33 C
Mumbai
Sunday, March 30, 2025
घरधर्म संस्कृती'संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार'चा बुरखा टराटरा फाटला!

‘संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार’चा बुरखा टराटरा फाटला!

श्रीमंत कोकाटेंनी असा कोणताही आधार नसल्याचे दलवाईंना सांगितले

Google News Follow

Related

काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली असा दावा नुकताच केला होता. त्यावरून महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. एबीपी माझावर यासंदर्भात चर्चा झाली. त्यावेळी हा दावा संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाच्या आधारावर केल्याचा दावा दलवाई यांनी केला, पण याच कार्यक्रमात कोकाटे यांनीच दलवाई यांना तोंडावर आपटले. संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली या तर्काला एकेकाळी मान्यता देणाऱ्या कोकाटेंनीच ती हत्या मनुस्मृतीनुसार झाली नाही हे कबुल केले.

हुसेन दलवाई यांना विचारण्यात आले की, तुम्ही हा दावा कोणत्या आधारावर करत आहात. तेव्हा ते म्हणाले की, या संबंधात आमचे मित्र श्रीमंत कोकाटेंचे पुस्तक आहे शिवाजी राजांचे शत्रू कोण? यात तो संदर्भ आलेला आहे. प्रदीप गोखले यांनीही याबाबत लिखाण केलेले आहे. हे इतिहासकारांनी संदर्भ दिलेले आहेत. मी इतिहासकार नाही. मी प्रथमच बोललेलो नाही अनेक जण बोललेले आहेत.

हे ही वाचा:

महादेव अॅप प्रकरणात ६० ठिकाणी सीबीआयचे छापे

जोकोविचने मुसेट्टीला पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

कटेरीच्या फुलांमुळे खोकला, अस्थमा आणि यकृतासह अनेक आजारांवर उपाय

झारखंडमधील हजारीबाग येथे रामनवमीनिमित्त निघालेल्या मंगला मिरवणुकीत दगडफेक

त्यावर मग कोकाटेंना विचारले तेव्हा ते म्हणाले की, तर्काला व्याप्तीची गरज आहे. संभाजी महाराजांना औरंगजेबाने मनुस्मृतीच्या आधारे मारले याला कोणताही तार्किक आधार नाही किंवा कोणताही समकालीन आधार नाही. यावरून स्पष्ट झाले की, कोणताही आधार नसताना संभाजी महाराजांची हत्या ही मनुस्मृतीनुसार केली गेली हे पसरवले गेले.

गेल्या काही काळापासून ही हत्या औरंगजेबाने मनुस्मृतीनुसार केली. किंबहुना, मुस्लिमांना शिक्षा देताना शरियाचा तर हिंदूंना शिक्षा देताना मनुस्मृतीचा आधार घेतला जात असे असे तर्कट दलवाई यांनी मांडले होते.  या कार्यक्रमात सुशील कुलकर्णी, प्रकाश महाजन यांनीही मनुस्मृतीत कुठे हे म्हटलेले आहे, कोणत्या श्लोकात म्हटले आहे, याची विचारणा केल्यानंतरही दलवाई यांना ते सांगता आले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
239,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा