राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत फक्त एकदा होते. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान पदासाठी ज्या संभाव्य नावांची चर्चा होती त्यात एक नाव पवारांचे होते. परंतु तेव्हा पंतप्रधान पदाची माळ गळ्यात पडली काँग्रेसमधील चाणक्य पी व्ही नरसिंह राव यांच्या गळ्यात. त्यानंतर पवार आणि त्यांचे समर्थक फक्त मनातल्या मनात पंतप्रधान पदाचे मांडे खातायत. परंतु आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनंतर २०२४ मध्ये पुन्हा भाजपाची सत्ता येईल असे चित्र आहे. विरोधक आता २०२९ ची तयारी करा अशी भाषा बोलतायत. त्यामुळे वस्तू स्थितीची जाणीव झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ते किमान यूपीएचे अध्यक्ष बनावेत असा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु तेथेही त्यांची डाळ गळण्याची शक्यता कमी.