काँग्रेसला गांधी-नेहरु खानदान देशापेक्षा मोठे आहे. अनेकदा आपल्या उक्ती-कृतीतून काँग्रेस नेते हे दाखवत असतात. चांद्रयान-३ च्या यशामुळे काँग्रेस नेते बावचळले आहेत. एका बाजूला या मोहीमेचे श्रेय त्यांना हवे आहे, दुसऱ्या बाजूला त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुखही घ्यायचे आहे. त्यातूनच काँग्रेसचे मोडीत काढण्यात आलेले नेते राशीद आल्वी यांनी शिवशक्तीचा अपमान केला आहे.
विक्रम लँडर जिथे उतरले त्या जागेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती पॉईंट असे नामकरण करणे काँग्रेसला रुचले नाही. शिव आणि शक्ती ही हिंदूंच्या आस्थेची दोन प्रमुख केंद्र आहेत. त्यामुळे काँग्रेसचा पोटशुळ जबरदस्त बळावला आहे. रशीद अल्वी यांच्या पोटात तर मुरडा उठला आहे.
हे ही वाचा:
‘सुवर्ण’ कामगिरी नंतर नीरज चोप्राच्या ‘त्या’ कृतीने जिंकली मने!
रिलायन्सच्या बोर्डात आता इशा, आकाश, अनंत अंबानी
पारुल चौधरी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र
वॅगनरचे प्रमुख प्रीगोझिन यांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब
लॅंडींग पॉईंटचे नामकरण शिवशक्ती पॉईंट ठेवल्यामुळे जग आपल्यावर हसेल. आपण चंद्रावर उतरलो ही चांगली बाब असली तरी चंद्र आपल्या मालकीचा नाही, त्यामुळे असे नामकरण योग्य नाही, असा दावा अल्वी यांनी केला आहे. एवढे बोलून अल्वी थांबले असते तरी ठिक होते. अल्वी द्वेषापोटी बोलत असले तरी ते शुद्धीत आहेत, असे म्हणता आले असते. परंतु चांद्रयान-१ च्या यशानंतर लँडीग पॉईंटचे जवाहर असे नामकरण करणे त्यांनी योग्य ठरवले.
हे नामकरण यूपीएच्या काळात काँग्रेसच्या पंतप्रधानांनी केल्यामुळे असेल बहुधा. या नामकरणाचा हिंदुंच्या आस्थेशी संबंध नसल्यामुळे अल्वी यांना पोट दुखी होण्याते कारण नसावे. शिवाय गांधी नेहरु घरण्याची चाटूकारीता केल्याचे समाधानही त्यात आहे. हे नामकरण योग्यच होते, कारण जवाहरलाल नेहरुंची कोणासोबत तुलनात होऊ शकत नाही.
आल्वी गांजा पिऊन आले होते असे म्हणायला वाव याच मुळे आहे. जवाहर या नावाची शिवशक्तीशी तुलना होऊ शकत नाही, असे म्हणून त्यांनी कोट्यवधी लोकांच्या आस्थेचा अपमान केला आहे. हे काँग्रेसचे अंतरंग आहेत. जिथे शक्य होईल तिथे बहुसंख्यांच्या श्रद्धा आणि आस्थांचा अपमान करणे हे काँग्रेसचे धोरण आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी निवडणुकीच्या काळात मंदीराच्या कितीही वाऱ्या केल्या. डोक्यावर भस्म लावले. गंगेत स्नान केले तरी काँग्रेसचा खरा चेहरा आणि मोहरा हिंदू विरोधी आहे. आल्वी यांच्यासारख्या कवडी-दमडीच्या नेत्यांच्या तोंडून का होईना काँग्रेसने शिवशक्तीच्या विरोधात गरळ ओकून घेतली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)