एखाद्या पक्षाच्या नेत्याला टार्गेट करण्यात येते तेव्हा त्याचा समाचार घेण्यासाठी पक्षाची सगळी यंत्रणा कामाला लागते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी याला अपवाद आहेत. बांगलादेशातील सलाह उद्दीन शोएब चौधरी हा पत्रकार गेले काही दिवस त्यांच्याविरोधात एकापेक्षा एक असे गंभीर आरोप करतो आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी त्यांचे कनेक्शन असल्याचे सांगतो तरीही काँग्रेसकडून त्याचा चकार शब्दाने निषेध होत नाही, त्याबाबत खुलासा होत नाही, कार्यकर्ते-नेते रस्त्यावर उतरत नाहीत, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करीत नाहीत. चौधरीने केलेल्या आरोपांपेक्षा काँग्रेस नेत्यांचे मौन जास्त गंभीर आहे. काँग्रेस नेते सोनिया गांधींवर होणाऱ्या भडीमाराला अनुल्लेखाने टाळत असल्यामुळे हा सगळा मामलाच प्रचंड गूढ-गंभीर बनला आहे. यातून सोनिया गांधी यांच्या भोवती असलेले गुढतेचे वलय अधिकच गडद झालेले आहे.
बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर सलाह उद्दीन शोएब चौधरी हा पत्रकार अचानक चर्चेत आला. राहुल गांधी यांचा बांगलादेशात झालेल्या उठावात हात होता असा दावा त्याने केला. कॉन्स्पिरसी थिअरी मांडणे हा काही लोकांचा छंद असतो. अशा शेकडो थिअरीज आजही चवीने चघळल्या जातात. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येपासून ९/११ चा हल्ला, ओसामा बिन लादेनची हत्या अशा अनेक विषयांबाबत कॉन्स्पिरसी थिअरी मांडण्यात आलेल्या आहेत. त्यावर चविष्ट चर्चाही होत असते.
जागतिक राजकारणातील घडामोडी, त्यातली गुंतागुंत, राजकीय पटावरील दबावगट, देशादेशात होणारे घातपात, कॉण्ट्रॅक किलर्स, नेत्यांच्या हत्या, गुप्तचर संस्थांच्या छुप्या कारवाया, त्यांच्यासाठी मानवाधिकार, एनजीओचे मुखवटे घालून राबणाऱ्या संघटना यांची सरमिसळ जगभरात उलथापालथ घडवत असते. या घडामोडी एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमापेक्षा कमी रोमांचक नसतात. चौधरी यांनी मांडलेली थिअरी तशीच आहे. ती खरी की खोटी हे आज तरी कोणी ठामपणे सांगू शकत नाही. परंतु, त्यांच्या आरोपांवर काँग्रेसकडून बाळगले जाणारे मौन संशयास्पद आहे.
चौधरी यांनी सोनिया गांधी यांच्या जन्मापासूनच त्यांच्याबाबत गूढ निर्माण केलेले आहे. स्टीफॅनो आणि पॉला माईनो या दांपत्याचे अपत्य म्हणजे सोनिया. सोनिया यांच्या जन्माच्या वेळी स्टीफॅनो हे तुरुंगात असल्यामुळे ते त्यांचे जन्मदाते नसून सोनियांचा जन्म अज्ञात नाझी सैनिकापासून झाला, इथपासून चौधरी यांच्या आरोपांची सुरूवात होते. सोनियांचे खरे पिता कोण? हा भारतीयांच्या दृष्टीने चिंतेचा विषय नाही. त्यामुळे त्यात फार खोलात जाण्याचे कारण नाही. परंतु, चौधरी यांनी पुढे केलेले आरोप भारताच्या आणि भारतीयांच्या दृष्टीने निश्चितपणे चिंतेचा विषय आहेत.
राजीव गांधी यांची भेट होण्यापूर्वी सोनिया गांधी या पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात आल्या. राजीव गांधीसोबतचे त्यांचे प्रेमप्रकरण हे आयएसआयने टाकलेले जाळे होते, असा धक्कादायक दावा जेव्हा चौधरी करतात तेव्हा मात्र त्याची सत्यता जाणून घेणे हे भारतीयांचे कर्तव्य बनते. कारण या विषयाचा थेट संबंध भारताच्या सार्वभौमत्वाशी आणि सुरक्षेशी आहे.
इटलीतून लंडनमध्ये येण्यापूर्वी हेदविज एण्टानिया अल्बानिया माईनो अर्थात सोनिया यांनी प्रियकर फॅंको ल्युझिअन याच्याशी विवाह केला होता. हे संबंध राजीव यांच्याशी विवाह झाल्यानंतर सुद्धा कायम होते. एस्कॉर्ट्स सर्व्हीसमध्ये काम करणाऱ्या सोनिया यांचा लंडनमध्ये सलमान तासीर यांच्याशी पहिल्यांदा संबंध आला. एस्कॉर्ट सर्व्हीस म्हणजे नेमके काय असते हे माहीत नसेल तर गुगुलवर तपासता येईल. परंतु, हा काही सभ्य पेशा नाही. सलमान तासीर हा पाकिस्तानी होता. लाहोरचा रहिवासी होता. आयएसआयच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध होते. तो लंडनमधील आयएसआयच्या नेटवर्कचा एक भाग होता. सोनिया या आपल्या कामासाठी उपयुक्त असल्याचे लक्षात आल्यानंतर सलमानने त्यांना आपल्या लंडनमध्ये कार्यालयात रुजू करून घेतले. तो हेदविज सोबत बराच वेळ घालवायचा, तिच्यावर प्रचंड पैसा उधळायचा. या दोघांचे काही लफडे आहे, अशी चर्चा सलमानच्या स्टाफमध्ये होती. इथून हेदविज मायनो उर्फ सोनिया आयएसआयच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याचे चौधरी सांगतो. आयएसआयचा ब्रिगेडीयर रीयाज हुसैन यांच्याशी त्यांची भेट झाली. आयएसआयचा प्रमुख झहीर उल इस्लामशी त्यांचा नियमित संपर्क होता. २०१४ पर्यंत ते एकमेकांच्या संपर्कात होते. झहीर हा २०१४ पर्यंत आयएसआयच्या प्रमुखपदी होता.
चौधरी हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की, सोनिया गांधी यांचा आयएसआयने राजीव यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोहऱ्यासारखा वापर केला. गांधी घराण्यात दाखल झाल्यानंतरही आयएसआयशी त्यांच्या नियमित संपर्क सुरू होता. सोनिया या कट्टर कॅथोलिक आहे. त्यांचा ज्या घराण्यात विवाह झाला तिथेले दोन पंतप्रधान म्हणजे इंदीरा गांधी आणि राजीव गांधी हे तर त्यांच्या परिवाराचे सदस्य होते. यूपीएच्या काळात तर मनमोहन सिंह यांना त्यांनीच पतंप्रधान पदावर बसवले. अर्थात सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात त्या वावरत होत्या. कदाचित खूप महत्वाच्या घडामोडी त्यांच्या कानावर विनासायस पडत असतील. विवाहापूर्वी जे काही घडले तो अपघात होता, सोनियांनी पोटापाण्यासाठी किंवा काही अन्य कारणस्ताव ते केले असे क्षणभर मानले तरी विवाहानंतर त्या आयएसआयशी संपर्कात का राहिल्या हा प्रश्न शिल्लक राहतोच. आयएसआयच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या संवादाचा विषय काय होता, जाणून घेणे हा भारतीयांचा अधिकार आहे.
हे ही वाचा..
जे जे रुग्णालयात अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी रूमचे उद्घाटन
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू पाच दिवसांच्या पॅरोलवर बाहेर
बंगाल बंद: भाजप नेत्याच्या गाडीवर बॉम्ब, गोळीबाराची घटना !
सोनिया गांधी यांच्यावर हे असे आरोप पहिल्यांदा झालेले नाहीत. सुब्रमण्यम स्वामी यांनीही सोनिया गांधी यांना अशाच प्रकारच्या आरोपावरून टार्गेट केले आहे. सोनिया यांच्या गांधी घराण्यातील एण्ट्रीनंतर राजेश पायलट, माधवराव सिंधिया यांचे झालेले अपघाती मृत्यू, इंदीरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्या, सोनिया यांच्या घराण्याचे केजीबी कनेक्शन अशा अनेक विषयांकडे स्वामी यांनी अंगूलीनिर्देश केलेला आहे. उपचारांच्या नावाखाली सोनिया सतत अमेरिकेत का जातात ? त्यांना कोणता आजार झाला हे त्यांनी कधी उघड का केले नाही? नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांचे अमेरिकेत जाणे अचानक बंद कसे झाले? असे अनेक प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी वारंवार उपस्थित केले आहेत. स्वामी हा काही अनपढ, अशिक्षित माणूस नाही. ते राजीव गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. अनेक प्रकरणात न्यायालयात जनहीत याचिका दाखल करून अभ्यासपूर्ण युक्तिवाद करत, भक्कम पुरावे सादर करून त्यांनी अनेकांचे राजकारण संपवलेले आहे. परंतु स्वामी यांनी आरोप केले तेव्हाही काँग्रेसने याबाबत खुलासा केलेला नाही. परंतु आता एक पत्रकार जाहीरपणे आरोप करतोय की सोनियांचा यांचा राजीव यांच्याशी झालेला विवाह हा आयएसआयच्या भारतविरोधी षडयंत्राचा भाग होता, त्यावरही काँग्रेसला खुलासा करण्याची आवश्यकता वाटू नये हे आश्चर्य आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)