फडणवीसांनी उलघडली कालचक्राची गती !

फडणवीसांनी उलघडली कालचक्राची गती !

लोकसभा निवडुका जशाजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आणि मतदारसंघ जर कोणता असेल तर तो एकमेव बारामती मतदारसंघ आहे. कारण तिथे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. काल एका खासगी वृत्ताविहीनीला दिलेल्या मुलाखातीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले ते खरच आहे. कालचक्र हा विषय हल्ली दुर्लक्षित होत आहे. मग ते क्षेत्र कोणतेही असो.

राजकारणात आजच्या स्थितीमध्ये कालचक्राने उत्तर दिल आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना जर झाला तर त्यात आश्चर्य ते काय? हे कधी ना कधी तरी होणारच होतं. त्याला या निवडणुकीचा मुहूर्त मिळतोय इतकच. घराण्यांमध्ये वाद आणि त्यातून राजकीय संघर्ष हा महाराष्ट्राला नवा नाही. या पूर्वीसुद्धा असे अनेक सामने या राजकीय आखाड्यात महाराष्ट्राने बघितलेले आहेत. त्यामुळे पवार विरुद्ध पवार असा सामना झाला तर त्यात रंगतच येणार आहे आणि ग्राउंड लेव्हलला नेमकी कोणाची ताकद आहे, लोकांच्यात कोण आहे, लोकांच्या अडीअडचणीला कोण उपयोगी पडते, कोण लोकांना वेळ देते हेच या निवडणुकीत दिसणार आहे. तसं आज बारामतीमध्येच नमो महारोजगार मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही राजकारणी कसे कंत्राटी असतो, दर पाच वर्षाने कसे कंत्राट रीन्यू करावे परफॉरमन्स दाखवावा लागतो हे सांगितलं आहेच. त्यामुळे बारामतीची निवणूक ही परफॉरमन्सवर होणार हे निश्चित आहे.

राज्याच्या राजकारणात खंजीर हा शब्द कसा रूढ झाला? कोणामुळे झाला? त्याला काय राजकीय परिस्थिती कारणीभूत होती, हे सर्वांना माहित आहे. म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार जेव्हा खूप कमी वयात राज्याचे मुख्यमंत्री झाले तो काळ त्यासाठी आठवावा लागेल. राज्यातील वसंतदादा पाटील याचं सरकार गेल आणि शरद पवार याचं सरकार आल तो हा काळ. तेव्हापासून खंजीर नावाचा शब्द खऱ्या अर्थाने राजकीय वर्तुळात रूढ झाला. त्यामुळे आज जे पक्ष प्रवेशाचे सोहळे होत आहेत, धक्के बसत आहेत किंवा भविष्यात अजून धक्के बसणार आहेत ते काही विशेष आहे, वेगळे आहे असे अजिबात नाही. आपलं अस्तित्व राहणार नाही अशा पक्षात राहून नशीब अजमवायचे दिवस कधीच संपले आहेत. आणि जे लोक राजकारणात आपलं बस्तान बसवून आहेत ते तर वाऱ्याची दिशा लगेच ओळखत असतात. त्यामुळ बुडत्या जहाजाचे कप्तान कोण होणार? इतकं हे साधं आणि सोपं गणित आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राजकीय कारकीर्द लांबलचक आहे. इतक्या वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी खूप राजकीय प्रयोग केले. काही करून सत्तेत कस बसायचं, हे त्यांची करू जाण. त्याच अगदी ताज उदाहरण म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडनुकीनंतर तयार झालेली महाविकास आघाडी. कसलाही वैचारिक संबंध नाही, कधीच एकत्र काम केले नाही, आपल्या राजकीय कारकिर्दीत नेहमी ज्यांच्या विरोधात शड्डू ठोकला त्याच शिवसेनेबरोबर पवार यांनी युती केली. सोबत काँग्रेसला सुद्धा ओढूनताणून घेतल आणि राज्यात सत्ता आणली. त्यापूर्वी २०१४ च्या विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा सत्ता येत नाही आणि भारतीय जनता पक्षाला अधिकच्या जागा मिळतात म्हटल्यावर संपूर्ण निकाल लागायच्या आधीच बाहेरून पाठींबा याच पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. तो कशासाठी तर राज्यात स्थिर सरकार हवे म्हणून. म्हणजे काय तर कुणीकडून आपली डाळ शिजली पाहिजे. सत्तेचा सोपान एनकेन प्रकारे गाठता आला पाहिजे हाच उद्देश होता ना? का आणखी काय होतं. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन रचना करून काँग्रेसच्या नेतृत्वाला धु धु धुतले आणि पुन्हा राज्यात काय तर आघाडी सरकार आणि महत्त्वाची खाती पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात.

त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना पवारंनी आपल्या पक्षात घेतले. २०१९ च्या निवडणुकीत मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना झालाच होता. मुंडे हे घराणंसुद्धा तितकंच महत्वाच आहे त्यात गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांना राज्याच्या राजकारणात जेरीस आणले होते. बहुजन समाजाचे नेतृत्व असल्याने ओबीसी आणि इतर समाज हा गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाकडे आकृष्ठ झाला होता. त्यामुळे मुंडेचा राजकीय काटा या निमित्ताने काढण्याची संधी शरद पवार यांनी सोडली नाही.

हे ही वाचा:

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, लश्कर-ए-तोयबाचा गुप्तचर प्रमुख चीमा याचा पाकिस्तानात मृत्यू!

देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दररोज ३,५१६ कोटींची भर

युवराज सिंग नव्हे; जया प्रदा, अक्षय कुमार, सेहवाग यांच्या उमेदवारीसाठी भाजप प्रयत्नशील!

‘या चित्रपटामुळे कोणी नाराज झाल्याचे मला तरी दिसलेले नाही’

बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात निवडून आणले. हे राजकारण महाराष्ट्रात घडलेले आहे. घराण्यांमध्ये सुरुंग लावण्याचे आणि त्यातून राजकीय फायदा उठवण्याचे काम यापूर्वी सुद्धा झाले आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली तर त्यात वेगळे असं काहीच नाही. फक्त इतकी वर्षे इतर राजकीय पक्ष आणि राजकीय नेते यांच्या घराण्याबद्द्ल चर्चा होत होती आज पवार यांच्याबद्दल होत आहे. कारण इतकी वर्ष बारामती मतदारसंघ हा अभेद्य असा पवार यांचा गड होता. आता अजित पवार यांच्या रुपानं तिथे सवतासुभा मांडला गेला आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव महायुती मधून निश्चित मानले जात आहे. त्यांनी गावभेटी, कार्यकर्ते भेटी सुरु सुद्धा केल्या आहेत. त्यांना राजकारणाचा अनुभव नाही असं नाही फक्त त्या कधी माध्यमामध्ये कधी फारशा दिसत नव्हत्या. पण त्यांचे काम ग्राउंडवर सुरु होते. त्यामुळे त्यांचा संपर्क चांगला आहे. एकूण काय तर देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितले ते हे कालचक्र आहे. त्यामुळ बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार ही काही आश्चर्यकारक बाब आहे अस नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे तो ईश्वर… इतकंच आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version