हिंदूविरोधी काँग्रेस सरकारचा प्रताप!

हिंदूविरोधी काँग्रेस सरकारचा प्रताप!

आपल्या हिंदुस्थानात हिंदू असुरक्षित आहेत, हिंदूंची देवही असुरक्षित आहेत असे म्हटले तर आश्चर्य वाटेल. मात्र ही गोष्ट खरी आहे. अहो आता आपल्या देवांना आता पोलिसांनीच कैद केले आहे. हे पोलीस बनले आहेत काँग्रेस सरकारचे गुलाम. गुलामाप्रमाणे वागणाऱ्या या पोलिसांचे कृत्य तमाम हिंदूंना चीड आणणारे आहे. गोष्ट आहे कार्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातली. मंड्या जिल्ह्यात नागमंगला या गावात कट्टरपंथी जमावाने हिंदुवर केलेल्या हल्यानंतर तिथे आता श्री गणरायाची मूर्ती पोलिसांच्या मोटारीत ठेवल्याचे चित्र समोर आले आहे. समाज माध्यमावर प्रचंड प्रमाणावर हे छायाचित्र व्हायरल झाले आहे. यावर जोरदार टीका सुद्धा होऊ लागली आहे.

ज्या कर्नाटक राज्यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार आहे, त्या राज्यात हिंदू आणि हिंदूंची श्रद्धास्थाने सुरक्षित नाहीत असे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर कट्टरपंथी जमावाने मांड्यात अक्षरशः धिंगाणा घातला होता. भगवान गणेशाच्या मूर्तीवर दगडफेक करण्याचे धाडस त्यांनी केले होते. त्यानंतर शुक्रवारी गणरायाची मूर्ती थेट पोलिसांच्या वाहनात कैद असल्याचे छायाचित्र समाज माध्यमात व्हायरल झाले. म्हणजे आपल्या देवाला देवघरात बसवण्याऐवजी हे कॉंग्रेसचे सरकार देवाला पोलिसांच्या मोटारीत कैद करत आहे, हे वास्तव पाहिल्यानंतर तळ पायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. मंड्या जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलोरमध्ये निषेध करण्यात आला. हा निषेध सुरु असताना पोलिसांनी गणपतीची मूर्तीच जप्त केली. केवळ एवढेच नाही तर कर्नाटक पोलिसांनी परवानगीशिवाय निषेधाचे आंदोलन केल्याबद्दल तब्बल ४० हिंदुना अटक केली. हे जे आंदोलन होते ते बंगळूरू महानगर गणेश उत्सव समितीने आयोजित केले होते. यावेळी कॉंग्रेसचे गुलाम झालेल्या पोलिसांनी हिंदू आंदोलकाकडून गणेशमूर्ती काढून घेतल्या. आणि त्या जाळीबंद मोटारीत ठेवल्या.

जिहादींचे लांगुनचालन करणाऱ्या नेत्याच्या पक्षाकडून यापेक्षा वेगळी काय अपेक्षा असणार. कर्नाटकमध्ये जेव्हापासून कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले आहे तेव्हापासून तिथे एनकेन प्रकार हिंदूच टार्गेट होत आहेत. सत्तेच्या मस्तीत बेधुंद असलेल्या या सरकारला आपण कुणाला कुरवाळत आहोत आणि त्याचे काय परिणाम होत आहेत, याची थोडीशीसुद्धा जाणीव नाही. त्यामुळेच असे प्रकार फोफावत आहेत. या घटनेवर मात्र कॉंग्रेसचा एक नेता कुठे काही बोलला आहे, असे आढळून आलेले नाही. अहो, हा हिंदुस्थान आहे. इथे बहुसंख्य हिंदू रहातात. हिंदू सहिष्णू म्हणून हिंदुवर अत्याचार करायचे आणि आता तर हिंदूंच्या देवाला देवघरात न ठेवता पोलिसांच्या कैदेत? हा कुठला प्रकार? याचे उत्तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी खरे तर देशाला देण्याची गरज आहे. देशाची बदनामी परदेशात जाऊन करणाऱ्या राहुल गांधी यांनी आधी आपल्या पक्षाचे राज्य असलेल्या राज्यात काय पद्धतीचा धिंगाणा सुरु आहे, त्याकडे आधी लक्ष देण्याची गरज आहे. मात्र आपल ठेवायचं झाकून म्हटल्याप्रमाणे देशाची बदनामी मात्र करण्यात पटाईत. बाहेरच्या देशात जाऊन युवराजांचे हे उद्योग सुरू आहेत. मताच्या लाचारीसाठी आपले देव सुद्धा सुरक्षित राहिले नाहीत तरी चालतील मात्र सत्ता आपल्याच हातात राहिले पाहिजे या प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखे उचलून बाहेर काढण्याची वेळ आली आहे.

लोकसभा निवडणुकीत कुरवाळून कुरवाळून मते मिळवली त्यानंतर वाढलेला हा उन्माद आहे, याची जाणीव देशातील हिंदूंनी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. राजकारण करता येईल. सत्ता येते जाते पण हे जे सध्या सुरु आहे, याचे दीर्घकालीन वाईट परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागणार आहेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. ही जी चूळबुळ आहे ती थांबवलीच पाहिजे. का होतात असे हल्ले? असे हल्ले करण्याचे धाडस का निर्माण होते? जेव्हा आपल्याला वाचवायला कोणीतरी सत्तेत बसले आहे, याची खात्री असते तेव्हाच असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे मंड्या जिल्ह्यात हा प्रकार घडला. धिंगाणा घालणाऱ्या लोकांना शिक्षा करून पुन्हा असे प्रकार घडू नयेत याची काळजी घेणे अपेक्षित असताना घटनेचा लोकशाही मार्गाने निषेध करणाऱ्या हिंदुना अटक करण्याचे पाप कर्नाटकच्या कॉंग्रेस सरकारने केले आहे. का तर आंदोलनाला परवानगी घेतली नाही. हा न्याय सध्या कॉंग्रेस शासित राज्यात हिंदूंच्या बाबतीत होत आहे, आणि त्याचे कारण म्हणजे एक गठ्ठा होणाऱ्या मताचे दान.

हे ही वाचा:

श्रीगणेश देखाव्यांची ‘सेंच्युरी’

पत्रकार आशुतोष आणि प्रोफेसर आनंद रंगनाथन चर्चेदरम्यान एकमेकांना भिडले

कर्नाटकात ‘गणपती’ला पोलिस व्हॅनमध्ये कोंडले

गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची सांगत वकिलाला लुटणारा सापडला सिंधुदुर्गात

हा सगळा प्रकार एकीकडे असताना आता राज्यात किमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा निषेध करायला हवा. त्यांनी राहुल गांधीना खडेबोल सुनवायला हवेत. कॉंग्रेस शासित राज्यात जर हिंदूंचे सण उत्सव धोक्यात येत असतील तर इथे कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, असा पवित्रा त्यांनी खर तर घ्यायला हवा. बुधवारी हा प्रकार घडला मात्र रोज पत्रकार परीषदेचे रतीब घालणाऱ्या संजय राउतांनी सुद्धा याचा साधा निषेध नोंदवला नाही. एखादे ट्विट सुद्धा केले नाही. मोहोब्बत की दुकान, मोहोब्बत की दुकान म्हणून देशभर फिरून काय केले तर आपलेच सरकार असलेल्या राज्यात मोहोब्बत शिल्लक ठेवायचीच नाही अशा प्रवृत्तींना खतपाणी घालायचे काम कारण्यात येत आहे. याला चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

Exit mobile version