33 C
Mumbai
Friday, April 11, 2025
घरधर्म संस्कृतीविविध गटांकडून 'ब्राह्मणां'ना केले जाते आहे लक्ष्य...माधव भांडारी यांचा जुना व्हीडिओ व्हायरल

विविध गटांकडून ‘ब्राह्मणां’ना केले जाते आहे लक्ष्य…माधव भांडारी यांचा जुना व्हीडिओ व्हायरल

Google News Follow

Related

सध्या विविध कारणांवरून ब्राह्मण समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न काही लोक करताना दिसून येतात. प्रत्येक गोष्टीचा संबंध ब्राह्मणांशी जोडून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न हे लोक करत असतात. त्यानिमित्ताने भाजपाचे नेते माधव भांडारी यांनी एका कार्यक्रमात या विरोधात उभे राहणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला जात असताना त्यात ब्राह्मण अंँगल देण्याचा अश्लाघ्य प्रयत्नही काही लोक करत आहेत, त्यानिमित्ताने भांडारी यांच्या या भूमिकेचा विचार होतो आहे.

ते म्हणाले की, मी कधी या सर्व समाजसंघटनांच्या कामात सहभागी झालेलो नव्हतो. भाजपाचा पदाधिकारी असताना मी कधी त्यात लक्ष घातलं नव्हतं, मात्र गेल्या काही वर्षात आपल्या समाजाचा अपमान करण्याची मोहीम एका विशिष्ट वर्गातून सुरू आङे. ती पाहिल्यानंतर वाटू लागलं की आपल्याला गप्प राहून चालणार नाही.

पूर्वीचा इतिहास काय त्यात काय घडलं याला अर्थ नाही. परंतु, समाजाच्या कोणत्याही घटकाला अशा पद्धतीने हिणवणे अपमानास्पद टिप्पणी करणे महिलांबद्दल वाईट शब्द वापरणं आपल्या समाजाबद्दल म्हणत नाही. कोणत्याही घटकाबद्दल असा अपमान केला जात असेल तर आपल्याला संघटित व्हावे लागेल, असेही ते म्हणतात.

हे ही वाचा:

मोदींनी उद्घाटन केलेल्या ‘पंबन रेल्वे ब्रिज’ची वैशिष्ट्ये बघा

हरिद्वारमध्ये बेकायदा मजारवर कसा चालवला बुलडोझर

मोदींच्या श्रीलंका दौऱ्याबद्दल काय म्हणाले स्थानिक

बिहारमध्ये रामभक्तांची अलोट गर्दी

भांडारी यांनी या भाषणात सांगितले की, मग या भावनेतून मी लक्ष घालायला सुरुवात केली. आम्ही नवनव्या गोष्टी करत आहोत. एक तर मला सांगायचे आहे की, ब्राह्मण म्हणून आपण कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड अपराधाची भावना बाळगण्याची गरज नाही. आपण कुणाचे वाईट केलेले नाही. उलट आपण सगळ्यांचे भले होवो असा विचार करतो. कार्यक्रमाच्या मानपत्रात ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा उल्लेख आहे. त्याप्रमाणे सगळ्यांचे भले होवो हीच भावना घेऊन आपण आजतागायत वाटचाल केली, पुढेही करत राहू.

भांडारी दुसरा मुद्दा मांडतात, ते म्हणतात, स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा जो वाटा आहे तो दुर्लक्षित करण्याजोगा नाही. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामातील तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे होते. इंग्रज सेनापती घाबरत होते ते तात्या टोपे ना. त्यानंतर इंग्रज साम्राज्याने आपल्या स्वराज्याच्या क्रमांक एकचा शत्रू लोकमान्य टिळक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव आपल्या ओठावर आहे. यादी मोठी आहे. सगळ्या देशात होते, केवळ महाराष्ट्रात नव्हे काँग्रेसच्या उभारणीत अग्रेसर होते ते त्या भागातील ब्राहमण होते. उद्योगाच्या मुहूर्तमेढ ब्राह्मण समाजाचे योगदान मोठे आहे. एवढेच कशाला शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे राहिले ते शरद जोशी होते. पण त्यांनी ब्राह्मण म्हणून काम केले नाही. टिळक, तात्या टोपे यांनी देश, समाज म्हणून काम केले, ब्राह्मण म्हणून काम केले नाही. या देशात समाजसुधारणेच्या ज्या चळवळी झाल्या त्या उभ्या करणारे ब्राह्मण होते. राजा राम मोहन राय यांच्यापासून.

भांडारी म्हणतात की, महात्मा फुलेंना साथ देणारे अनेक ब्राह्मण होते. बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य करणारे अनेक ब्राह्मण होते. त्यामुळे ब्राह्मण समाजाने स्वार्थासाठी विचार केला नाही. सगळ्यांच्या बरोबर नेण्याचा सोबत नेण्याचा प्रयत्न ब्राह्मण समाजाने केला.

च्यामुळे अपराधीपणाची भावना. आपल्या मनात बाळगण्याच गरज नाही. न्यूनगंड नको. आपल्याला आरक्षणाचीही गरज नाही. मी पुण्यात एका कार्यक्रमात अशीच टीका झाली तेव्हा मी म्हटले की, ब्राह्मण तुमच्याकडे काही मागत नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे स्थान निर्माण करू. जगात जाऊ तिथे स्थान निर्माण करू. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात जा, आपला ठसा आपण उमटविलेला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा