पंतप्रधान मोदींनी शेअर केला लतादीदींचा शेवटचा श्लोक

पंतप्रधान मोदींनी शेअर केला लतादीदींचा शेवटचा श्लोक

सध्या संपूर्ण देश राममय झाला असून अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार असून त्यात अनेक नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्वांना आमंत्रण पाठविण्याचे काम सध्या सुरू आहे. अशातच नरेंद्र मोदी यांनी दिवंगत भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांची आठवण काढली आहे. त्यांनी लता दीदींनी गायलेल्या शेवटच्या श्लोकाचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर ट्विट करून लिहिले आहे की, “आपला देश २२ जानेवारीची मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहे. पण या सोहळ्याला एक व्यक्ती नसेल ती म्हणजे आमच्या लाडक्या लता दीदी. त्यांनी गायलेला एक श्लोक इथे देत आहे. त्यांच्या कुटुंबाने मला सांगितले की त्यांनी रेकॉर्ड केलेला हा शेवटचा श्लोक होता.” लता मंगेशकर यांनी रेकॉर्ड केलेला शेवटचा श्लोक म्हणजे ‘श्री रामार्पण’. पंतप्रधान मोदींनी हा श्लोक सर्वांसाठी शेअर केला आहे.

लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गान कोकिळा अशी त्यांची खास ओळख होती. नरेंद्र मोदींसोबतचे त्यांचे नाते भावा-बहिणीसारखे होते. अयोध्येतील नया घाटला लता मंगेशकर चौक असे नाव देण्यात आले आहे. लता मंगेशकर चौक सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यांनी गायलेली राम धुन ही लता मंगेशकर चौकात २४ तास लाऊडस्पीकरद्वारे ऐकू येते.

हे ही वाचा:

ज्यांच्यामुळे नेते सोडून गेले, त्यांच्याच हातून आज पक्ष निसटला!

राम लल्लाच्या तीन मूर्तींबद्दल चंपत राय यांनी दिले स्पष्टीकरण!

राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येत २० हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होणार

इराणची पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई; दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त

आपल्या गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि गेली अनेक दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मंगेशकर कुटुंबाला राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी आशा भोसले, उषा मंगेशकर यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले. त्यामुळे आशा भोसले आणि उषा मंगेशकर या २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

Exit mobile version