26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरसंपादकीयआव्हाडांचा हिशोब होणार

आव्हाडांचा हिशोब होणार

Google News Follow

Related

केलेली कर्म फिरून येतात. मग राजा असो वा रंक. महाविकास आघाडीच्या काळात ज्या ज्या लोकांनी सत्तेचा वरवंटा जनसामान्यांवर फिरवला त्यांचा हिशोब व्हायला आता सुरूवात झाली आहे. ठाण्यात एका फेसबुस पोस्टवरून ज्या अनंत करमुसे यांना मारहाण झाली, त्याप्रकरणात पोलिसांनी योग्य तपास झाला नसल्याचा त्यांचा दावा होता. सर्वोच्च न्यायालयाने अनंत करमुसे यांच्या याचिकेत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे नमुद करून याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी दाखल करून घेतली आहे. येत्या २५ नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी सुरू होणार आहे.

कोविडच्या काळात कोविड योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ‘घरासमोर पणत्या लावा’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावेळी गृहनिर्माण मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी या निर्णयाची जाहीर खिल्ली उडवली. त्यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी उडवली. परंतु जनतेने या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद दिला. त्यानंतर एक आव्हाडांची खिल्ली उडवणारे एक चित्र व्हायरल झाले. यात आव्हाडांच्या पार्श्वभागातून आग बाहेर पडत असल्याचे दाखवण्यात आले होते. ठाण्यात राहणाऱ्या अनंतर करमुसे या तरुणाने ‘मी याचा निषेध करतो’ अशी ओळ टाकून हे चित्र फेसबुकवर शेअर केले.

तारीख होती ५ एप्रिल २०२०. म्हणजे ऐन कोविडचा काळ. वेळ होती साधारणपणे रात्री साडे नऊची. रात्री सव्वा अकरा वाजता करमुसे यांच्या घोडबंदर रोड येथील घराची बेल वाजली. दार उघडले तर समोर दोन पोलिस आणि अन्य दोन हट्टेकट्टे तरुण. ‘तुम्हाला तपासासाठी पोलिस ठाण्यात यावे लागेल,’ असे ते म्हणाले. करमुसे यांच्या फोनची बॅटरी लो होती म्हणून ते पत्नीचा फोन घेऊन गेले. प्रत्यक्षात पोलिस ठाण्यात नेतो असे सांगून करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या येऊर येथील बंगल्यात नेण्यात आले. तिथे बऱ्याच कार्यकर्त्यांसह आव्हाडही हजर होते. करमुसे यांना इथे बेदम मारहाण करण्यात आली. जबरदस्तीने त्या पोस्टबद्दल माफी मागणारा त्यांचा व्हीडीयो तयार करण्यात आला. त्यानंतर ही पोस्ट डीलीट करण्यास त्यांना सांगण्यात आले.

फोन घरी आहे, असे करमुसे यांनी सांगताच वीरु वाघमारे या कार्यकर्त्याच्या फोनवर त्यांच्या फोनवर कॉल करण्यात आला. स्वत: आव्हाड करमुसेंच्या पत्नीशी बोलले. धमकावणीच्या सूरात ही पोस्ट डीलिट करायला सांगितले. करमुसे मारहाणीमुळे अर्धमेले झाले होते. त्यांच्या अंगठ्याचे हाडही फ्रॅक्चर झाले होते. त्यांना आधी हॉस्पिटलमध्ये नेऊन जुजबी उपचार करण्यात आले. त्यानंतर वर्तक नगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात भादवी कलम २९२ आणि माहीती तंत्रज्ञान कायदा ६६ ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाणीबद्दलही पोलिसांनी एफआयआर दाखल केला, परंतु तो करमुसे यांना दाखवण्यात आला नाही. एफआयआरमध्ये आव्हाडांचे नाव आणि त्यांचे कर्म दोन्हीचा उल्लेख नव्हता. किरकोळ मारहाणीचे प्रकरण नोंदवून मामला रफादफा करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचे स्पष्ट दिसत होते.

पोलिसांच्या या बनवाबनवीविरुद्ध आणि आव्हाडांच्या दहशतीविरुद्ध न्याय मागण्यासाठी करमुसे यांनी प्रदीर्घ लढाई लढली. दोन वर्षांनी आव्हाडांचे नाव अतिरीक्त आरोपपत्राच्या माध्यमातून सामील करण्यात आले. याप्रकरणातच आव्हाडांसारखा उच्च पदस्थ गुंतला असल्यामुळे याप्रकरणाचा तपास पोलिसांच्या माध्यमातून शक्य नाही, त्यामुळे याचा सीबीआय मार्फत तपास करावा अशी विनंती करमुसे यांनी केली होती. परंतु, आता याप्रकरणात आव्हाडांचे नावही सामील करण्यात आले आहे, शिवाय आरोपपत्रही दाखल झाले आहे, असे सांगून उच्च न्यायालयात हे प्रकरण गुंडाळण्यात आले. तिथे मनासारखे झाले नाही, त्यामुळे १४ ऑक्टोबरला करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी केलेल्या याचिकेत तथ्य असल्याचे मत झाल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून २५ नोव्हेंबरपासून याची सुनावणी सुरू होणार आहे. करमुसे यांच्या वतीने बर्धन भरुचा ही केस लढवित आहेत.

करमुसे यांच्या प्रकरणात आव्हाडांचा सहभाग सिद्ध करणारे नाकारता येणार नाही, असे दोन पुरावे उपलब्ध आहेत. ज्या वीरु वाघमारेच्या फोनवरून आव्हाड यांनी करमुसे यांच्या पत्नीला दमदाटी केली, तो संपूर्ण कॉल करमुसे यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. हा फोन बॅटरी संपत आल्यामुळे करमुसे घरी सोडून गेले होते. दुसरा पुरावा म्हणजे विवियाना मॉलच्या सीसीटीव्हीतून आव्हाडांचा बंगला स्पष्ट दिसतो. यात करमुसे यांना मारहाण करताना आव्हाड तिथे हजर असल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळी आपण जेवण करून झोपलो होतो, हा आव्हाडांचा दावा निकाली निघणार आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

कर्माची फळं कोणाला चुकत नाहीत. मारहाणीमुळे करमुसे यांच्या पाठीवर उठलेले वळ आजही लोकांच्या लक्षात आहेत. एका सामान्य व्यक्तीला सत्तेच्या मस्तीच चिरडण्याचा प्रय़त्न आव्हाडांनी केला. आपले कोण काय बिघडणार या धुंदीत त्यांनी हे पाप केले. परंतु सत्ता गेली, आता पोलिसही साथ देणार नाहीत. आव्हाडांचा हिशोब करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. आता कोर्टाच्या फेऱ्यानंतर तुरुंगाच्या कोठडीचा अंधार त्यांना चुकवता येणार नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा