23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरसंपादकीय१९९१ च्या भुजबळांची आठवण झाली.. यावेळीही पुरून उरणार काय?

१९९१ च्या भुजबळांची आठवण झाली.. यावेळीही पुरून उरणार काय?

छगन भुजबळ हे शरद पवारांना सोडून जातील, त्यांच्यावर शाब्दिक वार करतील अशी कोणी कल्पनाही केली नव्हती.

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यात आता जोरदार तू तू – मै मै सुरू झाले आहे. नेतृत्वाशी पंगा घेण्याचा भुजबळ यांना अनुभव आहे, १९९१ मध्ये शिवसेना फोडल्यानंतर त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तुंबळ शाब्दिक खडाजंगी झाली होती. त्यावेळी भुजबळ बाळासाहेबांना आटोपले नव्हते. आताही ते पवारांना पुरून उरतील काय असा सवाल निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर छगन भुजबळ हे शरद पवारांना सोडून जातील, त्यांच्यावर शाब्दिक वार करतील अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर स्पष्ट सांगितले होते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल पटेल या तीन नेत्यांबाबत त्यांना संशय आहे. परंतु जे घडले ते लोकांच्या समोर आहे. भुजबळ यांनी हा हाणामारीत अब्दुल करीम तेलगीचे प्रकरण बाटलीतून बाहेर काढले आहे.

तेलगी प्रकरणात माझा संबंध नसताना २००३ मध्ये माझा राजीनामा घेण्यात आला. एवढे बोलून भुजबळ थांबले नाहीत. महापालिका उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी जेव्हा तुमच्यावर १९९२ ते १९९४ दरम्यान आरोप केले तेव्हा तुमचा राजीनामा कोणीही मागितला नाही, असेही त्यांनी शरद पवारांना सुनावले. भुजबळ यांच्या या भडीमारामुळे त्यांच्या जुन्या प्रतापांची आठवण येऊ लागली आहे.

शिवसेना फोडल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी भुजबळांचा उल्लेख लखोबा लोखंडे असा करायला सुरूवात केली. भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले, ते बाळासाहेबांचा उल्लेख टी.बाळू असा करू लागले. शिवसेना सोडणाऱ्या एकाही व्यक्तिने शिवसेनाप्रमुखांचा असा शेलक्या पद्धतीने उल्लेख केला नव्हता. शरद पवारांच्या विरोधात भुजबळ आता तशीच आक्रमकता दाखवतायत. शरद पवारांचे वाईट दिवस सुरू आहेत. सहानुभूती मिळवण्यासाठी पवार ही खेळी करतायत, असा दावा जर कुणी करत असेल तर त्यावर विश्वास ठेवण्याची इच्छा होत नाही. राजकारणात इतके व्यवस्थापन केले जाऊ शकते यावर आमचा तरी विश्वास नाही. राजकारणाने कातडी कितीही निबर केलेली असली तरी प्रत्येकाला मान-अपमान राग-लोभ तर असतोच.

भुजबळांना उत्तर देण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी तेलगी प्रकरणात भुजबळांचे नाव आरोप पत्रातून काढणारा अदृश्य हात कोणाचा… अशी रहस्यमय पोस्ट करून शरद पवारांसाठी बॅटींग करण्याचा प्रय़त्न केला. परंतु शरद पवार यात उघडे पडत आहेत, त्यांचा तेलगी प्रकरणात हस्तक्षेप होता हे सिद्ध होते हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ती पोस्ट डीलिट केली.

हे ही वाचा:

महेंद्रगिरी प्रकल्पातील युद्धनौकेचे आज जलावतरण

मुलांच्या वाचनाची भूक भागवतेय ‘घोडा लायब्ररी’

चेंबूरमध्ये १७ वर्षाच्या मुलाची हत्या करून तुकडे घरात ठेवले

राज्यात नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता

परंतु ती पोस्ट डीलीट केली नसती तरीही चालले असते असे दिसते. कारण जे आव्हाडांना म्हणायचे होते ते शरद पवारच बोलून मोकळे झाले आहेत. शरद पवारांना पुन्हा एकदा भुजबळांना उत्तर देण्याची खुमखुमी आली आणि आपण भुजबळांचा राजीनामा घेतला नसता तर त्यांना तुरुंगात जावे लागले असते असे विधान केले आहे. हेच जितेंद्र आव्हाड यांनी सोशल नेटवर्क साईट एक्सवर अपलोड केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते. शरद पवार आता स्वत: सांगतायत की त्यांनी तेलगी प्रकरणात भुजबळांना वाचवले. तुरुंगात जाण्यापासून वाचवतो, मंत्री पदाचा राजीनामा द्या, अशी डील झाली असावी बहुधा. शरद पवार यांनी आपल्या हस्तक्षेपाची कबुली दिली आहे.

भुजबळांनी तेलगी प्रकरणावरून वार केल्यामुळे शरद पवार बिथरले आहेत, हे त्यांच्या ताज्या विधानावरून उघड होते आहे. तेलगी प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी त्यांना हस्तक्षेप केला होता. त्यात भुजबळांचे नाव लोकांच्या समोर आले, पण मग ज्या अन्य आरोपींना उल्लेख आव्हाडांनी डीलिट केलेल्या पोस्टमध्ये केला होता ते नेमके कोण होते?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा