ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अहिल्यानगर दौऱ्या दरम्यान ‘अहिल्या नगरचे पुन्हा एकदा अहमद नगर करा’ अशी लाडीक मागणी मुस्लिमांनी केली. त्यांना तसा रीतसर अर्जही दिला. पवारांनी याबाबत तातडीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मनात काय शिजते आहे, याबाबत लोकांना कायम संभ्रमात ठेवायचे हा मुत्सद्यांचा बाणाच असतो. पवार मुत्सद्यांचे शिरोमणी आहेत. परंतु त्यांच्या मनात काय आहे, हे ताडणे कठीण नाही. अशा लाडीक मागण्या पवारांकडेच केल्या जातात, या प्रश्नासाठीही मेंदूवर फार जोर देण्याची गरज नाही.
भारतातील मुस्लीम काही अरबस्थानातून आलेले नाहीत. तिथून आलेले मूठभरच होते. बाकी इथलेच आहेत, जे कालपर्यंत हिंदू होते. आजही असे अनेक मुस्लीम आहेत, ज्यांची नावे देशमुख, पावसकर, गिरकर, नाईक अशी आहेत. पाकिस्तानी मौलवी तारीक जमीलचा एक व्हीडीयो खूप व्हायरल झाला होता, त्यात हा म्हणतो की, आम्ही पृथ्वीराज चौहान यांचे वंशज आहोत. अशा बऱ्याच जणांनी कधी काळी तलवारीच्या धाकाने किंवा अनन्वित अत्याचारांना कंटाळून यांच्या पूर्वजांनी धर्म सोडला. हे लोक, ज्यांच्या मुळे त्यांच्या पूर्वजांना धर्म सोडावा लागला अशा मुस्लीम आक्रमकांचे भजन करण्यात आघाडीवर असतात, त्यांच्या खाणाखूणा कायम कशा राहीतील यासाठी कंबर कसून उभे ठाकतात, हे मोठे आश्चर्यच आहे.
जामखेड येथे मुस्लीमांनी केलेली मागणी बरंच काही सांगून जाते. मुस्लिमांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा मान्य नाही. चालू वर्ष हे अहिल्यादेवींचे ३०० वे जयंती वर्ष. त्यांचा जन्म याच जिल्ह्यातला. त्यामुळे त्यांचे नाव या जिल्ह्याला देणे हे समयोचितच आहे. अशी माऊली जिने काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. इस्लामी सत्तांच्या हाथोड्याने उद्ध्वस्त करण्यात आलेली अनेक मंदिरे पुन्हा उभी केली. अनेक पवित्र नद्यांवर घाट बांधले, धर्मशाळा उभारल्या. गोरगरीबांसाठी, जनतेसाठी मोठे काम केले. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासारख्या अभिनव आणि कल्पक योजना राबवल्या. त्या अहिल्यादेवींचा वारसा मुस्लीमांना नकोसा वाटतो कारण त्या पुण्यश्लोक जरी असल्या तरी हिंदू होत्या. निजाम अत्याचारी असला, हिंदूद्वेष्टा असला तरी मुस्लीम होता.
महाराष्ट्रावर चालून आलेल्या आक्रमकांच्या खूणा महाराष्ट्रावर कायम राहव्यात, अशी त्यांची मानसिकता आहे. निजाम अहमदाचे नाव या शहराला देण्यात आले होते. त्याच्याच पालख्या खांद्यावर मिरवण्याची आकांक्षा हे मुस्लीम बाळगून आहेत. दहशतवादी इशरत जहाँचे समर्थन करण्यापासून ट्रिपल तलाक रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा कडाडून विरोध करण्यापर्यंत सर्व काही शरद पवारांनी केलेले आहे. त्यांचे कन्यारत्न, संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी तर बुरख्याचे, ट्रिपल तलाकचे जोरदार समर्थन केले आहे. त्यामुळेच राज्यातील जिहादी मानसिकतेच्या कट्टरतावादी मुस्लिमांना कायम शरद पवार जवळचे वाटतात. जामखेडच्या मुस्लिमांनी पवारांच्यासमोर ही मागणी करावी यातच सगळे काही आले.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ४८ पैकी १४ मतदार संघात व्होट जिहादचा प्रयोग झाल्याची कबुली दिली. जे लोकसभा निवडणुकांमध्ये झाले, त्याची पुनरावृत्ती विधानसभेतही त्यांना करायची आहे. शरद पवार यांच्यासमोर केलेली मागणी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळात केलेल्या मतांच्या गुंतवणुकीचा परतावा मागण्याचा प्रकार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मागितलेले एडवान्स म्हणा हवे तर. अहमद नगरमध्ये शरद पवारांच्या समोर झालेल्या या घोषणाबाजीनंतर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी तर स्पष्ट आरोप केलेला आहे, की शरद पवार आणि उबाठा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांशी मतांचे डील केलेले आहे. आमचे सरकार आले तर गणेशोत्सवाच्या काळात मशिदीवर मिरवणूक नेण्यास बंदी आणू, यासह अनेक आश्वासने त्यांनी दिलेली आहेत.
हे ही वाचा:
केवढे हे अराजक ? आयएएस अधिकाऱ्याची पत्नीच प. बंगालमध्ये सुरक्षित नाही!
पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा पाठींबा कायम असेल
समाजवादी आमदार मेहबूब अली यांच्यावर गुन्हा दाखल
जम्मू- काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी हजार रुपये मिळायचे; स्थानिक तरुणाचा खुलासा
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर दुकानात स्पीकरवर गायत्री मंत्र ऐकणाऱ्या दुकानदाराला अजानच्या वेळी गायत्री मंत्र बंद कर म्हणून धमकावण्यात आले. त्याने बंद करण्यास नकार न दिल्यामुळे त्याला मारहाण तर झालीच शिवाय पोलिस ठाण्यात दुकानदाराच्या विरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला. उत्तर प्रदेशात जेव्हा सपाची राजवट होती, तेव्हा मुस्लिमांनी काहीही केले तरी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा नाही, असा सर्व पोलिस ठाण्यांना अलिखित आदेशच होता. मविआचे सरकार आले तर तीच परीस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
पवारांच्या समर्थकांनी दहशतवाद्यांच्या आरत्या ओवाळायला सुरूवात केलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या सौभाग्यवतींनी ओसामा बिन लादेनचे चरित्र वाचण्याचे जाहीर आवाहन केलेले आहे. पवारांची आणि त्यांच्या चेल्यांची ही मानसिकता मुस्लिमांनाही पुरती ठाऊक आहे, त्यामुळेच अहिल्यानगरचे नामकरण करण्याची मागणी पवारांकडे करण्याची त्यांची हिंमत झाली. या सगळ्या प्रकाराकडे मतदारांनी उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)