भारतातील मुस्लीमांनी काँग्रेस आणि इंडी आघाडीला एक गठ्ठा मतदान करूनही देशात भाजपाची सत्ता आली. काँग्रेसची परीस्थिती सुधारली तरीही त्यांना विरोधातच बसावे लागले. तेच चित्र ब्रिटनमध्ये पाहायला मिळाले. ब्रिटनमध्ये सत्ताधारी कन्झर्वेटीव्ह पार्टीचा पराभव करून लेबर पार्टी पूर्ण बहुमत घेऊन सत्तेत आली. कन्झर्वेटीव्ह पार्टीला मुस्लीम मतदारांचे समर्थन मिळाले. जिथे या पक्षाचे फारसे बळ नाही तिथे लेबर पार्टीच्या विरोधात मजबूतीने लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला मुस्लीमांनी साथ दिली, तरीही लेबर पार्टीला सत्तेत येण्यापासून ते रोखू शकले नाहीत.
जगभरात विखुरलेल्या मुस्लीम समाजाचे मानस एकच आहे. त्यांना लोकशाही, सोयीसुविधा याच्याशी काहीही देणे घेणे नाही. त्यांना लोकसंख्येच्या बळावर जगभरात आपली सत्ता स्थापन करायची आहे. त्यासाठी जगभरातील मुस्लीम मग तो कोणत्याही देशाचा असो, स्ट्रेटेजिक मतदान करतो. त्यामागे निव्वळ धार्मिक प्रेरणा असतात, कट्टरवादी मुल्ला मौलवींचे मार्गदर्शन असते. हे मतदान एका पक्षाच्या विरोधात असते. भारतात हे मतदान भाजपा आणि त्याच्या मित्र पक्षाच्या विरोधात करण्यात आले होते.
गेल्या १० वर्षाच्या कार्यकाळात भाजपाने अयोध्येत राम मंदिराची निर्मिती केली. काशी कॉरीडोर बनवला. काशीतील ज्ञानवापी मशीदीच्या जागेवर, मथुरेतील कृष्ण जन्मभूमीच्या जागेवर भव्य मंदिर निर्माण होईल, अशी पावले टाकली. फाळणीनंतर नरकप्राय जीवन जगणाऱ्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून सीएए कायदा केला. देशात समान नागरी कायदा आणू अशी घोषणा केली. देशात बहुसंख्य असून दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून जगणाऱ्या हिंदू समाजाला त्यांच्या हक्काचे जे काही आहे ते मिळावे, असे काम केले. नेमकी हीच गोष्ट मुस्लीम नेतृत्वाला खूपली आणि त्यांनी हिंदू सबलीकरणाचा अजेंडा राबवणाऱ्या भाजपाला पराभूत करण्यासाठी मतदान केले.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे मुस्लीम व्होट बँक नावाचा घटक देशाच्या राजकारणात अडगळीत फेकला गेला होता. तो पुन्हा जिवंत करण्यासाठी भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्याचा प्रयत्न झाला. भाजपा आघाडीच्या विरोधात असलेला उमेदवार चांगला की वाईट, स्त्री कि पुरुष, त्याचा धर्म, जात, पंथ आणि पक्ष कोणता, यापैकी कोणत्याही मुद्द्याला महत्व न देता मुस्लीमांनी मतदान केले. परंतु, एक गठ्ठा मुस्लीम मतदानानंतरही भाजपाला सत्तेवर येण्यापासून त्यांना रोखता आले नाही. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले.
जी स्ट्रेटेजी मुस्लीम मतदारांनी भाजपाच्या विरोधात वापरली तिच लेबर पार्टीच्या विरोधात वापरण्यात आली. फरक एवढाच होता की लेबर पार्टी विरोधात होती आणि भाजपा सत्ताधारी पक्ष होता. लेबर पार्टीने हिंदुत्ववादी प्रतिमा असलेल्या अनेक उमेदवारांना मैदानात उतरवले होते. शिवानी राजा, गगन मोहींदरा, नवेंदु मिश्रा, कनिष्क नारायण आदी भारतीय वंशाच्या उमेदवारांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. यातील अनेकांनी बाजी मारली. ब्रिटनमध्ये वाढत चाललेल्या हिंदू फोबियाच्या विरोधात पावले उचलण्याचा संकल्प सोडला होता. लेबर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार किर स्टारमर यांनी काही हिंदुत्ववादी संघटनांनी जाहीर केलेल्या हिंदू मेनिफेस्टोतील मागण्यांचे समर्थन केले होते.
हे ही वाचा:
पुण्यात महिला वाहतूक पोलीसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न
‘सनातन’वरील पुस्तक शुभशकून ठरला!
तामिळनाडू बसपाच्या प्रदेशाध्यक्षांची धारदार शस्त्राने हत्या
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना क्लीनचीट
ऋषी सुनक हे जरी भारतीय वंशाचे असले तरी त्यांची धोरणे मात्र हिंदूविरोधी होती. भारतीय वंशाच्या पुजाऱ्यांना व्हीसा न देण्याचे धोरण त्यांनी जारी केले होते. त्यामुळे अनेक मंदिरे बंद पडली होती. ब्रिटनमध्य हिंदू लोकसंख्या ३ टक्के असली तरी जीडीपीमध्ये त्यांचा वाटा ६ टक्के आहे. थोडक्यात ब्रिटनच्या अर्थकारणावर आणि राजकारणावर हिंदूंचा ठसा त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिक गडद आहे. सुनक एका बाजूला हिंदूविरोधी धोरणे राबवित होते. दुसऱ्या बाजूला आक्रमक झालेल्या पॅलेस्टाईन समर्थकांसमोर त्यांनी बोटचेपे धोरण स्वीकारले होते. ब्रिटीश पोलिस पॅलेस्टाईन समर्थक असल्याचा आरोप करणाऱ्या त्यांच्याच सरकारमधील गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना त्यांनी पदावरून हटवले होते. यंदाच्या निवडणुकीत ब्रेव्हरमन यांचा विजय झाला. याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांनी जी भूमिका मांडली ती मतदारांना मान्य होती.
लेबर पक्षाचे नेते किर स्टारमर यांनी गाझामधील युद्ध थांबले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. परंतु, मुस्लीमांना खूष करण्यासाठी ती पुरेशी नव्हती. जसे भारतात एखादा पक्ष मुस्लीमांचे भले करतो आहे, एवढे पुरेसे नसते. त्या पक्षाची धोरणे हिंदूविरोधी असणे अपरीहार्य असते. स्टारमर यांनी इस्त्रायललाही आत्मरक्षेचा अधिकार आहे, असे मत मांडले होते. त्यामुळे मुस्लीम मतदार नाराज झाला होता. त्याचा फटका बसून चार जागांवर गाझा समर्थक उमेदवार लेबर पार्टीच्या उमेदवारांना पराभूत करून विजयी झाली. लीसेस्टर ईस्ट, बेंटली, डयुसबरी, ब्लॅकबर्न या जागांवर लेबर पार्टीच्या उमेदवारांचा पराभव झाला. जिथे मुस्लीम मतदारांचा टक्का १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे लेबर पार्टीच्या मतांचा टक्काही साधारण तेवढाच कमी झाला.
भारत आणि ब्रिटनमध्ये मुस्लीमांचे एक गठ्ठा मतदान ज्या पक्षाला झाले तो पक्ष सत्तेवर आला नाही. मुस्लीम मतदारांच्या रणनीतीचा दुसऱ्यांदा पराभव झाला. भारतातील सत्ताधारी पक्षाला मुस्लीमांची मते मिळालेली नाहीत, ब्रिटनमध्येही हीच परीस्थिती आहे. हा फॅक्टर त्या पक्षांच्या मुस्लीमांबाबत भूमिकेवर किती परिणाम करतो हे येणारा काळच ठरवेल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)