28 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरसंपादकीयउद्धव ठाकरे यांच्या लंडनमधील प्रॉपर्टीवर शिक्कामोर्तब

उद्धव ठाकरे यांच्या लंडनमधील प्रॉपर्टीवर शिक्कामोर्तब

ऋषी सुनक यांच्याशी झालेल्या काल्पनिक संवादातून शिंदे यांनी ठाकरेंना बरंच काही सांगितलेले आहे.

Google News Follow

Related

काही लोकांना अपमान करून घेण्याची हौस असते. सध्या उद्धव ठाकरे यात आघाडीवर आहेत. जळगावच्या सभेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अद्वातद्वा बोलले. त्यानंतर सत्ताधारी नेते यांचा करेक्ट कार्यक्रम करणार हे अपेक्षित होते. एकनाथ शिंदे यांनी पहिला सिक्सर मारला आहे. शिंदेंच्या टोलेबाजीमुळे अनेकांना शोले सिनेमातला डायलॉग आठवला… गब्बरसिंग तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे.

 

 

ठाकरेंच्या जळगावच्या सभे आधी जी-२० परीषदेत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती. त्या भेटीवरून ठाकरे यांनी शिंदेंची खिल्ली उडवली. ‘एकनाथ शिंदे यांनी ऋषी सुनक यांच्यासोबत फोटो काढले. पण काय बोलले त्यांना कोणत्या भाषेत बोलले तेही सांगा… सुनक तुम्हाला काय बोलले कळलं का?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता.

 

 

एकनाथ शिंदे कधी काळी आपले आदेश झेलत होते. ते आपल्याला बाजूला करून मुख्यमंत्री झाले, ही बाब उद्धव ठाकरे यांच्या डोक्यातून जातच नाही. आतून ते प्रचंड धगधगतायत. पण करणार काय? शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नावाने बोटं मोडण्या पलिकडे ठाकरे काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे जमवलेल्या गर्दीसमोर त्यांचा अपमान करणे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करणे एवढाच एक कलमी कार्यक्रम ते राबवतायत.

 

 

 

ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सुरूवातीला एकनाथ शिंदे फार उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नसत. परंतु पाणी डोक्यावरून गेल्यानंतर मात्र त्यांनीही भडीमार सुरू केला. विधानसभेत केलेल्या भाषणात त्यांनी ठाकरेंचा ‘हिऱ्या पोटी गारगोटी’, असा उल्लेख केला होता. त्यानंतर तरी ठाकरेंच्या लक्षात आले पाहिजे होते की, हा माणूस काय ऐकण्यातला राहिलेला नाही. आपण जे काही बोलू त्यापेक्षा जास्त तिखट ऐकावं लागेल. परंतु ठाकरेंना भडास काढल्याशिवाय करमत नव्हते. म्हणून आता शिंदेंनी त्यांचे कपडे उतरवायला सुरूवात केली आहे.

 

 

ऋषी सुनक काय बोलले ते समजलं का? याचे एकनाथ शिंदे यांनी दिलेले उत्तर भन्नाट आहे. सरकार आपल्या दारी या कार्यक्रमात शिंदेंनी जाहीरपणे ही टोलेबाजी केलेली आहे. ‘हाऊ ईज यूटी? मी म्हणालो व्हाय? तर सुनक म्हणाले, ते दरवर्षी लंडनला येतात. प्रॉपर्टी बनवतात, थंडगार हवा खातात… लंडनला आलात तर सर्व सांगतो.’

 

ऋषी सुनक यांच्याशी झालेल्या काल्पनिक संवादातून शिंदे यांनी ठाकरेंना बरंच काही सांगितलेले आहे. देवाने तोंड प्रत्येकाला दिले आहे. त्याचा चांगला वाईट वापर प्रत्येकजण करू शकतो. ठाकरे काही बोलले तर त्याला त्याच भाषेत उत्तर तर मिळेलच, शिवाय तुमचे कपडेही उतरवले जातील, याची झलक शिंदे यांनी दिलेली आहे. ठाकरेंच्या मालमत्तेचा तपशील काढणे मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तिसाठी फार मोठी गोष्ट नाही. ‘ठाकरेंबाबत योग्य वेळ आल्यावर बोलेन’, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिलेला आहे. ऋषी सुनक यांच्याशी झालेल्या काल्पनिक संवादातून ठाकरेंना त्याची झलक दाखवली आहे.

 

 

कधी काळी ठाकरेंच्या छत्रछायेत राहिलेले राहुल शेवाळे आणि यशवंत जाधव हे दोन स्थायी समिती अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या छावणीत दाखल झालेले आहेत. स्थायी समितीच्या माध्यमातून कोणाला किती खोके गेले याच हिशोब या दोघांकडे निश्चितपणे आहेच. शिवाय लंडन, दुबई, सिंगापूरमध्ये कोणाच्या किती मालमत्ता आहेत, त्याचा तपशीलही आहे. यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाचा जो छापा पडलेला त्यात सापडलेल्या डायरीत मातोश्रीला पोहचवल्याचा प्रसादाचा उल्लेख होता. त्यानंतर माध्यमांकडे फार बातम्या आल्या नाहीत परंतु तो सगळा दारुगोळा आयकर खात्याकडे मात्र जमा आहे.

 

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटार उत्पादकांना दिला हा सल्ला

स्पाइसजेटच्या प्रमुखांना सुनावले; आधी भरपाई द्या, तुमच्या मरणाची आम्हाला चिंता नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटार उत्पादकांना दिला हा सल्ला

हसवणारे ‘बिरबल’ काळाच्या पडद्याआड

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांची चौकशी सुद्धा झाली. खिचडी भ्रष्टाचार प्रकरण असो, कोविड सेंटरमधला घपला असो वा बॉडीबॅगचा घोटाळा सगळ्याचे केंद्र एकच आहे. मुंबई उच्च न्यायालयात ठाकरेंच्या मालमत्ता प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली गेली कारण गौरी भिडे यांनी याचिका दाखल करण्यापूर्वी तयारी केलेली नव्हती. परंतु कोणताही कामधंदा न करता मुंबईतील मोक्याच्या भागात आठ मजली मातोश्री-२ कोणत्या पैशातून उभी राहिली हा प्रश्न मात्र अद्यापि अनुत्तरीत आहे.

 

विनोदी शैलीत का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या लंडनमधील प्रॉपर्टीचा उल्लेख करून त्यांनी इशारा दिलेला आहे. तोंड आवरा नाही तर कलानगर ते लंडन व्हाया सिंगापूर सगळेच वस्त्रहरण होईल. शिंदे यांनी त्यांच्यावर झालेल्या टिकेचे उत्तर दिले, परंतु देवेंद्र फडणवीस मात्र या टिकेनंतरही शांत आहेत. ही शांतता ठाकरेंसाठी जास्त घातक आहे. फडणवीस कसा करेक्ट कार्यक्रम करतात हे नवाब मलिक प्रकरणातून समोर आलेलेच आहे. एके काळी संजय राऊत यांच्यासारखे दररोज बोलणारे नवाब मलिक सध्या तोंड आवळून गप्प बसले आहेत. गंधकाच्या ढिगाऱ्यावर बसून आतषबाजी करण्याचा मोह उद्धव ठाकरे यांनी आवरायला हवा. कांच के घर मे रहेनेवाले, दुसरो पर पत्थर नही फेकते.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा