24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयपवारांची यादी अकबरला मिळाली, अमरच्या यादीचे काय?

पवारांची यादी अकबरला मिळाली, अमरच्या यादीचे काय?

पवारांना सक्तीची विश्रांती देण्याची गरज आहे.

Google News Follow

Related

देशात काँग्रेसची इको सिस्टीम आहे, महाराष्ट्रात हीच इको सिस्टीम पवारांची इको सिस्टीम म्हणून ओळखली जाते. पक्ष आणि संघटनेपेक्षा या इको सिस्टीमवर पवारांचा जास्त विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीत हमखास विजय मिळेल, अशा २५ मतदार संघांची यादी पवारांनी सज्जाद नोमानी याला पाठवली आहे. हा नोमानी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा प्रवक्ता होता. बामसेफसोबत त्याने समान नागरी कायद्याच्या विरोधात मोठी मोहीम चालवली होती. पवारांनी त्याला पाठवलेल्या यादीचा भांडाफोड भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला. नोमानी यांचे सहकारी, मनोज जरांगे यांना पवारांनी अशीच काही
यादी पाठवली आहे काय, याच्या शोधात सध्या भाजपाचे नेते आहेत.

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सहभागी होणार नाही, असा पळपुटा निर्णय जाहीर करण्यापूर्वी सज्जाद नोमानी, मनोज जरांगे आणि आनंदराज आंबेडकर यांची अमर, अकबर, एन्थनी स्टाईल पत्रकार परिषद झाली होती. त्यावर आम्ही सविस्तर भाष्य केलेले आहे. महाराष्ट्रातील सगळे अकबर शरद पवारांशी संधान बांधून आहेत, कारण पवार हेच अजीम ओ शान जिल्हे इलाही आहेत याबाबत त्या सर्वांना खात्री आहे. ‘आम्ही मुस्लिमांमुळे सत्तेवर आलो’, हे विधान शरद पवारांनी २०२० मध्ये अलिबाग मध्ये झालेल्या पक्षाच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात केले होते. त्याचेच पांग फेडण्यासाठी ‘वक्फ बोर्ड की जमीन पर अल्लाह का मालिकाना हक है, इस जमीन का एक इंच तुकडा भी हम केंद्र सरकार या उनके चमको को लेने नही देंगे’, असे होर्डिंग राष्ट्रवादी शपने ठिकठिकाणी लावले होते.

छोट्या पडद्यावर ऐतिहासिक भूमिका करणारा पवारांच्या पक्षातील एक नटही यात मागे नव्हता. केंद्र सरकारने वक्फ सुधारणा कायदा संसदेत मांडल्यानंतर पवारांना पेटवापेटवीची आयती संधी मिळाली होती ती पवारांनी साधली. शरद पवार यांच्या तोंडी, लोकशाही, संविधान, हे शब्द वारंवार ऐकू येत असले तरी त्यांचा संविधानापेक्षा जास्त विश्वास अल्ला आणि शरीयावर असतो. किंबहुना तो असल्याचा देखावा तरी ते वारंवार करत असतात. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या ट्रिपल तलाक, बुरखा, हिजाबची जाहीरपणे तळी उचलत असतात. अजून तरी त्यांनी हलाला, खतनाचे समर्थन केलेले नाही, परंतु तसे करायला त्यांची काही हरकत असेल असे वाटत नाही. वक्फच्या समर्थनार्थ लावलेल्या या होर्डिंगमुळे पवारांच्या पक्षाची तुष्टीकरणाची, मत चाटुकारितेची भूमिका पुन्हा एकदा समोर आली.

पवारांचे थेट तसे आदेश गेले असल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी समोर आणली ती एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून. नोमानी यांना शरद पवारांनी २५ मतदार संघांची यादी पाठवली असल्याचा गौप्यस्फोट चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ या कधी काळी पवारांच्या पक्षात होत्या. त्यांनी पवारांचा चेहरा आणि त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे अगदी जवळून पाहिलेली आहे. त्या धोरणांच्या धुरळ्यात जीव गुदमरल्यामुळेच त्या भाजपामध्ये आल्या. जुन्या ऋणानुबंधांमुळे ही गोपनीय माहिती त्यांच्या हाती लागली असण्याची शक्यता आहे.

कट्टरतावाद्यांचे ध्रुवीकरण हे पवारांच्या दृष्टीने सत्तेच्या दिशेने टाकलेले पहिले प्रभावी पाऊल असते. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी हा तुरुपाचा पत्ता अगदी व्यवस्थित वापरला होता. त्यामुळे ते विधानसभेत तो पत्ता वापरणार हे अपेक्षित होते. आता प्रश्न एवढाच उरतो की, एक यादी जर अकबरला पाठवली आहे तर दुसरी यादी जरांगे अर्थात पत्रकार परिषदेतील अमरलाही पाठवली असणार. पहिली याची हक्काच्या मतपेढीच्या आधारे कुणाला जिंकवायचे याची आणि दुसरी यादी आपल्या कळसुत्री बाहुल्याच्या आधारे कुणाला पाडायचे याची. जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेताना गनिमी काव्याचा उल्लेख केला होता. तो गनिमी कावा हाच असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

बीड मतदार संघात पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी जसे बैठकांचे सत्र घेण्यात आले तसेच प्रयोग मराठवाड्यासह अनेक मतदार संघात होणार आहेत. चित्रा वाघ यांनी त्या यादीचाही शोध घ्यावा. कदाचित ती यादीही त्यांच्या हाती येऊ शकेल.
सुदैवाने महाराष्ट्रावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा जबर प्रभाव पडलेला आहे. आपल्यासमोर एक एकवटलेली मतपेढी आहे, याची जाणीव हिंदू मतदारांना झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या
काळात दाखवलेले शैथिल्य त्यांच्याकडून दाखवले जाणार नाही. जर असे शैथिल्य आणि नैराश्य दाखवले तर वक्फ बोर्ड उद्या आपल्या घरावर इमारतीवर, शेतावर, मंदिरावर दावा केल्याशिवाय राहणार नाही. जाहीर केलेल्या निवृत्तीपूर्वी
हिंदुत्ववाद्यांवर बुलडोजर चालवण्याचे काम पवार करतील यात हिंदूंच्या मनात तरी कोणतीही शंका नाही. हे टाळायचे असेल तर पवारांना सक्तीची विश्रांती देण्याची गरज आहे, ही खुणगाठ आता त्यांनीही बांधलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा