22 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरसंपादकीयवैभव कदम यांचा मनसुख हिरेन झालाय की मारुती कांबळे?

वैभव कदम यांचा मनसुख हिरेन झालाय की मारुती कांबळे?

करमुसे प्रकरणाची फेरचौकशी सुरू झाल्यानंतर कदम प्रचंड मानसिक तणावाखाली होते.

Google News Follow

Related

ठाण्यातील अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील एक आरोपी, पोलिस कॉन्स्टेबल वैभव कदम यांचा मृत्यू धक्कादायक आहे. सकाळी तळोजा-निळजे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळा शेजारी कदम यांचा मृतदेह सापडला. मनसुख हिरण याच्या मृत्यूप्रमाणे महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना आहे.

वैभव कदम हे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे ते अनेक वर्ष अंगरक्षक होते.
ठाणे रेल्वे पोलिसांना सकाळी हा मृतदेह सापडला. ठाण्यातील अनंत करमुसे या तरुणाचे अपहरण आणि मारहाण प्रकरणात वैभव नाईक यांच्या सह आणखी दोन पोलिसांना आरोपी करण्यात आले होते.  ५ एप्रिल २०२० मध्ये ऐन कोविडच्या काळात अनंत करमुसे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टनंतर रात्री अकराच्या सुमारास कदम यांच्यासह अन्य दोघे कॉन्स्टेबल करमुसे यांच्या घरी गेले. पाच जण खाली उभे होते. दोन गाड्यांतून हे आठ जण करमुसे यांच्या घरी आले होते. ‘तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये बोलवले आहे’, अशी थाप मारून करमुसे यांचे अपहरण केले आणि आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने करमुसे यांनी याचिकेवर निर्णय देताना मारहाण प्रकरणाची फेरचौकशी करून तीन महिन्यात अहवाल देण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. करमुसे मारहाण प्रकरणात अनेक महत्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. विवियाना मॉलचे सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल लोकेशनचा डेटा सुद्धा पोलिसांना मिळाले आहे. वैभव कदम यांना करमुसे मारहाण प्रकरणात अटक झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांना सेवेत घेण्यात आले. करमुसे प्रकरणाची फेरचौकशी सुरू झाल्यानंतर कदम प्रचंड मानसिक तणावाखाली होते. काही दिवसांपूर्वी त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. कदम यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना कोणतीही चिठ्ठी पोलिसांना सापडली नाही. परंतु त्यांना जे काही सांगायचे आहे, ते त्यांनी व्हॉटस्अप स्टेटसच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

‘मीडियाला आणि पोलिसांना माझी विनंती आहे की मी आरोपी नाही.’ बहुधा आरोपी मी नाही, दुसऱ्याचे बालंट माझ्या कपाळी आले आहे, असे तर त्यांना सुचवायचे नसेल ना? करमुसे प्रकरणात कदम यांच्यासोबत तुषार मोरे, सुरेश जनाठे हे अन्य दोघे होते. राजकीय दृष्ट्या वजनदार व्यक्तिंकडे अंगरक्षक म्हणून काम करणाऱ्या पोलिसांची काय अवस्था असते. अनेकदा त्यांना भाजी आणणे इस्त्रीचे कपडे आणणे, मुलांना शाळेतून आणणे अशा घरकामालाही जुंपले जाते. आव्हाडांनी चार पावले पुढे वापर करून घेतला. स्वत:चा बदला घेण्यासाठी त्यांना वापरले. अपहरणासारखे गुन्हेगारी स्वरूपाचे काम त्यांच्याकडून करून घेतले.

करमुसे यांनी जेव्हा या प्रकरणात मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली तेव्हा, आव्हाडांनी स्वत:ची सुटका करून घेतली या पोलिसांना वाऱ्यावर सोडल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई झाली. पोलिस याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांकडून माहीती घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी कदम यांनी आव्हाड यांची भेट घेतली होती, असे समजते. कदम यांच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. कदम यांचा मनसुखे हिरेन झालाय का? अशी शंकाही लोक व्यक्त करीत आहेत. एंटालियाखाली ठेवेलेल्या स्फोटक प्रकरणातील सगळा तपशील मनसुख हिरेनला माहीती होता, तो गप्प बसेल अशी शक्यता नव्हती म्हणून एपीआय सचिन वाजेने त्याचा गेम केला. कदम यांच्याबाबती असे काही घडले नसेलच असे ठामपणे सांगता येईल अशी परिस्थिती नाही.

हे ही वाचा: 

बोरिवली रेल्वे स्टेशनवर विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला अटक

मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का?

कर्नाटकात एकाच टप्प्यामध्ये होणार निवडणुका

पुढची रामनवमी नव्या श्रीराम मंदिरात होईल?

 

कदम माफीचा साक्षीदार होणार होता का? एका पोलिस कॉन्स्टेबलने याप्रकरणात सरकारी पक्षाच्या बाजूने साक्ष दिली असती तर त्याचा काय परिणाम झाला असता याची कल्पना आपण करू शकतो. एकूणच कुणाच्या वैयक्तिक सूडापायी आपल्या आय़ुष्याची राखरांगोळी झाली, याची सल तर कदम यांच्या मनात निश्चितपणे असणार. कुणाच्या दडपणाखाली काही तरी करायला गेलो आणि आरोपीचा शिक्का कपाळी आला. ही भावना त्यांना त्यांच्या स्टेटसवरही ठेवली आहे. राजकारणापायी एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्याची माती झाल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे.

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी याप्रकरणात कदम यांचा मारुती कांबळे झाला असण्याची शक्यता ट्वीटवरवर व्यक्त केली आहे. कदम यांनी कोणाच्या दबावाखाली आयुष्य संपवले? ही बाब लोकांच्या समोर येण्याची गरज आहे. कदम यांच्या मृत्यूनंतर करमुसे यांना तातडीने सुरक्षा देण्याची गरज निर्माण झाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जनतेची अपेक्षा आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा