही त्याला चोख उत्तर दिले होते. काळ्या कलपापेक्षा अनुभवसिद्ध असलेले पांढरे केस कधीही बरे. अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या दोन्ही बाजूने चालायच्या. परंतु ना शिवसेनाप्रमुखांच्या टिकेत कधी विखार होता, ना संघाच्या प्रत्युत्तरात. कारण दोघांचा रंग समान होता. भगवा…  एकनाथ शिंदे आज रेशीमबागेत जाऊन आल्यामुळे ठाकरेंच्या घरगड्याने, खरे तर पवारांच्या किंवा राहुल गांधींच्या घरगड्याने म्हटले तरी चालेल, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

‘दुसऱ्याकडे बौद्धिक घ्यावे इतकी भीक आम्हाला कधीच लागली नाही, शिवसेनाप्रमुख त्या वाटेने कधी गेले नाहीत’, अशी टीका त्यांनी केली. शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत हिंदुत्व सोडून जे अचानक नेहरुंचा जय जयकार करू लागले, राहुल गांधींचे जोडे उचलू लागले, त्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली. १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना करण्यात आली. शिवसेनेने संघाप्रमाणे हिंदुत्वाचा भगवा ध्वज स्वीकारला, संघाप्रमाणे शाखा आणि गट अशीच संघटनेची रचना केली. संघ विजयादशमीचा उत्सव साजरा करतो, या दिवशी देशभरात स्वयंसेवक संचलने काढतात. शिवसेनेने दसरा
मेळावा सुरू केला. हे साम्य कशामुळे आहे, हे एकदा घरगड्याने स्पष्ट करावे.

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. पुढे हिंदुत्वाची विचारसरणी शिवसेनाप्रमुखांनी अंगिकारली, त्याची प्रेरणा कुठून घेतली. काँग्रेस की मुस्लीम लीग? संघाच्या शाखेत गेलेले अनेक स्वयंसेवक शिवसेनेत सक्रीय झालेले दिसतात. अंधेरीचे दिवंगत आमदार रमेश लटके हे त्यापैकी एक. ते संघाचे शाखेत जाणारे नियमित स्वयंसेवक होते. संघाच्या शाखेत जाणाऱ्या अनेकांनी पुढे भाजपा किंवा शिवसेनेची वाट चोखाळली याचं अजिबात नवल नव्हते कारण भगवा तिथेही होताच. आज देश राममय झालेला दिसतो. धर्म-संस्कृतीशी काडीचे देणेघेणे नसलेल्या राहुल गांधी, प्रियांका यांच्यासारख्या नेत्यांना मंदिरात जाण्याची नौटंकी करावी लागते, हे संघाच्या गेल्या शंभर वर्षांच्या तपस्येमुळे शक्य झाले आहे. कधी काळी वळचणीवर पडलेल्या हिंदुत्वाला जे अच्छे दिन दिसतायत, त्यामागे संघाची शंभर वर्षांची तपस्या आहे.

हा यज्ञ धगधगत ठेवण्यासाठी अनेक दधिचींनी आपल्या आयुष्याची समीधा अर्पण केली. कित्येक पिढ्या खपल्या आहेत. केवळ दलाली आणि टक्केवारीवर जगणाऱ्यांना, कोरोनाच्या काळातही आपले उखळ पांढरे कऱणाऱ्यांना, हे कळायचे नाही.
२०१९ मध्ये महाराष्ट्रात काही लोकांनी सत्तेसाठी वैचारिक सुंता करून घेतली. हिंदुत्वाची रुद्राक्ष माळ बाजूला ठेवली आणि सर्वधर्म समभावाच्या नावाखाली सज्जाद नोमानी सारख्या प्रवृत्तींची चाटुकारिता सुरू केली. असे म्हणतात की, बाटग्याची बांग जरा जास्तच जोरात असते. महाराष्ट्रातील काही बाटग्यांच्या बाबतीत हे तंतोतंत खरे आहे. नोमानी आणि अबू आझमींची बिर्याणी ज्यांनी खाल्लेली आहे, ते मीठाचा हक्क अदा करण्यासाठी संघावर भुंकण्याचे काम करतायत.

एकनाथ शिंदे यांचे रेशीमबागेत जाणे तर निव्वळ निमित्त आहे. ज्यांच्या बुडाखालून सत्तेची खुर्ची निसटली आहे, त्यांना पुरेपूर कळले आहे. या देशात जोपर्यंत संघ आहे, तो पर्यंत हिंदुत्व बुडवणाऱ्या बाटग्यांची खैर नाही. सगळ्या जगात हिंदुत्वाचा डंका वाजतो आहे. संघ हे विश्वव्यापी संघटन बनले आहे. कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत आणि कावळ्याने काव काव केल्यामुळे संघाला फरक पडत नाही. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले मोदी संघाचे स्वयंसेवक आहेत, अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री संघाचे स्वयंसेवक आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठ्या अभिमानाने ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे…’ म्हणतात. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीमबागेत जाऊन पूजनीय डॉ.केशव बळिराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतात. स्वत:ला स्वयंसेवक म्हणवून संघाशी जोडतात.
त्यामुळे वळचणीत पडलेल्यांना पोटदुखी होत असेल तर खुशाल होऊ दे. फूल होंगे शूल सारे, मित्र होंगे सब विरोधक… ही संघाची पूर्वापार भूमिका राहिलेली आहे. वाटचाल मात्र, हाती चले बाजार, कुत्ते भौके हजार अशीच राहिलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version