पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांनी जिहादचे किळसवाणे स्वरूप उघड केलेले आहे. हे स्वरुप नवे नाही, फक्त काश्मीरातील ताज्या नरसंहारामुळे ते सर्वसामान्यांनाही व्यवस्थितपणे कळलेले आहे. हा जिहाद काफीर हिंदूंविरुद्ध आहे. हिंदू समाजाचे अस्तित्व जिहादींच्या रडारवर आहे. हिंदू समाज नामशेष करणे ही या जिहादची इति कर्तव्यता आहे. या लढाईत जिहादमध्ये आपल्या बाजूने कोण आणि विरोधात कोण उभा आहे, हे हिंदूंनी लक्षात ठेवले पाहिजे. जिहादींच्या चेहऱ्यावर मुखवटे कोण चढवतोय, हिंदूंची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोण करतो आहे, हेही लक्षात ठेवले पाहीजे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची विधाने लक्षात ठेवण्याची गरज म्हणूनच आहे. अशी सगळी विधाने हिंदूंनी मनावर कोरून ठेवली पाहिजेत. हिंदूंचा गजनी झाला असेल तर ही सगळी विधाने अंगाखांद्यावर लिहून ठेवा, परंतु विसरू नका…
काश्मीरमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तूभ गनबोटे यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी शरद पवार त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीने दिलेली प्रतिक्रिया ऐका. त्या म्हणाल्या, “दहशतवादी आले, त्यांनी नमाज पढता येतो का विचारले, अल्ला हू अकबर म्हणायला सांगितले. त्यांनी जे सांगितले ते आम्ही केले तरीही दहशतवाद्यांनी बेछूट गोळ्या घालून ठार केले.’ पवारांचे काय म्हणणे आहे ते ऐका. ‘त्या भगिनींनी मला सांगितले दहशतवाद्यांनी केवळ आमच्या घरातील पुरषांनाच मारले, महिलांना हात लावला नाही.’ महिलांना जिवंत ठेवल्याबद्दल आणि त्यांच्यावर अत्याचार न केल्याबद्दल पवारांनी त्यांचे कौतूक केले नाही, हे हिंदूंचे नशीब, परंतु त्यातल्या त्यात त्यांनी हे सुचवण्याचा मात्र पुरेपुर प्रयत्न केलेला आहे. धर्म विचारून या हत्या करण्यात आल्याबाबत ते म्हणाले की, ‘याबाबत मला माहित नाही.’
पवारांबाबत असे म्हटले जाते की एकदा भेटलेल्या कार्यकर्त्याचे, व्यक्तिचे नाव ते विसरत नाही. तळ हातावरील रेषांसारखा त्यांना महाराष्ट्र ठाऊक आहे. तपशीलात ते कधी गफलत करत नाहीत. ते गफलत करता तेव्हा जेव्हा प्रश्न हिंदूंचा असतो. तेव्हा पवारांना अनेकदा दिसेनासे होते, काही विशिष्ट तपशील त्यांना ऐकूच येत नाही. अनेक गोष्टींची त्यांना माहिती नसते.
पवार फक्त दहशतवाद्यांचा कट्टरतावाद झाकत नाहीत, ते भारत सरकारला इशारा देतात की, ‘सरकार म्हणतेय की आम्ही कठोर कारवाई करू, परंतु पाकिस्तानही उत्तर देईल. युरोपला जाणारे सगळे हवाई मार्ग पाकिस्तानवरून जातात. त्यामुळे विमान कंपन्यांना प्रचंड नुकसान होईल.’ ही काँग्रेसची परंपरा आहे. देशातील अल्पसंख्यांकांना पाकिस्तानशी जोडण्याचे काम यांनी केले. पाकिस्तानला तडाखा दिला तर अल्पसंख्यांक दुखावतील असा समज यांनी कायम जपला. देशात २६/११ घडले तेव्हा पवार यूपीए सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी कागदी घोडे नाचवण्याच्या पलिकडे या सरकारने काहीच केले नाही. कारण या तेही बिनकण्याचे होते, या सरकारचे पंतप्रधानही बिनकण्याचे होते.
काँग्रेसच्या नेत्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणाला कसे देशहिताच्या वर ठेवले याचे अनेक उदाहरणे आहेत. देश बुडाला तरी चालेल, परंतु राजकारणात तसूभरही उणेपणा नको हे काँग्रेसचे धोरण होते. पाकिस्तानने लाख कुरापती करून काँग्रेसने कधी त्यांना भीमटोला दिला नाही, त्याचे कारण फक्त त्यांचा बोटचेपेपणा नव्हता तर त्या मागे नीच राजकारणही होते. शिसारी यावी असे हे राजकारण आहे. अशा गोष्टी फार लपत नाहीत.
अमेरीकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ‘अ प्रामिस्ड लँड’ या आत्मचरीत्रात असे स्पष्ट सांगितले आहे. डॉ. मनमोहन सिंह यांना मी २६/११ च्या हल्ल्यानंतर लष्करी कारवाईबाबत विचारले तेव्हा त्यांचे मत होते, ‘मुंबई हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली, तर देशात हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण होईल आणि त्याचा फायदा भाजपाला होईल.’ ओबामा यांच्या शब्दात सांगायचे झाले तर… In private, Singh feared that rising anti-Muslim sentiment fed by attack could boost the influence of India’s more militant Hindu nationalist movement, the BJP
एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. ओबामा आणि मनमोहन सिंग यांचे घट्ट संबंध होते. स्वत: ओबामांनी हे सांगितले आहे. त्यामुळे ते असत्य किंवा अतिरंजित असण्याची सुतराम शक्यता नाही. भाजपाला फायदा होऊ नये, म्हणून काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने पाकिस्तानचा वचपा काढला नाही. ते सापाला दूध पाजत राहीले. तो साप वांरवार भारताला डसत राहीला. ही काँग्रेसची मानसिकता आहे. पवार त्याच मानसिकतेचे नेते आहेत. त्यामुळे मोदी जर पाकिस्तानवर आक्रमण करण्याची तयारी करत असतील तर पाकिस्तानचे काय होईल याच्या पेक्षा भाजपाला त्याचा फायदा होईल ही भीती त्यांना जास्त असावी. त्यामुळे पाकिस्तानचे पेकाट मोडण्याचा मार्गात जेवढे काटे पसरता येतील तेवढे पसरण्याचे काम पवार करतील यात कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही. सुदैवाने देशाची सूत्र नरेंद्र मोदी यांच्याकडे आहेत. मोदी यांना ओळखून आहेत. पवारांना ते गुरू म्हणतात ते उगाच नाही.
देशाचा जीवनरस शोषून काँग्रेस नावाची वाळवी आपले अस्तित्व टीकवून आहे. देशाच्या मुळावर येईल अशा प्रत्येक गोष्टीला बळ देण्याचे काम या वाळवीने केलेले आहे. पवारांचा पक्ष या वाळवीची एक वेगळी प्रजाती आहे, एवढेच. पवार म्हणाले की धर्म विचारून हत्या केल्याबद्दल मला माहित नाही, लगेच प्रकृतीच्या कारणासाठी जामीनावर बाहेर असलेले त्यांच्या पक्षाचे नेते अनिल देशमुख म्हणाले, धर्म विचारून मारल्याबद्दल पुरावे समोर आलेले नाहीत. हे हिंदू समाजाचाचे शत्रू आहेत. हिंदूंनी यांना ओळखण्याची गरज आहे.
हे ही वाचा..
संरक्षण मोहिमा, सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण दाखवू नका!
निरपराध हिंदुच्या सत्यनिष्ठेची कहाणी सांगणाऱ्या ‘दाभोळकरहत्या आणि मी’ पुस्तकाचे प्रकाशन
लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठी चांगली झोप घ्या, जंक फूड टाळा
कैलाश मानसरोवर यात्रेचे जून ते ऑगस्ट दरम्यान आयोजन
लोकांना आठवत असेल एकाद्या पत्रकार परीषदेत पवारांना एखादा वाकडा प्रश्न विचारला तरी पवार खवळतात. त्या पत्रकाराला अद्वातद्वा बोलतात. त्याला पुन्हा पत्रकार परीषदेत बोलावू नका, असे जाहीरपणे त्यांच्या माणसांना सांगतात. परंतु जिथे धर्माच्या नावाखाली हिंदूंना गोळ्या घालून ठार केले तरी पवार थंड प्रतिक्रीया देतात. कारण हे असे नेते आहेत, ज्यांची उडी मी आणि माझे याच्या पलिकडे कधी जात नाही. जाणार नाही.
हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्याचा पवारांचा इतिहास जुना आहे. मुस्लीमांवर जनतेचा रोष होऊ नये म्हणून १९९३ साली १३ वा बॉम्बस्फोट मुस्लीम वस्तीत झाला, अशी थाप मारणारे शरद पवारच होते. इशरत जहॉसाठी अश्रू ढाळणारे, १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेणाऱ्या माजीद मेमनला राज्यसभा देणारेही पवारच होते. ज्यांना ज्यांना भान आहे की आपण हिंदू आहोत, त्यांनी हिंदूंच्या विरोधात राजकारण करणाऱ्या नेत्यांबाबत एकच धोरण ठेवले पाहीजे, ना भूलेंगे ना माफ करेंगे. यांचे शंभर अपराध भरलेले आहे. त्यामुळे यांचा राजकीय कडेलोट करण्याची वेळ आलेली आहे. तसा हिंदू समाजाने तो टप्प्या टप्प्याने केलेलाच आहे. परंतु आता तर यांचे राजकीय अस्तित्व औषधालाही शिल्लक राहू नये याची जबाबदारी तुमची आमची आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)