25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरसंपादकीयमालेगावात १२५ कोटींचे इंधन आले कुठून?

मालेगावात १२५ कोटींचे इंधन आले कुठून?

पाकिस्तान आणि आखाती देशात बसलेल्या देशबुडव्यांचा यात निश्चितपणे सहभाग आहे.

Google News Follow

Related

येन केन प्रकारेण महाराष्ट्र जिंकण्यासाठी काही शक्ती कामाला लागलेल्या आहेत. साम, दाम, दंड, भेद कोणत्याही मार्गाचे त्यांना वावडे नाही. एकगठ्ठा मतांसाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, ऑल इंडीया उलेमा कौन्सिल सारख्या संघटनांनी मविआशी डील केलेले आहे. दुसऱ्या बाजूला पैशाच्या राशी ओतण्यात येत आहेत. मालेगावात बँक खात्याच्या माध्यमातून १२५
कोटीची देवाणघेवाण झाल्याचे उघड झाले आहे. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे गेल्या काही दिवसात मालेगावात अडीचशे कोटी रुपयांचे हवाला व्यवहार झाले आहेत. हा पैसा विदेशातून ओतण्यात येत आहे. अर्थ स्पष्ट आहे की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत विदेशी शक्तींचा उघड हस्तक्षेप आखातातून आल्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र हे देशात आर्थिकदृष्ट्या अव्वल क्रमांकाचे राज्य आहे. निवडणुकांचा धुरळा इथे वातावरण तापवतोय. पैशाचे मोठ्या प्रमाणात वाटप सुरू आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी मविआला पत्रकार परीषद घेऊन पाठींबा जाहीर केला. हा उघड उघड वोट जिहादचा मामला आहे. पाठिंब्याची आणि मतांची देवाण घेवाण फक्त आश्वासनांच्या आधारावर झालेली नसावी. पैशाची पेरणीही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. हा पैसा मुस्लीम मतांचे ठेकेदार असलेल्या मौलवी, उलेमांसोबत मुस्लीम मतांवर पकड असलेल्या गल्लाबोळीतील माफियांपर्यंत पोहोचवला जाईल ही शक्यता नाकारता येत नाही. मालेगाव ही निव्वळ झलक आहे. ईडी, इनकम टॅक्स आदी केंद्रीय संस्था या प्रकरणात उतरल्या असल्यामुळे याबाबत लवकरच खुलासा अपेक्षित आहे.

निवडणूक आय़ोगाची भरारी पथके बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली जाते आहे. कुलाब्यात १ नोव्हेंबर रोजी ९ कोटी रुपये मूल्य असलेले डॉलर्स जप्त करण्यात आले. विक्रोळीत सहा टन वजनी चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या. रोकड, सोन्या-चांदीचे दागिनेही अनेक ठिकाणी जप्त करण्यात आले आहेत. मालेगावात जे काही घडले आहे ते मात्र या सगळ्या प्रकारावर कडी आहे, असे म्हणता येईल. हा पैसा एका व्यापक षडयंत्राचा भाग असण्याची दाट शक्यता आहे. दोन नंबरच्या कामांसाठी जगभरात हवालाचा सर्रास वापर होतो आहे. एका फोन कॉलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जगात इथून तिथे पाठवले जातात. त्यात आता क्रिप्टो करन्सीची भर पडलेली आहे. हा पैसा दोन नंबरच्या कामांसाठी, दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो.

ईस्त्रायलमध्ये ७ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या हल्ल्यासाठी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून १३० दशलक्ष अमेरीकी डॉलर्स
जमवण्यात आले होते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या वोट जिहादला बळ देण्यासाठी जर हवालाच्या माध्यमातून पैसा येतो आहे. सोबत क्रिप्टो करन्सीचा वापरही झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एकट्या मालेगावमध्ये जर हवालाचे अडीचशे कोटीचे व्यवहार झाले असतील तर महाराष्ट्रात हे प्रमाण किती असेल याची कल्पना केलेली बरी.

मालेगावातील सिराज मोहम्मद हारुन मेमन हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. याची सविस्तर कुंडली बाहेर यायची आहे, परंतु जी माहिती समोर आली ती पाहाता, सिराज हा अतिसामान्य व्यक्ति आहे. मालेगावात तो कोल्ड्रींक एजन्सी चालवतो. त्याची उलाढाल जेमतेम लाखांतही नाही. त्यामुळे त्याने वाटलेला पैसा त्याचा नाही हे निश्चित. हवालाच्या माध्यमातून आलेला हा पैसा कोणाचा? एखादा माफीया, नेता की राजकीय पक्ष या पैशाचा स्त्रोत आहे, याबाबत आता चौकशी सुरू आहे. सिराजच्या डोक्यावर कोणाचा हात आहे हे उघड होणे गरजेचे आहे. त्यातून महाराष्ट्रातील वोट जिहादच्या सूत्रधाराचा चेहरा समोर येऊ शकतो. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या भानगडीचा गौप्यस्फोट केला. मालेगाव पोलिस ठाण्यात त्यांच्याच प्रयत्नांमुळे एफआयआर दाखल झाला.

मालेगाव बाजार समितीत नोकरी देतो असे आश्वासन देऊन सिराजने १२ जणांना गळाला लावले. त्यांचे आधार कार्ड घेऊन एका को-ऑप बँकेत खाती उघडली. या खात्यांच्या माध्यमातून १२५ कोटी अनेकांपर्यंत पोहोचवले, असा हा मामला आहे. हे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे असल्याची बतावणी सिराजने खातेधारकांना केली होती. याप्रकरणी सिराज आणि बँकेचा कर्मचारी दिपक निकम याच्याविरोधात मालेगावात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडी, आय़कर विभाग, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वाशी ठाणे, मालेगाव, नाशिक, सुरत अहमदाबादेत सुमारे २४ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.

हे ही वाचा:

काँग्रेस पक्ष सरकार स्थापनेसाठी विकासावर नाही तर विभाजनावर अवलंबून

झारखंडमध्ये काँग्रेस घुसखोरांनाही देणार गॅस!

डॉमिनिका देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च सन्मान!

एनआयएकडून गैर-स्थानिकांच्या हत्येमधील दहशतवाद्याची मालमत्ता जप्त

भारतातील हवाला आणि क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारावर बंदी घातलेल्या पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयची बऱ्या पैकी पकड होती. कारण या सौद्यावर अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तानच्या आयएसआयचा पगडा आहे. पीएफआयवर बंदी आणल्या नंतर हे नियंत्रण आखातीत आयएसआयच्या निगराणी खाली कार्यरत असलेल्या केआयएसएफ या संघटनेकडे गेले. दहशतवादी कारवायांसाठी भारतात जकातच्या माध्यमातून जो पैसा गोळा केला जातो तो क्रिप्टो करन्सीत रुपांतरीत केला जातो. त्यानंतर त्याचा माग काढणे कठीण होऊन बसते.

मालेगावात सिराजच्या माध्यमातून जे १२५ कोटी बँक खात्यांच्या माध्यमातून वाटले गेले, त्याचा छडा लावण्याचे काम सुरू आहे. परंतु हवालाच्या माध्यमातून आलेल्या २५० कोटी रुपयांचे काय झाले हा प्रश्न मात्र सध्या तरी अनुत्तरीत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये हवालाचा पैसा येतो आहे, याचा अर्थ यात माफीया दाऊदच्या नियंत्रणात असलेले मुंबई अंडरवर्ल्ड, आयएसआय अर्थात पाकिस्तान आणि आखाती देशात बसलेल्या देशबुडव्यांचा निश्चितपणे सहभाग आहे. कोणासाठी या उठाठेवी चालल्या आहेत, हे समजणे फार कठीण नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा