27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरसंपादकीयजरांगेना भुजबळांनी चेपले ते विसरा; पण डॉ.आंबेडकर लक्षात ठेवा....

जरांगेना भुजबळांनी चेपले ते विसरा; पण डॉ.आंबेडकर लक्षात ठेवा….

जरांगेंच्या गैरसमजाच्या भुजबळांच्या घणाघातामुळे ठिकऱ्या

Google News Follow

Related

ज्या मराठवाड्याच्या भूमीतून मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाले त्याच बालेकिल्ल्यात काल छगन भुजबळ यांनी ओबीसींचा भव्य मेळावा घेतला. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना अत्यंत शेलक्या भाषेत सुनावले. आपण जेव्हा समोरच्यांसाठी आक्रस्ताळी आणि जहाल भाषा वापरतो तेव्हा समोरचे गपगुमान ऐकून घेतील, या जरांगेंच्या गैरसमजाच्या भुजबळांच्या घणाघातामुळे ठिकऱ्या झाल्या. जरांगेंच्या चार पावले पुढे जाऊन भुजबळांनी त्यांची पिसं काढली. साठमारीमुळे महाराष्ट्र धुमसायला लागला आहे.

महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी अशा दुर्दैवी संघर्षाच्या आशंकेने सुजाण नागरीक व्यथित झालेले आहेत. गेल्या काही वर्षांत मराठा आरक्षणासाठी लाखा लाखाचे ५८ मोर्चे निघाले. परंतु कुठे साधी धक्काबुक्की झाली नाही. सगळं कसं शिस्तबद्ध सुरू होतं. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यामुळे ओबीसी नेत्यांकडून मराठा आरक्षणाच्या भूमिकेला तीळभर सुद्धा विरोध झाला नाही.

मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला वेगळे वळण लावले. राज्य सरकारच्या डोक्यावर बंदूक ठेवून आपण आरक्षणाची मागणी मान्य करून घेऊ असा त्यांचा समज होता. उपोषणाचा हत्यारासारखा वापर झाला. लोकप्रतिनिधींची घरे जाळण्यात आली. जाळपोळ करताना घरात लहान मुलं आहेत, महिला आहेत, याचे भान सुद्धा आंदोलकांना राहिले नाही.
मुळात राज्य सरकारची बोटचेपी भूमिका या सगळ्याच्या मुळाशी होती. आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा प्रश्न तिथेच सुटू शकतो, असे स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगायला हवे होते. जे काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निसंदीग्ध पद्धतीने सांगितले. हे न झाल्यामुळे जरांगे यांचा फुगा फुगत राहिला. काल भुजबळांनी त्याला टाचणी लावली.

जालन्यातील सभेत व्यासपीठावर सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले होते. जरांगेंचा भुजबळांनी एकेरी उल्लेख केला. ते पाचवी पास आहेत, सासऱ्याच्या घरी तुकडे तोडतात, त्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, अशी बरीच अनावश्यक आणि वैयक्तिक टीका जरांगेवर करण्यात आली. ही टीका जरांगे यांना झोंबणे स्वाभाविक होते. टीका वैचारिक असावी वैयक्तिक असू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांवर वैयक्तिक टीका करताना जरांगेना हे शहाणपण सुचले असते तर बरे झाले असते. तुम्ही इतरांच्या काड्या काढता, तेव्हा त्यातला एखादा तुम्हाला मूँहतोड जबाब देणारच. एव्हीरी एक्शन हॅज इक्वल एण्ड अपोझिट रीएक्शन हा भौतिकशास्त्राचा नियम जगातील प्रत्येक क्षेत्रात लागू होतो.

तुम्ही लोकांवर शेणगोळे फेकणार, वाट्टेल तसे बोलणार, अँग्री यंग मॅनच्या थाटात त्यांना हाणणार, त्या टिकेचे उत्तर देताना समोरच्यांनी वैयक्तिक न बोलता वैचारिक बोलण्याची अपेक्षा करणार, हे कसे शक्य होईल? जरांगेनी जे केले भुजबळ त्याच्या एक पाऊल पुढे गेले. तुम्हाला अवघ्या देशाला वंदनीय आणि प्रातःस्मरणीय छत्रपती शिवाजी महाराजांची जात दिसते, भुजबळ एक पाऊल पुढे गेले. त्यांनी भगवान कृष्णाची जात सांगितली. भुजबळांचे समर्थन करता येत नाही, परंतु पहिली चूक कोणी केली, हा प्रश्न लोकांच्या मनात येणारच.

