पहेलगाममध्ये २७ हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. हत्या करण्यापूर्वी खातरजमा करण्यात आली की ते हिंदू आहेत, की मुसलमान. काफीर हिंदू असल्यामुळे त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता. निर्घृणपणे त्यांची हत्या
करण्यात आली. प्रियंका वाड्राचा नवरा आणि सोनिया गांधी यांचा जावई एवढीच ज्यांची ओळख किंवा लायकी आहे, त्या रॉबर्ट वाड्रा यांनी या घटनेवर भाष्य करताना मोदी सरकारच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे हे घडल्याचा ठपका ठेवला. एक
प्रकारे पाकिस्तानला क्लीनचिट दिली. ही काँग्रेसी इकोसिस्टीमची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे, हे लक्षात असू दे. हे लोक दहशतवाद्यांपेक्षा कमी खतरनाक नाहीत. हे कधी हिंदूंना दहशतवादी ठरवतात, पाकिस्तानी पुरस्कृत हत्याकांडाचे
खापर हिंदुत्ववाद्यांवर फोडतात. बाकीच्या हिंदूंना गंगाजमनी तहजीबचे चाटण देऊन त्यांना कायम गुंगीत ठेवत असतात. हेच यांचे धंदे. पाकिस्तानचा समाचार घेण्यास मोदी सरकार सक्षम आहे. पाकिस्तानच्या तालावर नाचणाऱ्या या
नाच्यांचा हिशोब मात्र जनतेलाच करावा लागणार आहे.
रॉबर्ट वाड्रांना जे काही सांगायचे आहे, ते सांगताना ही माझ्या कुटुंबाची किंवा पक्षाची भूमिका नसून माझी वैयक्तिक भूमिका आहे, अशी मखलाशी करायला ते विसरलेले नाहीत. हे सत्य नाही. काँग्रेसला जेव्हा मनातलं सांगायचे असेल तेव्हा
पदाचा शिक्का नसलेल्या अशा बिन पेंद्यांच्या लोट्यांमार्फत सांगण्याची त्यांची पद्धत आहे. ही काँग्रेसची खासियत आहे.
‘मोदी सरकारच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन असे तट पडले आहेत. मुस्लीम अस्वस्थ आहेत. हिंदूंमुळे आपण अडचणीत आल्याची त्यांची भावना आहे. दहशतवादी धर्म विचारून हत्या करण्यात येत असतील तो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संदेश आहे की मुस्लिमांमध्ये आपण कमकुवत झाले असल्याची भावना आहे.’
पहलगामचे हत्याकांड मोदी सरकारच्या हिंदुत्वामुळे घडले, ही भूमिका फक्त वाड्रांची नाही. ती पाकिस्तानची या हल्ल्याबाबत अधिकृत भूमिका आहे. त्यांनीही म्हटले आहे. ‘आमचा या हल्ल्याशी संबंध नाही. हिंदुस्तानातील अंतर्गत कलहातून हा हल्ला झालेला आहे. कारण जर हे मोदी सरकारच्या हिंदुत्वामुळे घडलं असेल तर, पाकिस्तान पुरस्कृत
दहशतवादाशी त्याचा काही संबंध नाही, असाच त्याचा अर्थ आहे. वाड्रा हा नाच्या आहे. परंतु त्याची भूमिका ही त्याच्या कुटुंबियांची भूमिका आहे. ते कुटुंब जे देश चालवते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मधुबनी येथे सभा झाली. दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांच्या कल्पनेत नसेल असा धडा शिकवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात आजवर जी काही ठोस कारवाई झाली, ती मोदी सरकारनेच केली. त्यामुळे यावेळी उरी आणि बालाकोटमधील कारवाई किरकोळ वाटेल अशी कारवाई होण्याची शक्यता आहे. ती झालीच पाहिजे. परंतु एक कारवाई भारतातील पाकिस्तानच्या बगलबच्च्यांच्या विरोधातही झाली पाहीजे. भारतावर आलेले प्रत्येक संकट ही ज्यांना मोदी सरकारकडे बोट दाखवण्याची आणि दात दाखवत हसण्याची राजकीय संधी वाटते, जे पाकिस्तानच्या भूमिकेला बळ देणारी भूमिका घेऊन देशाच्या शत्रूची मदत करतात, असे काँग्रेस आणि त्यांच्या तैनाती फौजांचे तमाम नेते यांना धडा शिकवण्याची गरज आहे.
सीमेच्या पलिकडे असलेला शत्रू जितका धोकादायक तेवढाच धोका या जयचंदांकडून आहे. देशात लोकशाही आहे, म्हणून देशहितावर वरवंटा चालवण्याची, वाट्टेल ते बोलण्याची, जनतेची दिशाभूल करण्याची आपल्याला मुभा मिळालेली नाही, याची जाणीव त्यांनाही झाली पाहीजे. ही किड खूप खोलवर पोखरत चालली आहे. पहेलगाम हल्ला झाल्यानंतर देशात हिंदू-मुस्लीम करू नका, असा शहाणपणा शिकवणाऱ्या अनेक पोस्टचा समाज माध्यमांवर रतीब घातला जात आहे. काँग्रेसची इको सिस्टीम या घटनेतही राजकीय रोट्या शेकवण्याचा प्रयत्न करीत आहे. एखाद्या घटनेमुळे देश जेव्हा पेटून उठतो, तेव्हा काँग्रेसी इकोसिस्टीम मतपेढी मजबूत करण्याच्या कामाला लागलेली असते. देश गेला चुलीत, मतपेढी महत्वाची अशीच त्यांची करणी असते. पूजा मोरे नावाची एक अतिशहाणी काश्मीरमधून बोंब ठोकून मृतकांच्या पीडित परीवारांना खोटे ठरवण्याचे धंदे करतेय. ती ओरडून सांगतेय की, ‘ दहशतवाद्यांना हिंदू आहात की मुस्लीम असे विचारून पर्यटकांना ठार केले, असे पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी कश्मीरमध्ये फिरते आहे, परंतु मुस्लिम माझ्या पाठीशी उभे आहेत.’
हे ही वाचा:
पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या अतुल मोनेंच्या पत्नीला मध्य रेल्वेत नोकरी
“भोंगा मुक्त मुलुंड”, मशिदींवरील अनधिकृत भोंगे पोलिसांनी उतरवले!
पाकिस्तानचा शेअर बाजार अडीच हजारांनी पडला!
सिंधू जल कराराचे स्थगन योग्य दिशेने उचललेले पाऊल
या महिलेचे नाव पूजा मोरे आहे. तिचे हे विधान व्हायरल झाल्यावर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील तिचा फोटोही व्हायरल झाला. म्हणजे ही कोणत्या खाणीतली माती आहे, हे देशवासियांच्या लक्षात आले. मुळात घटनेचे गांभीर्य समजण्याची अक्कल नाही. आणि जिथे तिथे राजकारण करण्याची खोड, त्यातून हे असले निलाजरे प्रकार घडतात.
काश्मीरात ज्या अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले यांची हत्या झाली. त्यांच्या प्रत्यक्षदर्शी कुटुंबियांनी दहशतवादी धर्म विचारून गोळ्या घालत होते, असा अनुभव मीडियासमोर सांगितलेला आहे. त्यांना खोटे ठरवण्याचे काम ही पूजा
मोरे नावाची बाई करतेय. राजकारणासाठी लाजलज्जा, देशप्रेम सगळे विकलेले हे लोक. रॉबर्ट वॉड्रा आणि या पूजा मोरेमध्ये फरक काय? त्यांना पाकिस्तान हा शत्रू वाटत नाही, त्यांचे शत्रूत्व मोदी सरकारशी आहे.
कशी आहेत, ही बेअक्कल माणसं ज्यांना काश्मिरी मुस्लीम आणि पाकिस्तानातील मुस्लीम दहशतवादी यांच्यात फरक कळत नाही. राजकारणापायी माती काय शेण खाण्याची तयारी असलेले हे लोक देशाचे शत्रूच आहेत. देशावर
एक संकट आले असताना, पाकिस्तानकडे बोट न दाखवता, ही मोदी सरकारवर आगपाखड करण्याची सुसंधी आहे, असे मानणाऱ्या या लोकांना ओळखण्याची गरज आहे. अशा घटना घडल्यानंतर भाईचारा, गंगाजमनी तहजीबच्या नावाने
गळा काढणारे, शांतेतेसाठी मेणबत्ती मोर्चा काढणारे या सगळ्यांची एका जनता जनार्दनाने जोड्याने पूजा बांधण्याची गरज आहे. ती वेळ नक्कीच येणार आहे, जेव्हा भेटतील तिथे जनता यांना जोड्याने मारेल. मुस्लिमांची धार्मिक कट्टरता ही जगभरासाठी डोकेदुखी बनली असताना, भारतातले हे मूर्ख शिरोमणी त्यांना उपदेश करायचे सोडून मरणाऱ्या आणि मार
खाणाऱ्या हिंदूंना शहाणपण शिकवण्यात मग्न आहेत. त्यांना ना गजवा ए हिंद माहिती, ना त्यांना जिहादचा अर्थ कळत. अरे बांगलादेशातील जिहादींपासून स्वत:ची अब्रू आणि जीव वाचवून एक बाई वर्षोनुवर्षे भारतात दिवाभीताचे आय़ुष्य जगते आहे, त्या तस्लिमा नसरीनला तरी विचारा, ही जिहाद म्हणजे काय चीज आहे ती?
हीच कट्टरता देशात आणि देशाबाहेरही हिंदूंच्या मुळावर येते आहे. याच कट्टरतेमुळे बांगलादेशात हिंदूंचे शिरकाण होते आहे, पाकिस्तानातील हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्याच कट्टरतेमुळे काश्मीरात पर्यटनासाठी गेलेल्या हिंदूंच्या रक्ताने होळी खेळली जाते आहे. मुर्शीदाबादमध्ये हीच कट्टरता हिंदूंना घरदार सोडून पळायला भाग पाडते आहे.
या कट्टरतेबाबत तोंडात बोळा घालून बसायचे, एक शब्दही तोंडातून बाहेर काढायचा नाही आणि मार खाणाऱ्या हिंदूंना गंगाजमनी तहजीबचे धडे द्यायचे हे धंदे आता बंद झाले पाहिजेत. त्यांनी ते बंद केले नाहीत, तर ते बंद होतील,
याची जबाबदारी देशात जे जागृत हिंदू आहेत, त्यांनी घेतली पाहीजे. जिथे भेटतील तिथे यांचे बुरखे फाडा.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)