महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असताना माफीवीर गिरीश कुबेर एकाच वेळी गांधीजींच्या तीन माकडांच्या भूमिकेत वावरत आहेत. महाराष्ट्रात सुरू असलेला ठाकरे सरकारचा खेळखंडोबा त्यांना दिसत नाही, ऐकू येत नाही, त्यावर काही बोलवतही नाही.
एपीआय सचिन वाझे याच्या ‘कर्म–कांडा’वरून राज्याचे राजकारण प्रचंड तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात लालू प्रसाद यांच्या कारकीर्दीतील बिहारच्या दिशेने राज्याचा प्रवास सुरू आहे. परंतु मोदीविरोधाचा मोतीबिंदू झालेल्या कुबेरांना राज्यातले अराजक दिसेल कसे? वाझे प्रकरणात बोलावे तर ‘मोदीविरोधा’चा धर्म संकटात, न बोलावे तर लोक तोंडात शेण घालतील अशी भीती, या द्वीधा मनस्थितीत त्यांना आजचा अग्रलेख खरडावा लागला. ‘वाझे तुझे-माझे…’ या अग्रलेखाच्या शीर्षकावरून शेंबड्या पोराच्याही लक्षात येईल की वाझे प्रकरणात शिवसेनेने शेण खाल्ले असले तरी भाजपावाले काही कमी नाहीत, असा अग्रलेखाचा सूर असणार. सूर अगदी तसाच आहे. मोदीद्वेषापोटी बुद्धी एकदा गहाण ठेवली तर कसे बिनडोक तर्क सुचू शकतात याचे हा अग्रलेख म्हणजे उत्तम उदाहरण.
हे ही वाचा:
अमृता फडणविस यांनी केले ठाकरे सरकारला लक्ष्य
शरद पवारांचे काँग्रेसला थेट आव्हान, तरीही आघाडीत सर्वकाही आलबेल?
तुम्ही गृहमंत्री होणार का? या प्रश्नावर काय म्हणाले जयंत पाटील?
‘चकमक फेम वाझेंना संधी देऊन शिवसेनेने चूक केली, परंतु भाजपानेही अशा चकमक फेम अधिका-याला पक्षात घेतले. मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त सत्यपाल सिंह, माजी लष्करी अधिकारी व्ही.के.सिंह आदी हौशागवशांना भाजपाने पक्षात घेतले. ही नैतिकता कोणती?’, असा सवाल कुबेरांनी केला आहे.
खरे तर कुबेरांच्या तोंडी नैतिकता हा शब्दच शोभत नाही. नोकरी वाचवण्यासाठी अग्रलेख मागे घेणाऱ्या , दुसऱ्याच्या लिखाणाची चोरी करून स्वत:च्या नावावर खपवणाऱ्या माणसाने नैतिकतेबाबत बोलणे म्हणजे शशी थरूर यांनी ब्रह्मचर्यावर बोलण्यासारखे आहे. निबर कातडीचा शिक्का एकेकाळी फक्त राजकारण्यांवर होता. आता कुबेरांसारख्या संपादकांमुळे तो पत्रकारांच्या वाट्यालाही आलाय. त्यांचे अग्रलेख म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वैचारीक भामटेगिरी असते. ताजा अग्रलेख ही या भामटेगिरीत नव्याने घातलेली भर.
व्ही.के.सिंह आणि सत्यपाल सिंह यांनी भाजपात प्रवेश करणे आणि वाझेंनी शिवसेनेत यात फरक न कळणाऱ्याला भामटा नाही तर काय म्हणावे? गृहयुद्धाच्या छायेत असलेल्या येमेनमध्ये जाऊन हजारो भारतीयांना स्वदेशात आणण्याचे काम व्ही.के.सिंह यांनी केले. बाँब वर्षावाच्या छायेत असलेल्या आणि संपूर्ण रणभूमी बनलेल्या येमेनमध्ये रस्त्या रस्त्यावर फिरून भारतीयांना परत आणण्याचे काम एसी केबिनमध्ये बसून अग्रलेख पाडण्या इतके सोपे नक्कीच नाही. यासाठी वाघाचे काळीज लागते. देशाचे परराष्ट्र राजमंत्री म्हणून व्ही.के.सिंह यांचे काम उजवे आहे. खंडणीच्या आशेने मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्याचे कर्तुत्व दाखवणाऱ्या वाझेंशी त्यांची बरोबरी कशी होऊ शकते?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी असताना शिवसेनेचा दबाव झुगारून त्यांनी वाझेंचे पुनर्वसन करण्याचे नाकारले, याचे कौतूक न करता ‘तेव्हा त्यांनी आवाज का उठवला नाही’ असा थुकरट प्रश्न कुबेरांना पडू शकतो. कानाखाली आवाज काढल्यानंतर वेगळा आवाज उठवण्याची गरज नसते, हे कुबेरांना कळू नये?
अवघा अग्रलेख भाजपावर खर्ची घालताना त्यात वाझे प्रकरणातले वादग्रस्त ठरलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस आय़ुक्त परमबीर सिंह यांचा उल्लेखही होऊ नये इतकी कुबेरांची पत्रकारीता निर्भीड आहे.
हे ही वाचा:
बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन
एका कनिष्ठ दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यावरून इतका गदारोळ का? हा कुबेरांना पडलेला प्रश्न बाळबोध की निलाजरा? कि वाचकांना मूर्खात काढणारा?
एखाद्या गुन्ह्यातला आरोपी किती लहान किती मोठा, यावरून गुन्ह्याचे गांभीर्य ठरत नसून गुन्हा किती घृणास्पद आहे त्यावरून ठरते. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातले आरोपी वरीष्ठ अधिकारी, अतिश्रीमंत किंवा वलयांकीत नव्हते, परंतु त्यांनी केलेले पाप इतके मोठे होते की देशभरात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली. वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी असले तरी त्यांनी पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर करून देशातील प्रमुख उद्योगपतीला धमकावण्याचा प्लॉट रचला, याप्रकरणात एका निर्दोष व्यक्तिचा बळीही गेला. महाराष्ट्रात याप्रकरणामुळे खळबळ उडाली. सर्वसामान्य जनतेच्या मनात राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले.
एपीआय दर्जाच्या एका अधिकाऱ्याने इतके धाडस कसे केले? त्याचा करविता धनी कोण? खंडणीचा आरोप असलेल्या अशा अधिका-याला पोलिस दलात कसे घेतले? निकष बदलून क्राईम इंटेलिजन्स युनिटसारख्या महत्वाच्या विभागाचे प्रमुखपद कोणाच्या आदेशाने मिळाले? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहे.
या प्रश्नांबाबत स्वाभाविकपणे उलटसुलट चर्चाही होते आहे. थोडी नैतिकता, थोडी विवेक बुद्धी शिल्लक असलेल्या कोणालाही हे प्रश्न पडू शकतात. परंतु कुबेरांना या प्रश्नाची चर्चा होणे हे राजकारण्यांचे अध:पतन दिसते. खरे तर हे राजकारण्यांचे अध:पतन नसून गेल्या काही वर्षात झालेले कुबेरांचे अध:पतन आहे. अग्रलेख मागे घेऊन त्यांनी निर्भीड आणि तटस्थ पत्रकारीता आटोपल्याचे जाहीर केले होते. परंतु तरीही जनतेला नैतिकतेचे डोस देण्याची खुमखुमी संपत नाही. स्वत:च्या कमरेवर लंगोटी शिल्लक नसताना दुस-याला नैतिकचे धडे देण्यासाठी कुबेर व्हावे लागते. कुबेर हा कोडगेपणाला समानार्थी शब्द बनला आहे.