26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयढाल गादीची, चिंता मोदींची!

ढाल गादीची, चिंता मोदींची!

काँग्रेसने खरे तर मुघलांच्या वंशजांचा शोध घेऊन त्यांना तिकीट बहाल करायला हवे होते

Google News Follow

Related

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. मोदी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्याविरोधात प्रचार करणार हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे, असा दावा मविआचे नेते करीत आहेत. मुळात छत्रपतींचे वंशज म्हणवणाऱ्या शाहू महाराजांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणे हाच त्या गादीचा अपमान आहे. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचा सहभाग असल्यामुळे आपण काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली.

संविधानाच्या रक्षणासाठी आपण लढणार आहोत, असा दावा शाहू महाराजांनी केलेला आहे. काँग्रेसने देशाच्या घटनेत १०३ वेळा दुरुस्त्या केल्या. घटनेचे पावित्र्य वारंवार पायदळी तुडवलं, आणीबाणी लादून घटनेचे तेरावे घालण्याचा प्रयत्न केला, त्या काँग्रेसच्या तिकाटावर लढणारे शाहू महाराज काँग्रेसच्या तिकीटावर लढून घटना नेमकी कोणापासून वाचवणार आहेत? या प्रश्नाचे उत्तर फक्त तेच देऊ शकतात.

काँग्रेसने कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला नाही. ही परंपरा नेहरुंपासून सुरू आहे. गांधी-नेहरु घराण्याला छत्रपतींपेक्षा मुघलांचे आकर्षण जास्त. दिल्लीतील सगळ्या रस्त्यांना बाबरापासून औरंगजेबापर्यंत सगळ्यांची नावे देणाऱ्या काँग्रेसला छत्रपतींची कधी आठवण झाली नाही. काँग्रेस सत्तेवर असेपर्यंत दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची कायम उपेक्षा झाली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीत २००३ मध्ये संसदेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा स्थापित करण्यात आला. शिवसेनेचे मनोहर जोशी तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते. काँग्रेसच्या एकाही पंतप्रधानाला ही बुद्धी झाली नाही.

त्याच काँग्रेसचे शाहू महाराज उमेदवार आहेत. त्यांना ज्या उबाठा सेनेचा पाठिंबा आहे, त्यांचे कार्यकर्ते अलिकडे जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा विसरलेत, ते हजरत टिपू सुलतान की जयच्या घोषणा देतायत. उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार तर स्वत:ला जाणता राजा समजतात. शाहू महाराजांना एमआयएमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा तरी नाकारण्याचे धार्ष्ट्य त्यांनी दाखवायला पाहिजे होते.

हे ही वाचा:

“विरोधकांकडे सर्वच इंजिन; डब्बे लावायला कोणी तयार नाही”

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केला

भारत आत्मनिर्भर; चीनमधून खेळण्यांची आयात ७० टक्क्यांनी घटली

‘नोटा’ला बहुमत मिळाल्यास पुन्हा मतदान?

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सदाशिव मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजी राजे यांचा पराभव केला होता. २०२४ च्या निवडणुकीत सदाशिव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक आणि संभाजी राजे यांचे पिताश्री शाहू महाराज यांच्यात लढत होते आहे. २०१९ च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढलेल्या धनंजय महाडीक यांचा पराभव झाला होता. ते आज भाजपाचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि संजय मंडलिकांसाठी ताकद लावतायत.

संभाजी राजेंना भाजपाने खासदारकी दिली होती. परंतु त्यांना स्वराज्य पक्षाची स्थापना करून स्वतंत्र चूल मांडली. हा पक्ष जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांना प्रयत्न होता. शाहू महाराजांनी खरे तर मुलाच्या पक्षातून निवडणूक लढवून पक्षाला ताकद द्यायला हवी होती. पण ते काँग्रेसची ताकद घेऊन लढण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी संभाजी राजे यांच्या पक्षाचे दुकान सुरू होण्यापूर्वीच बंद करून टाकले आहे.

कोल्हापूरात छत्रपतींच्या गादीला मान आहेच. पण शाहू महाराजांना दिलेले मत हे मोदींच्या विरोधात आणि राहुल गांधींच्या पारड्यात जाणार आहे. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करणारा पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूला छत्रपतींचे वावडे असलेले गांधी-नेहरु खानदान. मतदारांना यातून निवड करायची आहे. काँग्रेसने खरे तर मुघलांच्या वंशजांचा शोध घेऊन त्यांना तिकीट बहाल करायला हवे होते. परंतु राजकारणाची गणित कायमच गुंतागुंतीची असतात. सर्वसामान्यांच्या आकलना पलिकडची.

कधी काळी वाचाळवीर संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांच्याकडे छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागितला होता. शाहू महाराजांनी राऊतांना असा काही पुरावा दिला आहे की नाही हे कळायला मार्ग नाही. तेच राऊत आता मोदींना शहाणपणा शिकवायला चालले आहेत. मोदी कोल्हापूरात प्रचार करून छत्रपतींच्या गादीचा अपमान करतायत, असा राऊत यांचा दावा आहे. राऊतांना छत्रपतींच्या गादीपेक्षा काँग्रेसची चिंता जास्त आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांनी या देशाच्या इतिहासाला दिलेली दिशा कोल्हापूरच्या गादी पेक्षा खूप महत्वाची आहे. त्या विचार आणि गादीमध्ये निवड करण्याची वेळ येईल तेव्हा विचारांनाच झुकते माप द्यावे लागणार. मोदी तेच करयात. छत्रपतींचा विचार जगवायचा असेल तर या देशातून काँग्रेस नामशेष होणे गरजेचे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा