उत्तर भारतात श्रावणात मोठ्या संख्येने कावड यात्रा निघतात. तिथे श्रावण आपल्या आधी सुरू होतो. हजारो तरुण या यात्रांमध्ये सामील होतात. गंगा – यमुना या पवित्र नद्यांचे पाणी शिवलिंगावर चढवले जाते. उत्तर प्रदेशातील हजारो कावडीया जथ्या जथ्याने बाहेर पडतात. कित्येक मैल पायी प्रवास करतात. शिवलिंगावर जल चढवून हर हर महादेवचा गजर करतात. ही कावड यात्रा जिथून पुढे सरकते त्या मार्गावरील हॉटेल, दुकाने, ठेले आणि ढाबे मालकांना नावाच्या पाट्या लावण्याचे आदेश पोलिस प्रशासनाने दिले आहेत. या आदेशाच्या विरोधात काहूर माजवण्याचे काम मुस्लीम नेते करतायत. आपले नाव सांगा म्हटल्यावर यांची इतकी आग का होते आहे?
२२ जुलै पासून तिथे कावड यात्रा सुरू होणार आहे. मुजफ्फर नगरचे एसीपी अभिषेक सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हॉटेल, ढाबे, हातगाड्या, दुकानांचे मालक कोण? काम करणारे कोण? यांच्या नावांच्या पाट्या लावण्याचे निर्देश दिले. कावडीयांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, आरोप प्रत्यारोप होऊन कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी हे निर्देश दिले असल्याचे अभिषेक सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
हे आदेश फक्त मुस्लिमांना दिलेले नसून सरसकट आदेश आहे. आदेशात मुस्लिमांचा उल्लेखही नाही. असा आदेश काढण्याचे कारण स्पष्ट आहे. कोणताही हिंदू, मुस्लीम नावाची पाटी लावून धंदा करण्याचे कारण नाही. परंतु असे अनेक ढाबे, हॉटेल आणि ठेले आहेत, ज्यांचे मालक मुस्लीम आहेत, परंतु नावे मात्र जाणीवपूर्वक हिंदू ठेवण्यात येतात. तुम्ही कोणत्याही हायवेने दूरचा प्रवास करत असाल तर महाराष्ट्र, भारत, हिंदूस्तान, जय माता दी, बांकेबिहारी, ऑरेंज, हवेली अशी नावे असलेली हॉटेल तुम्हाला दिसतील. मालक मुस्लीम असला तरी अल मदीना, अल अक्सा, अकबर, हुमायुन, बाबर अशा नावांनी कोणीही हॉटेल किंवा ढाबा चालवत नाही.
पोलिसांच्या आदेशानंतर ज्यांना नावे उघड करण्याची इच्छा नाही अशा अनेकांना कावड मार्गातील ढाबे, हॉटेल्स बंद केले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आदेशावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. नावे अशासाठी लिहायला सांगितली आहेत की, कावडीयांनी मुस्लिमांच्या दुकानांमध्ये काही वस्तू विकत घेऊ नये, असा दावा त्यांनी केलेला आहे.
ओवेसींना मुळात हा प्रश्न पडायला हवा होता की मुस्लिमांना आपली ओळख लपवण्याचे कारण काय? त्यांना हिंदू नावाने हॉटेल किंवा ढाबा चालवण्याची गरज का वाटते? आपण मुस्लीम आहोत हे सांगण्याची त्यांना लाज का वाटते? अमेरिका किंवा युरोपमध्ये जाणारा पाकिस्तानी आपले राष्ट्रीयत्व लपवतो, कोणी विचारले तर आपण भारतीय आहोत, असे खोटेच सांगतो, तसाच हा प्रकार आहे. तिथे हॉटेल चालवणारे, धंदा करणारेही तेच सांगतात. पाकिस्तान्यांना हे सांगावे लागते कारण पाकिस्तान म्हणजे दहशतवाद, पाकिस्तान म्हणजे जगभरात कटोरा घेऊन भीक मागणारा देश, पाकिस्तान म्हणजे चीनचे प्यादे. त्यामुळे मान ताठ करून पाकिस्तानी कधी आपली ओळख सांगू शकत नाही.
देशातल्या मुस्लिमांना लाज का वाटते? त्याची कारणे त्यांनाही ठाऊक आहेत. यांचे नेते सरस्वती वंदनेचा, सूर्य नमस्काराचा विरोध करतात. मशिदीवरून रामनवमीची मिरवणूक जल्लोषात निघाली तर यांच्या बुडाला आग लागते, राम जन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी, काशी विश्वनाथ, भोजशाला या ठिकाणी मंदिरे तोडून मशिदी उभारल्या हे उघड दिसत असूनही ही पवित्र स्थळे हिंदूंना देण्याची त्यांची मानसिकता नसते. हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढणे, जिथे मुस्लीम बहुसंख्य आहे, तिथून हिंदूंना हुसकावून लावणे हे धंदे मुंबई, पुण्यासारख्या शहरातही चालतात. हिंदूंशी, हिंदूंच्या श्रद्धा स्थानांशी यांचे नेते उभा दावा मांडतात. यांचे मौलवी हिंदूंशी जिहाद छेडण्याची भाषा करतात. एकही मुस्लीम याचा विरोध करताना दिसत नाही. हिंदुस्तानात राहून हिंदूंबाबत इतका विद्वेष आपण बाळगतो मग मुस्लीम आहोत असे सांगून हिंदू श्रद्धा बाळगणाऱ्या कावडीयांकडून पैसा कसा कमवायचा? असा प्रश्न पडल्यामुळे ही बनवेगिरी करण्याची बुद्धी होते. त्यामुळे हिंदू नावाच्या पाट्या लावाव्या लागतात.
सरकारने आदेश दिल्याशिवाय एखादा पोलिस अधिकारी अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकत नाही. कावडीयांना कोणताही त्रास होऊ नये असे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिलेले आहे. रस्त्यांची दुरुस्ती, कावडीयांची सुरक्षा, कावड मार्गांची सफाई, कावड मार्गावर ड्रोन निगराणी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. कावड यात्रा सुरळीत व्हावी म्हणून ते स्वत: लक्ष ठेवून आहेत. आपण खातो ते अन्न शुद्ध असावे, त्यात कोणतीही भेसळ नसावी, ते दूषित करण्यात आलेले नसावे याची काळजी प्रत्येक जण घेत असतो. धार्मिक श्रद्धांच्या बाबतीत ते अधिक काटेकोरपणे पाळले जाते.
हे ही वाचा:
तर इम्तियाज जलील यांचे कोल्हापुरी पायताणाने स्वागत केले जाईल….
सूर्यकुमार टी-२०चा कर्णधार, शुभमनकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी
कावड यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानावर मालकाचे नाव लिहा!
मुस्लीम समाजाची लोकसंख्या १४ वरून ४० टक्यांवर !
अलिकडेच सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांच्या पुढाकाराने मंदिराबाहेर विकला जाणारा प्रसाद शुद्ध आणि पवित्र असावा, यासाठी पुढाकार घेऊन एक उपक्रम राबवला. त्र्यंबकेश्वर मंदिरात महिन्याभरापूर्वी याची सुरूवात झाली. अनेक ठिकाणी मंदिराबाहेर विकल्या जाणाऱ्या पेढ्यांमध्ये, मिठाईत चर्बीपासून तयार केले जाणारे तूप मिसळलेले असते असा दावा त्यांनी केलेला आहे. आपण सेवन करतो ते अन्न असो किंवा प्रसाद त्यात भेसळ नसावी याची खातरजमा करून खाण्याचे सध्याचे दिवस आहेत. प्रसाद शुद्ध आहे, यावर शिक्कामोर्तब करणारे ओम प्रमाणपत्र देण्याची सुरूवात त्र्यंबकेश्वरपासून झालेली आहे. मंदिराबाहेर प्रसाद विकणारे कोण आहेत, ते विकत असलेला प्रसाद बनवताना वापरलेल्या सर्व वस्तू त्या प्रसादाचे पावित्र्य कायम ठेवणाऱ्या आहेत का याची खातरजमा करण्याचा अधिकार प्रत्येक भाविकाला आहे. तो भाविक महाराष्ट्रातला असो, उत्तर प्रदेशातील असो वा उर्वरीत देशातील.
अन्नात थूंकून ते विकले जाते असे अनेक व्हीडीयो यूट्युबवर आहेत. काही जणांना त्याचे असे समर्थन केले की ते जेवणांत थुंकलेले नाही, ते दुवा करून फुंकलेले आहे. ज्यांना ते थुंकलेले किंवा फुंकलेले खायचे आहे ते त्यांनी जरुर खावे मात्र ज्यांना असे अन्न खायचे नाही, ज्यांना शुद्ध आणि पवित्र अन्न हवे आहे, ते मिळवणे हा त्यांचा अधिकार आहे. तो मान्य करायला हवा.
त्याच दृष्टीने योगी सरकारच्या आदेशामुळे कावडीयांच्या मनातही कोणता संभ्रम उरणार नाही, आपण खातो ते अन्न, ज्यूस, पाणी शुद्ध आणि पवित्र आहे. त्यात कोणतीही भेसळ करण्यात आलेली नाही, ते दूषित करण्यात आलेले नाही, याबाबत ते नि:शंक असतील. कोणताही किंतुपरंतु न बाळगता ते अशा पदार्थांचे सेवन करू शकतील.
देशातली हिंदू हा सहिष्णू आहे. त्याने सजग होण्याची गरज आहे. डोळे आणि कान उघडे ठेऊन आपल्या श्रद्धा जपण्याची गरज आहे. हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)