पाहून मंदीर झळाळी, पुरोगामी तोंडे काळवंडली; धनवर्षेचे पाहूनी आकडे, पिसाळती लाल माकडे

अयोध्येतील भव्य मंदीरातील प्राण प्रतिष्ठेचा दिवस जवळ येतोय तस तसा डाव्यांचा पोटशूळ वाढतो आहे.

पाहून मंदीर झळाळी, पुरोगामी तोंडे काळवंडली; धनवर्षेचे पाहूनी आकडे, पिसाळती लाल माकडे

अयोध्येतील भव्य मंदीरातील प्राण प्रतिष्ठेचा दिवस जवळ येतोय तस तसा डाव्यांचा पोटशूळ वाढतो आहे. मंदिरासाठी जमा करण्यात आलेला पैसा देशातील लोकांना वाटला तर प्रत्येकाला किती मिळतील? कशाला ही पैशाची उधळपट्टी? हा पैसा गरिबांसाठी वापरता आला नसता का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना हा उत्सव का? असे अनेक सवाल डावे मनोरुग्ण तोंड वाकडं करून विचारतायत. परंतु, तीर्थक्षेत्र अयोध्या-वाराणसी-प्रयागराजला आलेली झळाळी आणि मंदिराच्या अफाट अर्थकारणाने, दमदार आकड्यांनी या बिनडोक तर्कांचे थोबाड फोडले आहे.

कुठेही काही चांगले, पवित्र आणि मंगलमय होत असेल तर तिथे येऊन तंगडं वर करायचं आणि अशकून करायचा, असा प्रकार देशातील लिब्रांडू सातत्याने करतायत. दिवाळीत फटाके फोडले तर यांना पोटदुखी होते. होळीत रंग उधळले तर त्रास होतो. थर्टी फर्स्टच्या आतषबाजीमुळे, दारुबाजीमुळे मात्र हेच लोक प्रचंड सुखावतात. रामासाठी कोणी धागे विणले तर यांची मळमळ सुरू होते, पण सांताला खांद्यावर घ्यायला मात्र हे तयार असतात. स्वत:च्या सणवारांना सुतक पाळायचं आणि दुसऱ्याच्या ताबूतांमध्ये मात्र कंबर मोडेपर्यंत नाचायचं. लोकाची वरात आणि गण्या नाचतोय जोरात, असा हा प्रकार.

बाबरी ढाचा हलवायला जी मंडळी प्रचंड विरोध करत होती, तो ढाचा कोसळल्यावर राम जन्मभूमीवर हॉस्पिटल बनवण्याची टूम यांनी काढली. ते पुरोगामी स्वप्न जागरुक हिंदू समाजामुळे पुरे होऊ शकले नाही, आता मंदिर निर्मितीवर होणाऱ्या खर्चाचे आकडे चिवळून रडारड करण्याचे काम ही मंडळी करतायत. हाताला काम नाही, पोटाला घास नाही, अशा परीस्थितीत सरकारने राम मंदीराचा घाट का घातला आहे? असा यांचा सवाल. अयोध्येत दिपोत्सवाचा सोहळा झाला तेव्हाही किती तेल वाया घालवले? या तेलात किती झोपड्यांतला अंधार दूर झाला असता, असे प्रलाप सुरू होतेच. मुळात त्या दिपोत्सवामुळे किती पणत्यांची निर्मिती झाली, किती हातांना काम मिळाले, किती लोकांच्या घरात पैसा गेला याची आकडेमोड कोण करणार?

या देशात सणांचे, मंदिरांचे स्वतंत्र अर्थकारण आहे. दिवाळीत लोक घरात रोषणाई करतात. सोनं नाणं, वाहन विकत घेतात. घरात रंगरंगोटी करतात. विचार करा किती लोकांना रोजगार मिळत असेल? किती घरांमध्ये पैसा येत असेल? हेच चित्र गणेशोत्सवात, नवरात्रीत, प्रत्येक सणवारात असते. परंतु, हे लक्षात न घेता, प्रत्येक सणवाराला हे उर बडवे नाट लावण्याचे काम न थकता करत असतात.

१३ डिसेंबर २०२१ मध्ये वाराणसीतील काशी कॉरिडोअरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ३३९ कोटी रुपये खर्च केले. या खर्चावरही टीका झाली होती. आज काशीचे काय चित्र आहे. कॉरिडोअर उद्घाटन सोहळ्या आधी २०२१ मध्ये वाराणसीत ३० लाख ७५ हजार ९१३ भारतीय पर्यटक आणि २ हजार ५६६ विदेशी पर्यटक आले होते. २०२२ हा आकडा एका वर्षात दहा पटीपेक्षा जास्त वाढला. ७.११ कोटी भारतीय आणि ८३ हजार ७४१ विदेशी पर्यटक काशीत आले. अयोद्धेचे चित्र वेगळे नाही. २०२१ मध्ये अयोध्येत १.५७ कोटी पर्यटक आले. २०२२ मध्ये हा आकडा २.३९ कोटी झाला. विदेशी पर्यटकांची संख्या १ हजार ४६५ होती.

काँग्रेसच्या काळात देशात फक्त ताजमहाल नावाची एकमेव वास्तू आहे, असा विदेशातील अनेकांचा समज होता. कारण राजकीय नेत्यांनी फक्त ताजमहालचे मार्केटींग केले होते. मोदी सरकारच्या काळात हे चित्र बदलले. २०२२ मध्ये गंगा, यमुना, सरस्वतीचा त्रिवेणी संगम असलेल्या प्रयागमध्ये आलेल्या भारतीयांची संख्या २.५५ कोटी होती. विदेशातून १ हजार ८९५ पर्यटक आले होते आणि ताजमहाल पाहायला आलेल्या पर्यटकांची संख्या ९१ लाख २४ हजार ६९९ होती. त्यात विदेशी पर्यटक ३ लाख ४५ हजार ९९८ होते.

पर्यटक आल्यावर विमान कंपन्या, रेल्वे, हॉटेल, लॉज, दुकानं, रिक्षा, टॅक्सी, हार-फुलाचा व्यवसाय करणारे, चहाची टपरी चालवणारे, फेरीवाले सगळ्यांचा धंदा होता. प्रत्येकाच्या खिशात पैसे जातात. या लाभार्थ्यांमध्ये बरेच गोरगरीब लोक असतात, ज्यांच्या नावाने बिनडोक पुरोगामी रुदाल्या गळा काढत असतात.

हे ही वाचा:

२२ जानेवारीला घराघरात दिवे लावा! दिवाळी साजरी करा!

दहशतवादी हाफिज सईदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान सरसावले!

नौदल अधिकाऱ्यांच्या वर्दीवर शिवमुद्रा; नवे स्कंधचिन्ह जाहीर!

‘इस्रायल-हमासचे युद्ध पंतप्रधान मोदीच थांबवू शकतात’

देश स्वतंत्र झाल्यानंतर महात्मा गांधी एकदा काशीत आले होते. इथली अव्यवस्था आणि अस्वच्छता पाहून ते प्रचंड निराश झाले होते. हे स्वच्छतेचे हे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षात घेतले. पंतप्रधान पदाची सूत्र हाती आल्या आल्या स्वच्छ भारत मोहीमेची अंमलबजावणी सुरू केली. तीर्थस्थळांचा विकास सुरू केला. काशी कॉरिडोअर, उजैन कॉरिडोअर, अयोध्येतील भव्य मंदीराची निर्मितीचे काम सुरू झाले. मथुरेबाबतही असा रोडमॅप तयार आहे. याचा थेट परिणाम अर्थकारणावर होतो आहे. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर इथे पर्यटकांची गर्दी वाढणार हे लक्षात घेऊन अयोध्येचा विस्तार करण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. २०३० पर्यंत अयोध्येत ६ कोटी ८० लाख पर्यटक भेट देतील असा अंदाज आहे. त्या दृष्टीने त्यांची उत्तम व्यवस्था व्हावी या दृष्टीने योगी सरकार युद्ध पातळीवर सज्जता करते आहे.

१५०० एकर परिसरात नव अयोध्या हे वैदिक शहर वसवण्यात येत आहे. इथे काही देशांसाठी गेस्ट हाऊसच्या इमारती उभारण्यात येतील. अनेक धार्मिक संस्था, मठ, पंथांना भक्त निवासासाठी शंभरावर भूखंड देऊ करण्यात आले आहेत. अयोध्येत महर्षी वाल्मिकी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अयोध्या धाम हे रेल्वे स्थानकही अत्यंत भव्य असेल.

यंदाच्या वर्षी एक नवा ट्रेंड दिसून आला आहे. नव वर्षानिमित्त पर्यटक मोठ्या संख्येने गोवा, केरळ किंवा मलेशिया, सिंगापूर सारख्या देशांत जातात. परंतु, यंदा पर्यटकांचा मोठा ओघ अयोध्या, प्रयागराज, वाराणसी, लखनौकडे वळलेला दिसतो. २०२४ च्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी पर्यटनसंबंधी उद्योगाची उलाढाल दीडशे कोटीच्या वर होणार आहे.
केरळ, तामिळानाडू, तेलंगणा, आंध्र, कर्नाटक या राज्यांतून अयोध्या, वाराणसी आणि प्रयाग दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत. महाराष्ट्र, प.बंगालमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

पाच दिवसांच्या छोटेखानी पर्यटनासाठी येणारा पर्यटक किमान १५ हजार रुपये खर्च करतो असे गृहीत धरले तर धार्मिक पर्यटनासाठी या क्षेत्रावर किती धनवर्षा होईल, किती लोकांना काम मिळेल, किती घरात पैसे जातील याची कल्पना करा. बेरोजगारीच्या नावाने उर बडवणाऱ्यांनी ही आकडेवारी लक्षात घ्यावी. विनाकारण नाक कापून अवलक्षण करण्याचा प्रयत्न करू नये.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version