27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरसंपादकीयईडीची कारवाई, कही पे निगाहे कही पे निशाना ?

ईडीची कारवाई, कही पे निगाहे कही पे निशाना ?

सुजीत पाटकर या सूत्रधाराचा चेला असल्यामुळे त्याच्या घरी ईडीला दोन्ही घोटाळ्यांचे धागेदोरे मिळाले.

Google News Follow

Related

कोविड महामारीच्या काळातील आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात ईडीने काल मुंबईत छापेमारी केली. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हीसेसचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या निवासस्थानीही धाडीची कारवाई झाली. महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी ऐन कोविडच्या काळात ही कंपनी कुत्र्याच्या छत्रीसारखी अचानक उगवली होती. या कंपनीशी संबंधित दोघांना यापूर्वी अटक झाली असताना या कंपनीचे कर्ताधर्ता असलेला सुजीत पाटकर अजून बाहेर कसा? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. एक शंकाही आहे, ही कारवाई म्हणजे मूळ लक्ष्याकडे लोकांचे लक्ष जाऊ नयेम्हणून केलेली धूळफेक तर नाही ना?

 

पत्राचाळ घोटाळ्याचा तपास करता करता योगायोगाने लाईफ लाईनच्या कोविड घोटाळ्याचे दुवे ईडीच्या हाती लागले. कारण पत्राचाळ आणि लाईफ लाईन घोटाळ्याचा सूत्रधार एकच आहे. सुजीत पाटकर या सूत्रधाराचा चेला असल्यामुळे त्याच्या घरी ईडीला दोन्ही घोटाळ्यांचे धागेदोरे मिळाले. ईडीने फेब्रुबारी २०२२ मध्ये पत्राचाळ घोटाळ्याशी संबंधित असलेल्या लोकांवर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर धाडी टाकल्या होत्या तेव्हाच सुजीत पाटकर याच्या निवासस्थानी छापेमारी झाली होती. यात ईडी अधिकाऱ्यांच्या हाती महत्वाची कागदपत्रे लागली. महापालिकेसोबत फिल्ड हॉस्पिटलबाबत लाईफ लाईनसोबत झालेल्या कंत्राटाची प्रत ईडीला मिळाली. आणखी एक महत्वाचे कागदपत्र हाती आले.

 

या कागदपत्रावरून लाईफ लाईन आणि पालिकेमध्ये कंत्राट होण्यापूर्वीच ३२ कोटी रुपये लाईफ लाईनच्या खात्यात जमा झाले असल्याचे स्पष्ट झाले. लाईफ लाईनचे भले करण्यात पालिकेला किती रस होता, ही बाब उघड करण्यासाठी हा फक्त एकच व्यवहार पुरेसा आहे. पालिकेतील एखादा महत्वाचा उच्चपदस्थ अधिकारी लाईफ लाईनचा हस्तक असल्याशिवाय हा व्यवहार अशक्य होता. राजकीय दबाव आणि वशीलेबाजीतून लाईफ लाईनला काम मिळाले हे खरे असले तरी पालिकेच्या त्या अधिकाऱ्याने या गैरव्यवहारात लाईफ लाईनला पुरेपूर साथ दिली हे स्पष्टच आहे. ईडीने कालच्या छापेमारीत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, खरेदी विभागात काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर छापेमारी केलेली आहे. त्यातून या व्यवहारावर प्रकाश पडेल अशी अपेक्षा आहे. त्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा मुहूर्त लवकर निघायला हवा.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये धावत्या गाडीत झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जखमी

‘मातोश्री’जवळील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर

आदिपुरुषची घसरण थांबता थांबेना!

पॅरिसमधील इमारतीत झालेल्या स्फोटात २४ जण जखमी

 

लाईफ लाईन हॉस्पिटलविरुद्ध आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणात सुनील कदम आणि राजीव साळुंखे या दोघांना अटक करण्यात आली आहे. परंतु हे दोघेही नामधारी आहेत. या संपूर्ण प्रकरणातला खरा आरोपी हा सुजीत पाटकरच आहे. कारण त्याचे आणि राऊतांचे लागेबांधे नसते तर लाईफ लाईनसारख्या दीडदमडीच्या बोगस फर्मला कोट्यवधीची कामे मिळालीच नसती. कोविडच्या काळात रुग्णांची प्रचंड ससेहोलपट झाल्यानंतर आणि तिघांचे बळी गेल्यानंतर राज्य सरकार आणि महापालिकेने त्यांचे पाप झाकण्याचा प्रय़त्न केला नसता.

 

लाईफ लाईनची स्थापना जून २०२० मध्ये करण्यात आली. कोणताही अनुभव नाही, महापालिकेकडे नोंदणी नाही, तरीही बोगस कागदपत्रांच्या आधारे या फर्मला कोट्यवधीची कामे मिळत गेली. कारण एकच सुजीत पाटकर यांचे संजय राऊत यांच्याशी असलेले व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध. लाईफ लाईन अस्तित्वात आल्यानंतर एका महिन्यात त्यांना फिल्ड हॉस्पिटलचे कंत्राट मिळाले. पुढच्या दोन महिन्यात पुण्यात कोविड सेंटरचे कंत्राट. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला. फर्म ब्लॅकलिस्ट झाली. तरीही तगडा वशीला असल्यामुळे त्यांना मुंबईत कोविड सेंटरचे काम मिळाले.
लाईफ लाईन या फर्मशी संबंधित ईडी आणि पोलिसांच्या हाती तगडे पुरावे आहेत. खरं तर हे पुरावे १५ महिन्यांपूर्वीच ईडीच्या हाती लागले होते. ईडी या प्रकरणात लक्ष घालते आहे, ही बाब एकदा स्पष्ट झाल्यानंतर कोण कशाला या घोटाळ्याशी संबंधित पुरावे, कागदपत्रे किंवा रक्कम घरी ठेवणार? जे पुरावे नष्ट करणे शक्य आहे, ते पुरावे आधीच नष्ट करण्यात आलेले असणार. या लोकांकडून ईडीला माहिती हवी असेल तर त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावण्याचा पर्याय होताच. त्यामुळे ईडीने टाकलेल्या धाडींचे औचित्य काय, याची उकल होत नाही.

 

ईडीने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तिय असलेल्या सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील घरावरही छापेमारी केलेली आहे. कारवाई जर कोविड घोटाळ्याशी संबंधित आहे, तर मग चव्हाण यांच्या घरी छापेमारी का करण्यात आली असावी?
कि चव्हाण हेच या प्रकरणातले मुख्य टार्गेट होते, फक्त त्यांच्यावर कारवाई केली ईडीचा इरादा उघड होईल म्हणून आणखी काही लोकांवर कारवाई होते आहे, असे भासवण्यात आले.

 

लाईफ लाईन घोटाळ्यात ईडीकडे कागदोपत्री बरेच पुरावे आहेत. त्यात आर्थिक व्यवहारांच्या नोंदी आहेत. पालिकेकडे सादर करण्यात आलेली बोगस कागदपत्रे आहेत. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यासाठी ईडीला आणखी धाडी घालण्याची गरज आहे, असे वाटत नाही. ज्या आधारावर सुनील कदम आणि राजू सोळंकी यांना अटक झाली, त्याच आधारावर सुजीत पाटकरला अटक होऊ शकते. परंतु ही अटक होत नाही आहे, याची अनेक कारणे असू शकतात. मारना कम और घसीटना ज्यादा, ही बहुधा ईडीची शैली असावी. किंवा ईडीचे अधिकारी सुजीत पाटकरला अटक करण्यासाठी एखाद्या शुभ मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असावेत. किंवा ईडीचे टार्गेट तूर्तास सुजीत पाटकर नसून दुसरेच कोणी तरी असावे. त्यामुळे दिशाभूल करण्यासाठी ईडीचे लोक नुसतीच हाळी देत असावेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा