22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरसंपादकीयमहापूरे लव्हाळे जाती, झाडे तिथेच राहाती... भूत बंगल्यांचा पहिला बळी!

महापूरे लव्हाळे जाती, झाडे तिथेच राहाती… भूत बंगल्यांचा पहिला बळी!

मविआच्या काळात झालेल्या घोटाळ्यांवर नजर टाकली तर किरकोळ लोकांना अटक होत असून बडे मासे मात्र अजून जाळ्याबाहेरच आहे

Google News Follow

Related

कोर्लई गावातील १९ बंगल्यांच्या प्रकरणात पहिली विकेट गेली आहे. हे गाव अलिबागेतील मुरुड तालुक्यात येते. याप्रकरणी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक झाली आहे. बंगल्यांची घरपट्टी ठाकरे आणि वायकर यांच्याकडून भरली जात होती. परंतु हे बंगले अचानक गायब झाले. या प्रकरणात कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी माजी सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मविआच्या काळात झालेल्या घोटाळ्यांवर नजर टाकली तर किरकोळ लोकांना अटक होत असून बडे मासे मात्र अजून जाळ्याबाहेरच आहेत, असे सर्वसाधारण चित्र आहे.

कोर्लई येथील जमीन १९ बंगल्यांसह अन्वय नाईक या व्यावसायिकाने उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना विकली होती. माजी मुख्यमंत्री आणि माजी मंत्र्यांशी संबंधित हे प्रकरण आहे. या घरांची घरपट्टी या दोघांकडून भरलीही जात होती.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. परंतु हे प्रकरण खऱ्या अर्थाने उजेडात आणण्याचे श्रेय संजय राऊत यांचेच. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवसेना भवन येथे गाजवलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी कोर्लई येथील बंगल्यांचा विषय चव्हाट्यावर आणला होता. राज्यात तेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती.

या प्रकरणात ग्राम सेवकांच्या आणि माजी सरपंच मिसाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ग्राम सेवकांनी अटक पूर्व जामीन घेतला. परंतु मिसाळ यांना अटक झाली. मिसाळ हे या संपूर्ण घोटाळ्यातील प्यादे आहेत. खरे खेळाडू कोण हे माहीत असूनही त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. कागदपत्रात फेरफार करणाऱ्यांना अटक झाली, परंतु ज्यांनी फेरफार करवला त्यांना अजून हात लागलेला नाही.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मविआच्या काळात १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अटक झाली. त्याआधी त्यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पालांडे यांना जून २०२१ मध्ये ईडीने अटक केली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये देशमुखांना अटक झाली. एक वर्ष एक महिना ते तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांची सुटका झाली. आधी अटक होऊन पालांडे आणि शिंदे यांची सुटका मात्र देशमुखांनंतर झाली.

लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हीस या कंपनीने कोविड काळात केलेल्या घोटाळ्याप्रकरणी सुनील कदम आणि राजू साळुंके या तिघांना अटक झाली. परंतु सुजीत पाटकर मात्र अद्याप मोकाट आहे. हा पाटकर शिउबाठाचे नेते संजय राऊत यांचा कौटुंबिक मित्र आणि व्यावसायिक पार्टनर आहे. कोणताही अनुभव नसताना या बोगस कंपनीला वरळी आणि पुण्यातील कोवीड सेंटरचे काम देण्यात आले होते. हा शंभर कोटींचा घोटाळा असल्याचा ठपका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठेवला आहे.

मुंब्र्याच्या खाडीत ज्या मनसुख हिरणचा मृतदेह सापडला त्याचे प्रकरणही असेच. या प्रकरणात एपीआय सचिन वाझे, सब इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा, सुनील माने अशा आरोपींना अटक झाली परंतु त्यापुढे कोणतीही कारवाई नाही.
अनिल परब यांच्या दापोलीतील रिसोर्ट प्रकरणी उप जिल्हाधिकारी जयराम देशपांडे, परब यांचे मित्र सदानंद कदम यांना अटक झाली. मात्र अनिल परब यांच्यावर कारवाई झालेली नाही. ही सगळी प्रकरणे पाहिली तर ‘कायदा सगळ्यांना सारखा असतो’, हे वाक्य पूर्णपणे प्रचारकी आहे. प्रत्यक्षात धनदांडगे आणि सत्तेच्या सारीपाटावरील मजबूत मोहरे कायम सुरक्षित असतात. अर्थात याला काही जणांचा अपवाद निश्चितपणे आहे.

हे ही वाचा:

रुग्णालयात घालवलेला वेळ पोलीस कोठडी म्हणून ग्राह्य धरणार नाही

भारतात मुस्लिमांची स्थिती पाकिस्तानपेक्षा चांगली!

उद्धव ठाकरे बांधावर कधी जाणार? विरोधक घरी बसून असल्याबद्दल टीका

रिक्षा चालविण्यासाठी वापरला स्वयंपाकाचा गॅस

मविआच्या काळात ज्यांच्यावर आरोप झाले अशा राजकारण्यांपैकी नवाब मलिक यांचा अपवाद वगळता सर्वजण बाहेर आहेत. तिथेही मलिक यांच्या मुलाला, जावयाला हात लावण्यात आलेला नाही.

ही सगळी प्रकरणे पाहिली तर संत तुकारामांची क्षमा मागून ‘महापुरे लव्हाळी जाती, झाडे मात्र तिथेच राहाती’, असा नवा अभंग रचण्यासारखी परीस्थिती आल्याचे दिसते. कारवाईतून अलगद सुटका करून घेतलेले नेते जणू म्हणतायत.

क्या हुवा है, हुवा कुछ नही है
बात क्या है, पता कुछ नही है
मुझसे कोई खता हो गई तो
इसमें मेरी खता कुछ नही है…

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा