25 C
Mumbai
Friday, September 27, 2024
घरसंपादकीयसेक्युलर फॅब्रिकच्या चिंध्या कुणी केल्या ते पप्पांना विचारा!

सेक्युलर फॅब्रिकच्या चिंध्या कुणी केल्या ते पप्पांना विचारा!

Google News Follow

Related

ज्या काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्यासारखा मर्यादित बकुबाचा नेता करतोय, तिथे काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांकडून कसदार युक्तिवादाची अपेक्षा काय करावी? सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे तर्कपूर्ण बोलण्याबाबत कधीच प्रसिद्ध नव्हत्या. कारण तर्क मांडण्यासाठी अभ्यास असावा लागतो, एखाद्या नेत्याची कन्या असणे पुरेसे नसते. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देशाच्या सेक्युलर फॅब्रिकबाबत त्यांनी प्रचंड चिंता व्यक्त केली. या फॅब्रिकचे आधी पोतेरे आणि नंतर चिंध्या करण्यात काँग्रेस पक्ष आघाडीवर राहिलेला आहे, याचा बहुधा त्यांना विसर पडलेला आहे, किंवा जनता काँग्रेसचे कारनामे विसरली असा त्यांचा समज झालेला आहे. देशाच्या पंतप्रधानांवर दुगाण्या झाडण्यापूर्वी त्यांनी आपल्या पिताश्रींचे आणि काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांचे प्रताप आठवून पाहावे.

सेक्युलरीझम अर्थात धर्मनिरपेक्षतावादाच्या बाता काँग्रेसचे नेते सकाळ संध्याकाळ मारत असतात. याच सेक्युरीझमच्या थडग्यावर देशाची फाळणी झाली होती. लाखो हिंदूंना प्रताडित करण्यात आले, त्यांच्या हत्या झाल्या, त्यांच्या प्रेतांच्या खाली भारतातील सेक्युलॅरीझम कधीच दफन झाला आहे.

प्रणिती शिंदे यांच्या ताडताड बोलण्याचे सोशल मीडियावर त्यांचे समर्थक प्रचंड गवगवा करतायत. प्रत्यक्षात त्यांच्या बोलण्यात तथ्य किती होते? त्यांचे बोलणे म्हणजे कोणताही विचार नसलेली बिनडोक बडबड होती. राहुल गांधी यांच्यासारखेचे बोल त्या बोलल्या होत्या.

काय बोलल्या प्रणिती? म्हणे, लाडली बहीण म्हणजे राज्यातील महिलांना लाच देण्याचा प्रकार आहे. बापाच्या जीवावर आणि नावावर राजकारण करणाऱ्या एका महिला नेत्याचे हे बोल, राज्यातील लाखो महिलांचा अनादर करणारे नाहीत का? जर लाडकी बहीण योजना ही लाच असेल तर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या योजना काय आहेत? राहुल गांधी ज्या खटाखट, खटाखट योजनेच्या आधारावर सत्तेवर येण्याचे, पंतप्रधान बनण्याचे दिवास्वप्न पाहात होते, देशभरातील महिलांना दरमहा साडे आठ हजारांचे वाटप करण्याचे आश्वासन देत होते ते नेमके काय होते?

प्रणिती यांचा युक्तिवाद बिनडोक होता, हे सिद्ध करण्यासाठी एवढे एक उदाहरण पुरेसे आहेत. भाजपा, शिवसेनेचे नेते मुळ मुद्दयांना बगल देतात. विशेष समुदाय विशेष समुदाय असा उल्लेख करत असतात. देशाचे पंतप्रधान निवडणूक प्रचार करताना विभाजनवादी भाषा वापरतात, असे अकलेचे तारे बाई या कार्यक्रमात अत्यंत तार स्वरात तोडत होत्या.

आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून, असा हा प्रकार आहे. काँग्रेसने जे इतकी वर्षे पेरले आहे तेच विष आज देशात उगवलेले दिसते. राहुल गांधी जिथे जातात तिथे जातीपातीचा विषय काढतात. देशभरात त्यांनी हिंदू तोडो अभियान सुरू केलेले आहे. ‘देशाच्या संसाधनावर पहिला अधिकार मुस्लीमांचा आहे’, हे सांगणारे डॉ.मनमोहन सिंह हे खरे विभाजनवादी होते. देशाची लाखो एकर जमीन वक्फला बहाल करणाऱ्या काँग्रेसने या देशात फुटीरतेची बीजं पेरली. मुस्लीम समाज कायम अस्वस्थ राहावा, हिंदूंपासून त्यांनी कायम वेगळेपण राखावे, यासाठी काँग्रेस कायम प्रयत्नशील राहिली. देशात मुस्लीम जिहाद टोकाला असताना यूपीएच्या काळात सापाला बाजूला ठेवून भूई धोपटण्याचे काम काँग्रेसने केले.

ज्या काळात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह झाकीर नाईक नावाच्या जिहादी सापाला दूध पाजत होते, यूपीएच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी बाटला हाऊसमध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या एन्काऊंटरवर छाती पिटत होत्या, त्या काळात देशात फक्त मुस्लीम दहशतवाद करत नाहीत, हिंदू सुद्धा दहशतवादी आहेत, हे मिथक पसरवण्याचे काम काँग्रेसची जी चौकडी करत होती, त्यात प्रणिती यांचे पप्पा सुशीलकुमारही होते. असा सुमार गृहमंत्री देशाने आजवर पाहिला नव्हता. गृहमंत्री असताना मला काश्मीरमध्ये जायला भीती वाटत होती, हे त्यांचे ताजे विधान, त्यांच्या सुमारपणाची साक्ष देणारे आहे.

‘देशात भाजपा आणि आरएसएसचे ट्रेनिंग कॅम्प हिंदू दहशतवाद पसरवण्याचे काम करीत आहेत’, असा दावा आपल्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात करणारे हेच सुशीलकुमार शिंदे होते. हा दावा त्यांनी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात केला. आपल्याकडे तसे अहवाल आहेत, असे ते म्हणाले होते. या आरोपानंतर देशभरात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. तरीही महिनाभर ते तोंडात मळी भरून बसले होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्या दिवशी त्यांनी मौन सोडले आणि लिखित माफी मागितली. त्यांचे हे विधान मुस्लीम कट्टरवाद्यांना खूष करण्यासाठी होते. देशातील हिंदूंचा अपमान करणारे होते. निव्वळ राजकीय होते.

म्हणून प्रणिती शिंदे यांनी सेक्युलरीझमचे फॅब्रिक वगैरे भाषा बोलू नये. कारण काँग्रेसच्या दृष्टीने सेक्युलरीझम म्हणजे हिंदुना दहशतवादी ठरवणे. बदनाम करणे, त्यांच्या श्रद्धास्थानांचा अपमान करणे, त्यांच्या विऱोधात षडयंत्र राबवणे. जर हे षडयंत्र नसते तर आपल्याकडे हिंदू दहशतवाद पसरवला जात असल्याचा अहवाल आहे, असा दावा गृहमंत्री म्हणून शिंदे यांनी केला नसता. शिंदे यांचे हे बेशरम विधान गृहमंत्र्याचे विधान नव्हते. सोनिया गांधी यांची भांडी घासणाऱ्या एक कणाहीन काँग्रेस नेत्याचे विधान होते. प्रणिती शिंदे सुद्धा नेमके तेच करीत आहेत. हिंदूविरोधी सोनिया गांधी यांची भांडी तुम्ही खुशाल घासा, फक्त दुसऱ्यांना सेक्युलरीझमचा शहाणपणा शिकवायला जाऊ नका.

हे ही वाचा:

एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त!

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्यांना काँग्रेसने फटकारले

झाशीच्या राणीच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या वक्फ बोर्डाचा प्रयत्न हाणून पाडला!

संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद, २५ हजारांचा दंड!

भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही विशेष समुदाय म्हणण्याची गरज काय? देशात रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू, गॅस सिलिंडर, अशा घातक वस्तू ठेवून मोठे अपघात घडवण्याचे षडयंत्र सतत सुरू आहे. या षडयंत्रात सामील असलेले लोक कोणत्या समुदायाचे आहेत? हा रेल जिहाद म्हणजे हिंदूंचे सामुहीक हत्याकांड घडवण्याचे षडयंत्र नाही तर दुसरे काय आहे? रोटीपासून ज्युसपर्यंत सर्वप्रकारच्या अन्नावर थुंकणारे आणि हे थुंकलेले हिंदूंना विकणारे कोण आहेत? देशभरात मजारी ठोकून, वक्फ बोर्डाच्या नावाखाली जमीन बळकवणारे कोणत्या समुदायाचे आहेत?

प्रणिती शिंदे यांना खरोखरच जर देशाच्या सेक्युलर फॅब्रिकची चिंता असती तर एकदा तरी या घटनांबाबत त्यांनी नापसंती व्यक्त केली असती. काँग्रेसवाल्यांची इच्छा असेल तर हे थुंकलेले त्यांनी आवडीने खावे, ज्यांना आक्षेप आहे, ते या विकृत मानसिकतेविरुद्ध आवाज उठवणारच. जर कोणी या घटनांना जबाबदार असलेल्या समुदायाचा उल्लेख विशेष समुदाय असा करत असतील तर समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणूनच करत असतील. एखाद्या विशिष्ट समाजाचे लोक देशातील एका वर्गाचे सामुहीक हत्याकांड करण्यासाठी रेल जिहाद सुरू करत असतील तर त्याच्याविरोधात हिंदूंनी बोलायचे सुद्धा नाही, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे काय? प्रणिती शिंदे हे जर सेक्युलरीझमचे फॅब्रिक असेल तर ते
तुम्ही तुमच्याकडे ठेवा हिंदूंना तुमची गरज नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
179,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा