श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचा पुण्यतिथी महोत्सव

१३ ते २५ एप्रिल होणार विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचा पुण्यतिथी महोत्सव

श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या १४७व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून १३ ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने अक्कलकोटमध्ये करण्यात येणार आहे.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट आयोजित या महोत्सवात १३ ते २५ एप्रिल या कालावधीत धर्मसंकीर्तनाचे आयोजन होत आहे. २६ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांची पुण्यतिथी असेल त्याआधी हा महोत्सव होईल. त्यानिमित्त नित्य अनुष्ठान व धर्मसंकीर्तन होईल. नामस्मरण, काकडआरती, अखंड नामवीणा सप्ताह, गुरुलीलामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण, भजन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पश्चिम बंगाल: अनेक जिल्हे हिंदूमुक्त करण्याचे षड्यंत्र!

चिदंबरम यांनीच नष्ट केला होता, २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा

तहव्वूर राणाला मोदी सरकारने फरफटत आणले, काँग्रेस मात्र राणाच्या प्रेमात!

बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे १०२ जणांचा मृत्यू!

१३ ते २७ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याअंतर्गत कीर्तन, भक्ती संगीत, नृत्याविष्कार, प्रवचन, दर्शन, प्रसाद, पालखी सोहळा असा कार्यक्रम असेल. २६ एप्रिलला पुण्यतिथी असेल तर २७ एप्रिलला गोपाळकालाचे आयोजन केले जाईल.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश कल्याणराव इंगळे यांनी या कार्यक्रमाविषयीची माहिती दिली.

Exit mobile version