 

अनेक वर्षापूर्वी मराठवाड्यातील एका व्याख्यानमालेत विचारवंत, लेखक नरहर कुरुंदकर म्हणाले होते की, महाराष्ट्रात जाती जातीच्या लोकांनी महापुरुषांची वाटणी केलेली आहे. सुदैवाने अजून छत्रपती शिवाजी महाराज अपवाद आहेत. कुरुंदकर आज हयात नाहीत. जर असते तर छत्रपती शिवाजी महाराजांनाही जातीचा टॅग लावलेला पाहणे त्यांच्या भाळी आले असते. महाराष्ट्रातील काही कर्मदरिद्री लोकांनी हा अपवाद पण पूसून टाकायचा चंग बांधलाय. छत्रपती शिवाजी महाराजांना जातीचा टॅग चिकटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळीच रोखणे गरजेचे आहे. नाही तर हिंदूंच्या देवदेवतांच्या जाती शोधण्यापर्यंत लोकांची मजल जाईल. भुजबळांनी त्याची सुरूवात केलेली आहे.

मुद्दा कोणताही असो जोपर्यंत त्याचे समर्थन करणारा शांतपणे युक्तिवाद करतोय, तर्कपूर्ण बोलतोय, तोपर्यंत त्याचा प्रतिवाद करणाराही शांतपणे बोलेल. परंतु जर एखादा आरडाओरडा करायला लागला तर समोरच्यालाही आरडाओरडा करणे, आवाज चढवणे भाग पडचे. त्यामुळे मनोज जरांगेंना भुजबळांचा आरडाओरडा ऐकणे भाग आहे, कारण सुरूवात त्यांनी केलेली आहे.

महाराष्ट्राचा सात-बारा तुमच्या नावावर केला आहे काय? असा सवाल काल भुजबळांनी केला. नेते आणि लोकप्रतिनिधींना गाव बंदी करण्याच्या मराठा आंदोलकांच्या भूमिकेविरोधात भुजबळांनी ही डरकाळी फोडलेली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण घटनाकार म्हणून ओळखतो. परंतु हा त्यांचा स्वल्प परिचय आहे. डॉ.आंबेडकरांना भारतीय मानसिकतेची अचूक ओळख होती. २५ नोव्हेंबर १९४९ मध्ये त्यांना घटनापीठासमोर भाषण देताना काही रास्त चिंता व्यक्त केल्या होत्या.

हे ही वाचा:

विश्वविजेत्या कर्णधारांचा ‘फायनल’ दिनी होणार खास सत्कार

भारतीय क्रिकेट टीमचे ‘भगवे’ टी शर्ट ममता बॅनर्जींना नकोसे

एक डझनहून अधिक वॉन्टेड दहशतवाद्यांच्या हत्येनंतरही पाकिस्तान शांत का?

कामगाराची व्यथा; मी बोगद्यात अडकलोय, हे आईला सांगू नकोस!

भारतीय जातीपाती पेक्षा देशाला की देशापेक्षा जातीपातींना महत्व देतील? जर देशातील राजकीय पक्षांनी देशापेक्षा जास्त महत्व जातीपातींला दिले, तर देशाचे स्वातंत्र्य पुन्हा एकदा संकटात येईल. कदाचित ते आपण कायचे गमावून बसू… असा इशारा आंबेडकरांनी दिला होता. तोंडाने सतत घटनेची जपमाळ ओढणारे देशाचे नेते कदाचित आंबेडकरांचा हा इशारा विसरलेले आहेत.

 

स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व लोकांचे भले व्हावे, विकासाची गंगा घरोघरी पोहोचायला हवी होती. दुर्दैवाने सुरूवातीची काही वर्षे घोषणाबाजी शिवाय दुसरे काहीच झाले नाही. आज विकासापासून वंचित असलेल्या समाजाला आरक्षण हाच आपल्या दु:खावरचा इलाज वाटतो आहे. त्यातून जातीजातीत संघर्ष सुरू होण्याची चिन्ह आहेत. विकासाची आस बाळगणे गैर नाही. प्रत्येक देशवासियाचा तो मूलभूत हक्क आहे. परंतु हक्कासाठी संघर्ष करताना आंबेडकरांचा इशारा जर आपण विसरलो तर कदाचित पुन्हा एकदा सर्वस्व गमावण्याची वेळ आपल्यावर येऊ शकेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा