बाळासाहेबांच्या नावावर हडपलेल्या महापौर बंगल्यात बिल्डरांची गर्दी होते ते कसे चालते?

बाळासाहेबांच्या नावावर हडपलेल्या महापौर बंगल्यात बिल्डरांची गर्दी होते ते कसे चालते?

राज ठाकरे यांनी विचारला खणखणीत सवाल

दुसरी लाट, तिसरी लाट येईल अशी भीती निर्माण केली जात आहे. पण सगळ्या गोष्टी तर सुरू आहेत. पण मंदिरात मात्र जायचे नाही. कुठूनही गर्दी कमी झालेली तुम्हाला दिसते का? पूर्वीच्या महापौर बंगल्यावर, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर हडप केलेल्या त्या बंगल्यावरती बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून कामे करून घेण्यासाठी येणाऱ्या या गाड्या कमी झाल्या नाहीत. मग फक्त सणांवरच तुम्ही कसे काय येता? असा खणखणीत सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला विचारला.

विविध मुद्द्यांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले.

केंद्र सरकारने खबरदारी घ्यायला सांगितली आहे म्हणून ती घेतली जात आहे असा मुद्दा उपस्थित केल्यावर राज ठाकरे म्हणाले की, बाकीच्या राज्यांचे काय? सण आला की लॉकडाउन, तेव्हा कोरोना पसरतो का? यांना जे हवं ते सुरू बाकी बंद. असे कसे चालेल? हे सगळं सूडबुद्धीने सुरू आहे. विरोधी पक्षात असते तर काय केले असते. मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. सगळ्यांना एकच नियम लावा. प्रत्येकाला वेगळे नियम कसे?

हे ही वाचा:

सिंहराज अधानाने मिळवले कांस्य पदक

चाळीसगावात पूरस्थिती, कन्नड घाटात कोसळली दरड

‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

तिसरी लाट येईल असे म्हटले जात आहे, त्यावर आपले काय म्हणणे आहे, यावर राज ठाकरे म्हणाले की, समुद्र आहे का लाटा यायला? आधी कधी या देशात रोगराई आलीच नव्हती जणू असे वागत आहेत हे लोक. उगाच इमारती सील करायच्या. हे सगळे निवडणुकीसाठी चालले आहे. स्वतःची आखणी होईपर्यंत सगळे बंद ठेवायचे मग अचानक निवडणुका जाहीर करायच्या.

Exit mobile version